शेतीची कामे – ऑगस्ट महिना ( Calenderof Operations )

1

या महिन्यात करावयाच्या शेतीच्या कामात पावसाच्या पाण्याचे मुलस्थानी जलसंधारण करून जास्तीचे पाणी शेततळ्यात साठविणे, आंतरमशागतीद्वारे तण व्यवस्थापन, एकीकृत रोग व किडींचे व्यवस्थापन इ. बाबींना अग्रक्रम द्यावा लागेल. खरीप पिकांच्या वाढीच्या अवस्था विचारात घेऊन खालील प्रमाणे शेतीची कामे करावीत. काही प्रश्न किंवा अडचण असल्यास कृषी सम्राट च्या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा आमच्या फेसबुक पेज वर कॉमेंटन्स द्याव्यात.

१) ज्या भागात पाऊस उशिरा झाला असेल अश्या भागात आपत्कालीन पिक नियोजन करतांना १५ ऑगस्ट पर्यंत तूर, सुर्यफुल, मका, बाजरीव त्यानंतर ऑगस्ट अखेरपर्यंतसुर्यफुल किंवा एरंडी या पिकांची पेरणी करावी.

२) धानाच्या रोपांची लावणी राहिली असल्यास ती रोपांची मुले रुजेपर्यंत बांधीत पाण्याची पातळी एक इंच ठेवावी.

३) पावसात खंड पडल्यास वारंवार डवरणी करून जमीन भुसभुशीत ठेवावी. डवरणी करतांना डवऱ्याच्या जानकुळास नारळीदोरीगुंडाळूनपिकांच्या ओळीत चर काढावेत. यामुळे पडणारे पावसाचे पाणी जागेवरच मुरेल, जास्तीचे पाणी शेततळ्यात साठवावे. पावसाचे पाणी शेताबाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी.

४) पिकांवर मित्र कीटक ( लेडी बर्ड बीटल, क्रायसोपा) वकिडी( मावा, तुडतुडे, फुलकिडे, अळ्याव बोंडअळ्या) यांचे प्रमाण १ : ५ आढळल्यास रासायनिक कीटकनाशकांऐवजी५% निंबोळी अर्क ( ५ किलो निंबोळ्यांचा अर्क+ २० ग्रॅम साबू पावडर + १०० लिटर पाणी ) फवारावे. ३५ ते ४५ दिवसांनी ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी. तसेच बोंड अळ्यांचा प्रादुर्भाव समजण्यासाठी ४० ते ४५ दिवसांनी ( लागवडीनंतर ) प्रत्येकी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी उभारावे व सोबतच ‘ टी ’ आकाराचे २५ पक्षी थांबे प्रतिहेक्टरी उभारावेत.

५) मान्सूनपूर्व कपाशीची अर्धवट उमललेली फुले ( गुलाबी बोंडअळी ग्रस्त डोमकळ्या ) तोडून जाळावीत.

६) कपाशीचे पिक फुलोरा अवस्थेत असतांना २% युरिया( २ किलोग्रॅम युरिया+ १०० लिटर पाणी ) फवारणीत ५० मि.ली प्लॅनोफिक्स मिसळावे.( साध्या पंपाकरिता )

७) खरीप भुईमुगास५०% फुलोरा अवस्थेत हेक्टरी ४०० किलो जिप्सम देऊन डवरणीने भर द्यावा.

८) सोयाबीन पिक फुलोरा अवस्थेत असतांना २ % युरियाची फवारणी करावी.

९) सुरु ऊसाची पक्की बांधणी ( लागवडीपासून १६ ते १८ आठवड्यांनी ) राहिली असल्यास हेक्टरी २५० किलो १९:१९:१९ खत देऊन त्वरित आटोपावी.पावसात खंड पडल्यास दर १० दिवसांनी ओलीत करावे.

१०) मुळ्याच्या पुसा देशी, पुसा केतकी जातीच्या बियाण्यांची४५X १० सें.मी अंतरावर पेरणीवरंब्यावर बी टोकून करावी. यावेळी हेक्टरी ५० किलो नत्र + २५ किलो स्फुरद ( युरिया २ बॅग व सिंगल सुपर फॉस्फेट ३ बॅग ) द्यावे.

११) रबी हंगामाकरिता वांगी व टोमॅटो बियाण्याचीगादी वाफ्यावर पेरणी करावी.

१२) फळझाडांची नवीन लागवड राहिली असल्यास ती या महिन्याचे सुरुवातीस आटोपावी.

१३) एक वर्ष वयाचे गावरान आंब्याच्या रोपट्यावर दशहरी, केशर, आम्रपालीजातीचे मृदुकाष्ठ कलम करावे.

१४) एक ते चार वर्ष वयाचे संत्रा, मोसंबीफळझाडांचे खुंटावरील फुट व पानसोट वरचे वर काढावेत. खोडाजवळ पावसाचे पाणी साचू देऊ नये.

१५)पपईची६ ते ७ वयाची रोपे २ X २ मिटर अंतरावर ३० X ३०X ३० सें.मी आकाराचे खड्डे खोडून भरावीत व रोपांची लागवड करावी.

१६) संत्रा व मोसंबीची मृग बहाराची फळेवाटाण्याएवढी झाल्यावरशिफारशीप्रमाणे नत्र खताची मात्रा द्यावी.

१७) संत्र्याच्या आंबिया बहाराची फळेपोसण्याकरिता१०० लिटर पाण्यात १ किलो युरिया + १ग्रॅम एन.ए.ए. मिसळून फवारणी करावी.

१८) उसावरील पायरीला किडींची अंडीपुंज असलेली खालची २ – ३ पाने तोडून जाळावीत.

१९) मुग – उडीदावर भुरीरोगाची लागण दिसताच डिनोकॅप १० मि.ली किंवा पाण्यात मिसळणारे गंधक ३०ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ( साधा पंप )

२०)मोगरा व ग्लॅडीओलस फुलझाडांची लागवड करावी.

२१) अश्वगंधा, सोनामुखी, शतावरीया औषधी वनस्पतींची शिफारसीनुसार लागवड करावी.

२२) एप्रिलमध्ये छाटणी केलेल्या बोरीचे नवीन फुटीवर उमराण, गोला, कडाका, मेहरून जातींचे डोळे बांधावेत.

महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास साभार सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

1 Comment
  1. Vishnu Dabhade says

    सर खुप च भारी… तुमच्या कार्याला सलाम

Leave A Reply

Your email address will not be published.