शेतकर्यांची कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून वगळण्यात आलेल्या अल्प भूधारक शेतकर्यांनाही राज्य सरकारने दिलासा दिला आहे. या शेतकर्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय कर्जमाफीसंबंधी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने आज घेतला.
शेतकरी कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी बैठक महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील दालनात झाली. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत आजपर्यंत 23 लाख 51 हजार कर्ज खात्यांवरील शेतकर्यांची कर्जे माफ केली असून, त्यापैकी 22 लाख 13 हजार खात्यांवर कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. अल्प भूधारक शेतकर्यांनी शेतीसाठी घेतलेली खावटी कर्ज माफ करण्यासंबंधी राज्य शासन विचार करत होते. यावर आज झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा होऊन अल्प भूधारक शेतकर्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला, अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली.
या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी अल्पभूधारक शेतकर्यांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. त्यासाठी 1 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. भूविकास बँकांची कर्जमाफी, कर्मचार्यांच्या प्रश्न सोडवण्याबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या संदर्भात माहिती संकलित करुन, धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीकोनातून मंत्रिमंडळ बैठकीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, उत्पादने इत्यादींची माहिती Whatsapp वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
➡️
➡️हवामान, पीक, सिंचन विषयक कृषि सल्ला प्राप्त करण्यासाठी कृपया खालील लिंकवर click करून फॉर्म भरा. हि माहिती आपल्याला व्हाट्सएप वर विनामूल्य मिळेल.
👉 http://
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!