सिताफळ शेतीतून अर्थ क्रांतीकडे वाटचाल

1

आठ एकरात आधुनिक पद्धतीने लागवड
बीड- पारंपरिक शेतीला फाटा देत माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील भागवत ठोंबरे व नानासाहेब ठोंबरे या बंधूंनी 8 एकरमध्ये आधुनिक पद्धतीने सिताफळाची लागवड केली असून योग्य नियोजन आणि अपार परिश्रमातून ठोंबरे बंधूंची अर्थ क्रांतीकडे वाटचाल सुरू आहे.

दिंद्रुड येथील प्रगतशील शेतकरी भागवत ठोंबरे व नानासाहेब ठोंबरे यांनी अडीच वर्षापूर्वी मध्ये अडीच हजार सीताफळाची रोपे लावली. संपूर्ण आठ एकर शेतीला जाळीचे कुंपण करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून कस्पटे यांच्याकडून गोल्डन जातीची 70 रुपये प्रमाणे रोपे आणली. रोपांसाठी जवळपास दोन चाळीस लाख रुपये खर्च झाला. योग्य अंतर ठेवून खड्डे खोदण्यात आली. खड्ड्यांमध्ये शेणखत आणि सेंद्रिय खते टाकण्यात आली. तसेच सीताफळाला सिंचन व्यवस्था करण्यासाठी ठिबकचा वापर करण्यात आला. ठोंबरे यांच्याकडे विहीर असून विहिरीला मार्च-एप्रिलपर्यंत पुरेल एवढेच पाणी असते. त्यामुळे त्यांनी शेततळे घेतले आहे. पावसाळ्यात विहीर व कुपनलिकेचे पाणी शेततळ्यात सोडले जाते. या पाण्याचा वापर विहीरीतील पाणी कमी झाल्यावर करण्यात येतो.

बागेला प्रतिवर्षी त्यांना एक ते दीड लाख रुपये खर्च येतो. त्यांनी यावर्षी सीताफळाच्या बागाचा बहर धरला. यातून त्यांना दोन ते तीन लाख रुपये उत्पादन मिळाले. तोडलेले सर्व सिताफळ वर्गवारी करुन बाक्समध्ये पकिंग करुन मुंबई येथे वाशी येथे पाठविले. भाव 70-80 रुपये किलो मिळाला. मात्र उत्पादन कमी निघाल्याने दिड ते दोन लाख रुपयाचे उत्पन्न निघाले.

वर्षी दुष्काळ असल्याने उत्पादन कमी झाल्याचे भागवत ठोंबरे यांनी सांगितले. आठ एकर मधील बाग जोमात आला असून झाडांची वाढही चांगली झाली आहे. विहिरीला पाणी कमी असल्याने व दुष्काळ पडल्याने सीताफळ बागेला पाणी मुबलक प्रमाणात देता आली नाही त्यामुळे. फळधारणा कमी झाल्याचे ठोंबरे यांनी सांगितले. पाऊस चांगला झाला असता तर फळधारणा चांगली होऊन आठ एकर मध्ये पंचवीस-तीस लाखाच्या पुढे उत्पादन मिळाले असते. पारंपरिक शेतीला फाटा देत फळबाग लागवडीकडे तरुण शेतकर्‍यांनी वळण्याची गरज असल्याचा सल्लाही ठोंबरे बंधूंनी दिला आहे.

खजूर शेती

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

1 Comment
  1. […] सिताफळ शेतीतून अर्थ क्रांतीकडे वाटचा… […]

Leave A Reply

Your email address will not be published.