शेत आवारातील मित्र -कडुनिंब

1

आजकाल आपण वैदिक किंवा पारंपारिक शेतीत पूर्वी वापरल्या जाणाऱ्या सर्व घटकांना हळूहळू विसरत चाललो आहोत असाच एक मैत्रीपूर्ण व बहुपयोगी वृक्ष आपल्या शेत आवारात आढळतो तो म्हणजे….कडुनिंब

चला जाणूयात या उपयोगी वृक्षाचा एक महत्वाचा उपयोग. ५% निंबोळी अर्क( 5% NSKE)शेतातल्या शेतात तयार करायची पद्धत.

 • लागणारी सामग्री:-

५% शक्तीचा १००लिटर  निंबोळी अर्क तयार करण्यासाठी आवश्यक सामग्री

१) कडूनिंबाच्या निम्बोण्या ( पूर्णपणे सुकलेल्या ) :- ५ कि.ग्रॅ.

२) पाणी(चांगले व स्वच्छ)   :- १०० लिटर

३) साबण:- २००ग्रॅ.

४)गाळण्यासाठी कापड.

 • बनवण्याची पद्धत :-
 • गरजेप्रमाणे निम्बोण्या ५कि.ग्रॅ. घ्या.
 • त्या दळूण त्यांची पावडर बनवा.
 • १०लिटर पाण्यात हि पावडर रात्रभर भिजवा.
 • दुसरया दिवशी सकाळी हे पाणी लाकडी काठीने पांढरे दिसेपर्यंत ढवळा.
 • दुहेरीकापडातूनगाळूण एकंदर १०० लिटर बनवा.
 • ह्यामध्ये १% साबण घाला.(साबणाची पेस्ट बनवून पाण्यात मिसळा).
 • चांगले ढवळून वापरा.

 

 • टिप :-
 • निम्बोण्या धरतेवेळीच झाडावरून उतरवा आणि चांगल्या वाळवा.
 • आठ महिन्यांपेक्षा जुन्या निम्बोण्या वापरू नकाकारण इतक्या जुन्या बियांमध्ये जरूरती कीडनाशक शक्ति राहत नाही.
 • नेहमी निम्बोण्याचा ताजा अर्क (NSKE) वापरा.
 • योग्यपरिणाम मिळण्यासाठी दुपारी ३.३० नंतर फवारा.

नीम के फायदे व गुण

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

1 Comment
 1. Neem Kaduneemb

  […] शेत आवारातील मित्र -कडुनिंब […]

Leave A Reply

Your email address will not be published.