शेती अवजारे व उपकरणे – पेरणी यंत्रे

0

बैलचलित बी व खत पेरणीयंत्र

 • बीजपेटीतील बियाणे प्रमाणित करण्यासाठी खाचा असलेला रोलर दिलेला आहे. आवश्‍यकतेनुसार बियाण्याची मात्रा कमी-जास्त करण्यासाठी रोलरची बीजपेटीतील लांबी कमी-जास्त करावी लागते. त्यासाठी यंत्रणा दिलेली असते. त्याद्वारा बियाणे व खताची मात्रा प्रमाणित करता येते.
 • पेरणी यंत्रास जमिनीवर चालणाऱ्या चाकाद्वारा गती दिली जाते. अवजारांची वाहतूक सुलभ होण्यासाठी यंत्रास दोन चाके दिलेली आहेत, तसेच या चाकांद्वारा पेरणीची खोली कमी-जास्त करता येते. या पेरणी यंत्राची कार्यक्षमता तीन ते पाच एकर प्रतिदिवस आहे.
 • महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे विविध पिकांच्या पेरणीसाठी हे तीनफणी यंत्र विकसित केलेले आहे. या यंत्राने सोयाबीन, तूर, मका, हरभरा, ज्वारी, सूर्यफूल इ. पिकांची पेरणी करता येते.
 • या यंत्राच्या प्रत्येक फणावर बियाण्यासाठी स्वतंत्र बीजपेटी दिलेली आहे. प्रत्येक पेटीत साधारणपणे तीन किलो बियाणे साठविता येते. पेटीच्या तळाशी बियाणे प्रमाणित करणारी यंत्रणा दिलेली आहे. यामध्ये पिकाच्या आवश्‍यकतेनुसार बियाणे प्रमाणित करण्यासाठी प्लॅस्टिकच्या तबकड्या दिलेल्या आहेत, त्यामुळे बी ठराविक अंतराने फणात पडते. परिणामस्वरूप बी ओळीमध्ये साधारणतः शिफारस केलेल्या अंतरावर पडते.
 • प्रत्येक पिकासाठी प्लॅस्टिकच्या तबकड्यांचा स्वतंत्र संच दिलेला आहे. प्रत्येक पिकासाठी व फणासाठी स्वतंत्र तबकड्या असल्यामुळे, मुख्य पिकाबरोबर आंतरपीक टोकण/ पेरणी करता येते, तसेच दोन फणांतील अंतर कमी-जास्त करता येते.
 • बियाण्याबरोबर दाणेदार खताची मात्रा शिफारशीनुसार योग्य खोलीवर व बियाण्यांच्या बाजूला पेरता येते. त्यासाठी यंत्रावर एक पेटी बसविलेली आहे.

 

बैलचलित क्रीडा टोकणयंत्र

 • हे यंत्र सोयाबीन, तूर, मका, हरभरा, भुईमूग, ज्वारी, बाजरी, वाटाणा इ. पिकांच्या पेरणीसाठी उपयुक्त आहे.
 • या यंत्राच्या लोखंडी सांगाड्यावर एक पेटी बसविलेली आहे. त्या पेटीचे खत व बियाण्यासाठी असे दोन भाग केलेले आहेत. बियाण्यासाठी असलेल्या भागात चार वेगवेगळे कप्पे केलेले आहेत.
 • अशा प्रकारे यंत्राच्या चार फणांसाठी स्वतंत्र बीजपेट्या दिलेल्या आहेत. प्रत्येक बीजपेटीत शिफारशीप्रमाणे बियाणे फणात प्रमाणित करण्यासाठी प्लॅस्टिकच्या तबकड्यांचा वापर केलेला आहे.
 • यंत्रासोबत प्रत्येक पिकासाठी चार तबकड्यांचा संच दिलेला आहे. खतपेटीत दिलेल्या एका लोखंडी पट्टीद्वारा खतनियंत्रण केले जाते. यासाठी खतपेटीच्या तळाशी दिलेल्या छिद्रावर लोखंडी पट्टीवरील छिद्राची लांबी कमी-जास्त करून खताची मात्रा प्रमाणित करता येते.

बैलचलित ज्योती बहुपीक टोकण यंत्र

 • या यंत्राद्वारा भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, मका, गहू, ज्वारी, हरभरा, तूर इ. पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते.
 • या यंत्रात 22.5 सें. मी. अंतरावरील पिकासाठी 9 ओळी, 30 सें. मी. अंतरावरील पिकासाठी 7 ओळी आणि 45 सें. मी. अंतरावरील पिकासाठी 5 ओळी एकाच वेळेस पेरता येतात.
 • शिफारशीप्रमाणे ओळींतील आणि दोन रोपांतील योग्य अंतर राखता येते.
 • प्रत्येक फणाच्या बियाण्याच्या पेट्या वेगळ्या असल्याने तुरीसारख्या आंतरपिकांचे टोकण करता येते.
 • हे यंत्र 35 अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्‍टरवर चालते.

ट्रॅक्‍टरचलित ज्योती बहुपीक टोकण यंत्र

 • या यंत्राद्वारा भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, ज्वारी, मका, गहू, हरभरा, तूर इ. पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते. दाणेदार खतांची मात्रा शिफारशीनुसार बियाण्याच्या बाजूला देता येते.
 • दाणेदार खतांची मात्रा शिफारशीनुसार योग्य खोलीवर आणि बियाण्याच्या बाजूला देता येते.
 • बियाण्याच्या पेट्या स्वतंत्र असल्यामुळे आंतरपिकांची टोकणसुद्धा करता येते..
 • या यंत्राद्वारा दोन ओळींतील अंतर 22.5 सें. मी., 30 सें. मी. आणि 45 सें. मी. राखता येते..
 • एका दिवसात जवळजवळ 1 ते 1.5 हेक्‍टर क्षेत्रावर टोकण पद्धतीने पेरणी करता येते.

ट्रॅक्‍टरचलित ज्योती बहुपीक टोकण यंत्र

 • या यंत्राद्वारा भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, ज्वारी, मका, गहू, हरभरा, तूर इ.पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते. दाणेदार खतांची मात्रा शिफारशीनुसार बियाण्याच्या बाजूला देता येते.
 • या यंत्रात 22.5 सें. मी. अंतरावरील पिकासाठी 9 ओळी, 30 सें. मी. अंतरावरील पिकासाठी 7 ओळी आणि 45 सें. मी. अंतरावरील पिकासाठी 5 ओळी एकाच वेळेस पेरता येतात.
 • शिफारशीप्रमाणे ओळींतील आणि दोन रोपांतील योग्य अंतर राखता येते.
 • प्रत्येक फणाच्या बियाण्याच्या पेट्या वेगळ्या असल्याने तुरीसारख्या आंतरपिकांचे टोकण करता येते.
 • हे यंत्र 35 अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्‍टरवर चालते
 • एका दिवसात 3 हे. क्षेत्रावर पेरणी करता येते.

कमी अश्‍वशक्ती ट्रॅक्‍टरचलित फुले बहुपीक टोकण यंत्र

 • या यंत्राद्वारा विविध पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते, तसेच शिफारशीनुसार दाणेदार खतांची मात्रा देता येते.
 • दोन ओळींतील, तसेच दोन रोपांतील अंतर सारखे राखता येते.
 • या यंत्राची कार्यक्षमता 1.5 हे. प्रति दिवस इतकी आहे.

पॉवरटिलरचलित ज्योती बहुपीक टोकण यंत्र

 • या यंत्राद्वारा मका, भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, ज्वारी, हरभरा, तूर इ. पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते.
 • दोन ओळींतील अंतर 22.5, 30 अथवा 45 सें. मी. राखता येते.
 • हे यंत्र 12 अश्‍वशक्तीच्या पॉवरटिलर चालविले जाते.

ट्रॅक्‍टरचलित फुले सरी- वरंबा बहुपीक टोकण यंत्र

 • या यंत्राद्वारा विविध पिकांची सरी- वरंबा टोकण पद्धतीने पेरणी करता येते, तसेच सरीच्या दोन्ही बाजूंना टोकण पद्धतीने बियाण्यांची पेरणी करता येते. सरीच्या अंतरानुसार लागवडीचे अंतर बदलता येते.
 • हे यंत्र 55 अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्‍टरवर चालते.
 • या यंत्राची कार्यक्षमता 0.45 हेक्‍टर प्रति तास असून, जिरायती शेती क्षेत्रासाठी या यंत्राची विशेष शिफारस करण्यात आली आहे.


महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:-
www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

This image has an empty alt attribute; its file name is Strip.jpg

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.