ऊस आणि खत व्यवस्थापन
ऊस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक आहे. या पिकाने राज्यात सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणलेले आहेत. ऊस लागवडीसाठी ठिबक सिंचनाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी उसाची पट्टा पद्धतीने लागवड करावी. लागवडीपूर्वी ठिबक सिंचन पद्धतीची उभारणी करून घ्यावी, उसासाठी इनलाईन ठिबक सिंचन पद्धतीची निवड करावी. ठिबक संच उभारणी नंतर सरीमध्ये पूर्ण ओलावा येण्यासाठी संच १० ते १२ तास चालू ठेवावा. जमीन मुख्यत्वे वाफसा पद्धतीत आणून घ्यावी. उसाच्या बेण्याला कीटकनाशक व बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. उसाच्या सऱ्यांमध्ये शेणखतांबरोबर, खोडकिडीच्या बंदोबस्तासाठी ५ किलो फोरेट आणि २०० किलो / हे. लिंबोळी पेंडीचा वापर करावा.
खत व्यवस्थापन :
ऊस हे खतांना उत्तम प्रतिसाद देणारे पीक आहे. सर्वसाधारण पणे हेक्टरी ८० टन उत्पन्न मिळवण्यासाठी जमिनीला ९० ते ११० किलो नत्र, १८० ते २०० किलो स्फुरद, ६० ते ११० किलो पालाश आणि ८० ते ९० किलो कँल्शिअमचा पुरवठा करणे आवश्यक आहे. उसासाठी खतांचा वापर करताना जमिनीचा प्रकार व हवामानात लक्षात घेऊन खते वापरावीत. पारंपारिक पद्धतीने खते दिल्यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता कमी होते, त्यामुळे ठिबक सिंचनातून विद्राव्य खताचा वापर करताना जमिनीचा प्रकार व हवामान लक्षात घेऊन खते वापरावीत. पारंपरिक पद्धतीने खते दिल्यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता कमी होते, त्यामुळे ठिबक सिंचनातून विद्राव्य खताचा वापर करावा, त्याला फर्टिगेशन असे म्हणतात. फर्टिगेशन साठी वापरायची खते १०० % पाण्यात विद्राव्य असून, पिकाच्या गरजेनुसार दिली जात असल्यामुळे निचरा, बाष्पीभवन किंवा स्थिरीकरणामुळे वाया जाण्याचा प्रश्न उदभवत नाही. यामुळे पिकांची भरघोस वाढ होऊन उत्पादनात वाढ होते.
तसेच नत्र खत महाग असल्यामुळे त्याचा वापर मर्यादित करावा. नत्राचा वापर जास्त प्रमाणावर केल्यास साखरेचा उतारा कमी मिळतो. लागवडीपासून साधारण ४ ते ६ महिने कालावधी मध्येच करावा. उसाचे सर्वाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे. ऊस पिकानंतर त्याच जमीनीत सतत ऊस घेतल्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता निर्माण होते त्यासाठी प्रति एकरी झिंक सल्फेट १० किलो किंवा फेरस सल्फेट १० किलो प्रती एकरी किंवा मॅग्नेशियम सल्फेट ५० किलो प्रती एकरी घेऊन अर्ध्या मात्रेचा डोस लागवडीपूर्वी सरीमध्ये व उर्वरित मात्रेचा मोठ्या बांधणीच्या वेळी करावा हि खते, सेंद्रिय खतामध्ये मिसळून द्यावीत.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
http://whatsapp.heeraagro.com/
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !
Really good the
खूप छान माहिती
4.5