अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान
अतिपाऊस आणि कीटकांच्या हल्ल्यामुळे शेतातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने शेतात पूर्णपणे पाणी साचले आहे. त्यामुळे सोयाबीनचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दरम्यान,भारतातीस सोयाबीन शेतकरी सरकारकडून नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत.
शेतकऱ्यांना शेतीची कामे करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी शेतक-यांनी सोयाबीन काढून त्याची गरज रचली आहे. पण अचानक सुरू होणा-या पावसामुळे शेतक-यांना त्याची रास करण्यास अडचणी येत आहेत. पावसाने यावर्षीही हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे हिरावला आहे.
दरम्यान, भारतात सोयाबीनच्या उत्पादनात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांचे वर्चस्व आहे, जे एकूण उत्पादनात ८९ टक्के योगदान देते. उर्वरित ११ टक्के उत्पादनात राजस्थान, आंध्रप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड आणि गुजरातचा वाटा आहे.