शेतकर्‍यांना मिळणार १ लाख ६० हजाराचं ‘कोलॅटरल-फ्री’लोन

1

शेतकऱ्यांना आता काहीही गहाण न ठेवता १.६ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना फक्त १ लाख रुपयांपर्यंत कर्ज काहीही गहाण न ठेवता देण्यात येत होते. देशातील फॉर्मल क्रेडिट सिस्टिममध्ये छोट्या आणि कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना सहभागी करुन घेण्याचा विचार आरबीआयने केला आहे.

याबरोबर ५०,००० रुपयांपर्यंत छोटे कर्जासाठी शेतकऱ्यांना फक्त सेल्फ डिक्लेरेशन जमा करावे लागेल. त्यांच्यासाठी No Due प्रमाणपत्र जमा करण्याची अनिवार्यता रद्द करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाला ६००० रुपये जमा होणार आहे. ही रक्कम २ हजार रुपये अशी करुन वर्षाला 3 टप्प्यात देण्यात येईल. नव्या योजनांवर काम करत आहे मोदी सरकार केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी लवकरच मोठी योजना आणणार आहे.

या योजने अंतर्गत सोलर पॅनल स्थापित करत वीज उत्पादन करण्याचा व्यवसाय करु शकतात. यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला १ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न बनवण्याची संधी आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी सोलर पॅनल लावून दो मेगावाट वीजेचे उत्पादन करु शकतात. यातून त्यांना १ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न कमावू शकतात. केंद्रीय मंत्री आर के सिंह यांना सांगितले की शेतकऱ्यांकडून निर्माण करण्यात येणारी वीज सरकार खरेदी करणार आहे. या योजनेची घोषणा काही दिवसात करण्यात येण्याची शक्यता आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

1 Comment
  1. Deepak says

    Cheri inportent

Leave A Reply

Your email address will not be published.