ग्रामस्थांच्या श्रमदानाने पोखरी होतेय पाणीदार

0

नाबार्ड, निसर्ग, नाथ फाऊंडेशनचा सहयोग
बीड / प्रतिनिधी
तालुक्यातील पोखरी (मैंदा) येथील युवकांनी हिवरेबाजारच्या धर्तीवर गावाला पाणीदार करण्याचा ध्यास घेतला. या ध्यासाच्या पूर्तीसाठी विविध संस्थांसोबत याबाबत चर्चा करून नाबार्ड, निसर्ग व नाथ फाऊंडेशनच्या सहयोगातून तसेच ग्रामस्थांच्या श्रमदानाने जलसंधारणाची कामे करण्यास 3 दिवसांपासून सुरुवात झाली असून दि.4 डिसेंबर रोजी ग्रामस्थांच्या मदतीला जिजाऊ प्रतिष्ठान व शिवसेनेच्या युवासैनिकांनी श्रमदान करत हातभार लावला.
तालुक्यातील पोखरी (मैंदा) येथील युवकांनी गावास पाणीदार करण्याच्या ध्यासाला ग्रामस्थांसह महिलांनी चांगलाच प्रतिसाद दिला असून 400 ते 500 ग्रामस्थ 3 दिवसांपासून श्रमदान करत आहेत. नाबार्ड अर्थसहाय्यीत पाणलोट क्षेत्र विकास निधी कार्यक्रम, निसर्ग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (चनई), नाथ फाउंडेशन यांचे सहकार्य लाभत आहे.

गावाला पाण्याचे महत्व पटले असून अबालवृद्ध जलसंधारणाच्या कामासाठी उत्साहाने सहभागी होत आहेत. येथील युवकांनी गाव हरित करण्याचा व दुष्काळाला मात देण्याचा संकल्पच केल्याचे या श्रमदानातून दिसून येत आहे. या श्रमदानात मैंदा येथील माध्यमिक शाळा, पोखरी येथील आश्रमशाळा, घाटसावळी येथील माध्यमिक शाळातील विद्यार्थी, आरोग्य उपकेंद्र पोखरी येथील कर्मचारी, अनुलोम संस्था, पाणी फाउंडेशन सदस्यांनी सहभाग नोंदवला. येथील उपसरपंच अशोक अस्वले यांनी 2 दिवसांचे अन्नदान व आज वडवणी रोटरी क्लबकडून श्रमदात्यांना अन्नदान करण्यात आले.
यावेळी युवासेनेचे तालुकाप्रमुख राहुल साळुंके, शिवसेनेचे यशराज घोडके, दीपक घोडके, बळवंत डावकर, विकास गवते, जिजाऊ प्रतिष्ठानचे सचिव अजय सुरवसे, राम मस्के, धनंजय काकडे, ऋषिकेश गायसमुद्रे, अशोक सुरवसे यांच्यासह वडवणी येथील संजय आंधळे, रणजित धस, आंबेसावळी येथील अशोक गुंदेकर, अमोल लांडे, अविनाश गुंदेकर, सुदर्शन गुंदेकर, वैभव बांडे आदींनी ग्रामस्थांसोबत श्रमदान केले.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

 

Leave A Reply

Your email address will not be published.