शेवंती

0

शेवंतीला फुलांमध्ये बरेच वरचे स्थान प्राप्त झालेले आहे. प्राचीन काळात चीनमध्ये शेवंतीची लागवड होत असे. शेवंती अनेक वर्षे एकट्या चीनमध्येच कोंडल्या गेली. जपानच्या लोकांनी चीनमधून शेवंतीचे बेने मिळवून लागवड केली. मग तिचा ईतर देशांमध्ये प्रसार झाला. युरोपमध्ये आणि नंतर अमेरिकेत शेवंतीची लागवड त्यामानाने अगदी अलीकडीची मानली जाते. जेव्हा १७६४ मध्ये शेवंतीने इंग्लंडमध्ये प्रवेश केला. त्यांनर मात्र ती फुलांची राणी बनली. सन १८५० नंतर शेवंतीची लागवड कलकत्ता परिसरात आणि त्यांनतर मुंबई म्हैसूर, बडोदा, बंगलोर आणि लखनौ या परिसरात पसरली. बडोदा व म्हैसूर या ठिकाणी शेवंतीची लोकप्रियता लवकर पसरली.

महाराष्ट्रामध्ये शेवंतीची लागवड नगर – पारनेर  परिसरात मोठ्या प्रमाणात केली जाते. तेथील शेवंतीचा इतिहास निदान १०० वर्षाचा तरी समजल्या जातो. आजही येथील काही गावांतून शेवंतीची  लागवड हमखास पाहायला मिळते.

हंगाम:-

महाराष्ट्रात शेवंतीचे मुख्य पिक वर्षातून एक लागवड करून घेतले जाते. ही लागवड एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून मे महिन्याच्या आठवड्यापर्यंत केली जाते. फुलांच्या नेमक्या हंगामावरून लागवडीचा हंगाम निश्चित करावा. सप्टेंबर – ऑक्टोबर म्हणजेच दसरा दिवाळीच्या काळात तसेच डिसेंबर (नाताळ) या काळात लागवड योग्य ठरते.

बेणे:-

मागील हंगामातील बेण्यासाठी राखून ठेवलेल्या काशा खणून घ्याव्यात लागवडीसाठी फक्त मोठ्या आणि निरोगी काशाच वापराव्यात रोगाचा प्रसार टाळण्यासाठी आणि उगवण चांगली होण्यासाठी शेवंतीचे बेणे निवडून ते बुरशीनाशकाच्या पाण्यात बुडवून काढावे व पोत्याच्या बारदानाखाली झाकून ठेवावे.

जमीन:-

शेवंतीसाठी चांगला निचरा होईल अशी जमीन निवडणे ही एक प्राथमिक गरज मानली जाते. क्षारयुक्त उच्च सामू आणि चुनखडी या जमिनी शेवंतीस हानिकारक ठरतात. हलक्या व मध्यम पोयत्याच्या जमिनीची निवड करावी. भारी जमिनीमध्ये हे पिक घेवू नये आणि घ्यायचा प्रसंगच आला तर अगोदर हिरवळीचे खात करावे व कम्पोस्ट खताचा वापर देखील सढळ ठेवावा.

हवामान:-

`झाडाच्या वाढीस मोठे दिवस तर फुले फुलण्यास मात्र लहान दिवस लागतात, या काळात तापमानही अधिक लागते, मात्र कडक थंडीत शेवंती फुलत नाही. पावसाळी दमट हवामान देखील शेवंतीस फारसे मानवत नाही. कोरड्या व कमी पावसाच्या नगर सारख्या परिसरात शेवंती चांगली येते. हेच शेवंतीच्या दृष्टीने चांगले हवामान असते. फुले येण्यासाठी ठराविक प्रमाणात सूर्यप्रकाशाची सूर्य प्रकाशाची गरज असते.

पूर्वतयारी व लागवड:-

शेवंतीसाठी जमिनीची नांगरट हिवाळ्यात करून उन्हाळ्यापूर्वी कुळवपाळी करुन घ्यावी जमिनीत हेक्टरी ५० गाड्या सुमारे २० टन कम्पोस्ट खत घालून वाफे तयार करवीत. सपाट वाफ्यापेक्षा सरी वाफ्यांवर शेवंती चांगली वाढते सरी ४५ ते ६० सें. मि. अंतरावर करावी. सरीच्या एका ३० ते ४५ सें. मी. अंतरावर काशा (शेवंतीचे अट सर्कस) लावून लागवड करावी. वाफ्यात अगोदर पाणी सोडून मग लागवड करणे सोपे जाते.

मशागत व खतपाणी करणे:-

लागवडीनंतर शेवंतीस कमीतकमी दोन खुरपण्या करून घ्याव्यात. पाणी देण्याच्या वेळा या गरजेप्रमाणे ठरवाव्यात. साधारणपणे पुढीलप्रमाणे ३ टप्पे पडावे.

  • लागवडीपासून पावसाळा सुरु होईपर्यंतचा पहिला टप्पा या काळात ५ दिवसांच्या अंतराने पाण्याची पाळी द्यावी.

ब) पावसाळ्यामध्ये पाऊस नसेल तरच पाणी द्यावे.

क) फुले उमलण्यापासून ते फुलांची तोडणी होईपर्यंत हा तिसरा टप्पा होय. या काळात पाण्याची टंचाई पडू देवू नये. अन्यथा फुले निट उमलत नाही.

पाणी देतांना कधीही वाफे तुडुंब भरू नये. तसेच पावसाचे पाणी वाफ्यात साठू देवू नये. पाणी साचून राहल्याने शेवंती मर्कुज रोगास फार लवकर बळी पळते असे दिसून आले.

खते:-

खतांचा वापर प्रमाणशीर आणि वेळेवर करायला हवा. खते घालण्यातही पुढीलप्रमाणे टप्पे करावे सोयीचे ठरते. यासाठी पुढील तक्ता वापरावा.

अनु क्र. वेळ अवस्था खते प्रमाण
लागवडीपूर्वी मशागत करतांना कम्पोस्ट खत २०-२५ टन
वाफे केल्यावर पण लागवडीपूर्वी १. डायमोनीअम फॉस्फेट १०० kg
२. निंबोळी पेंड ५०० kg
लागवडीनंतर तीन आठवड्यांनी
पहिल्या खुरपिच्या नंतर
फुटी येवून वाढू
लागतांना
१. १९: १९: १९
२. मॅग्नेशिअम सल्फेट
२०० kg
२५ kg
लागवडीनंतर सहा आठवड्यांनी
दुसरी खुरपी झाल्यावर
कळ्या येण्यास
सुरुवात होण्यापूर्वी
१. १९: १९: १९
२. निंबोळी पेंड
३. मॅग्नेशिअम सल्फेट
४. पोटॅशीअम सल्फेट
२०० kg
५०० kg
२५  kg
१०० kg

 

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

http://whatsapp.heeraagro.com/

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

Leave A Reply

Your email address will not be published.