शहामृग (इमू) पालन : भाग २

0

मागील भागात आपण इमू पालना विषयी प्राथमिक माहिती घेतली आता जाणून घेवूया उत्पादन व्यवस्थापन व ब्रीडर व्यवस्थापन या बाबतीत.

उत्पादन व्यवस्थापन

 • इमू पिल्लांची वाढ झाल्‍यावर, त्‍यांना मोठ्या आकाराच्‍या फीडर आणि पाण्‍याच्‍या हौदाची आणि तसेच मोठ्या जागेची गरज पडते.
 • नर-मादी ओळखून त्‍यांना वेगवेगळे पाळा.
 • आवश्‍यकता भासल्‍यास, खुराड्यामध्‍ये कोरडे वातावरण ठेवण्‍यासाठी व केरकचरा आणि विष्ठेची व्यावस्था लावण्‍यासाठी खुराड्यामध्‍ये पुरेसा भुसा पसरा.
 • पक्ष्‍यांना त्‍यांचे वजन २५ किलोग्रॅम होईपर्यंत किंवा ते ३४ आठवड्यांचे होईपर्यंत ग्रोअर मॅश द्या. पक्ष्‍यांना तंतुयुक्‍त आहाराची सवय लावण्‍यासाठी त्‍यांना आहाराच्‍या १० टक्‍के वेगवेगळा हिरवा पाला द्या.
 • सदैव स्‍वच्‍छ पाणी द्या आणि त्‍यांना पाहिजे तेवढा आहार द्या. पूर्ण वाढ काळात त्‍यांचे वातावरण कोरडे ठेवण्‍याची खात्री बाळगा.
 • ४० पक्ष्‍यांसाठी जर बाहेर देखील जागा असेल तर ४० x १०० फूट जागा पुरवा. खुराड्यामधील जमीन कोरडी राहावी ह्यासाठी पाण्‍याचा निचरा उत्तम होईल व कोरडी राहील याची काळजी घ्‍या.
 • लहान पिल्‍लांना त्‍यांचे शरीर चांगल्‍या प्रकारे उभारून धरता यावे ह्यासाठी कडेला ठेवा.
 • थोड्या मोठ्या व प्रौढ पक्ष्‍यांना दोन्‍ही पंख एका बाजूला धरून व हळूच ओढून एखाद्या इसमाच्‍या पायांजवळ कडेला ठेवा. पक्ष्‍यास कधीही लाथ मारण्‍याची संधी देऊ नका. तथापि, नीट धरून ठेवणे आणि सुरक्षित ठेवणे आवश्‍यक आहे ज्‍यायोगे पक्षी व इसम कोणालाच इजा होणार नाही.

हे करा

 • आहार व पाणी देणे तसेच पक्ष्‍यांची सतर्कता जाणून घेण्‍यासाठी दिवसातून एकदा पक्ष्‍यांच्‍या कळपाचे निरीक्षण करा.
 • पक्ष्‍यांच्‍या पायांचा फेगडेपणा व विष्ठेचे निरीक्षण करा. आजारी पक्ष्‍यांना ओळखून त्‍यांना वेगळ्या जागी हलवा.
 • ऑल इन-ऑल आउट पध्‍दतीचे पालन करा. कधीही प्रौढ पक्ष्‍यांच्‍या जवळपास वावरू नका.

हे करू नका

 • पक्ष्‍यांच्‍या जवळपास कधीही टोकदार वस्‍तू, लहान खडे ठेवू नका. पक्षी मोठे खट्याळ असतात आणि समोर येईल त्या प्रत्‍येक वस्‍तूवर झडप घालतात.
 • कधीही पक्ष्‍यांना गरमीच्या दिवसांत डांबून ठेवण्‍यासाठी किंवा लसीकरणासाठी हाताळू नका.
 • दिवसभर पक्ष्‍यांना थंड व स्‍वच्‍छ पिण्‍याचे पाणी द्या.

ब्रीडर व्यवस्थापन

१) इमू पक्षी १८ ते २४ महिन्‍यांत लैंगिकदृष्ट्या जाणते होतात. नर आणि मादी ह्यांचे प्रमाण 1:1 ठेवा. खुराड्यामध्ये वीण वाढवण्याच्‍या बाबतीत, जोड्या अनुरूपतेवर आधारित असायला हव्‍यात. मेटिंग(प्रजननासाठी वीण) दरम्‍यान प्रत्‍येक जोडीला २५०० चौ.फूट जागा पुरवा. विणीसाठी एकांत मिळावा म्हणून झाडे – झुडपे पुरवू शकता.

२) विणीच्या कार्यक्रमाच्‍या ३ ते ४ आठवडे आधीच ब्रीडर आहार द्या. ह्यामधून पक्ष्‍यांच्‍या चांगल्‍या प्रजननासाठी आणि उबविण्‍यासाठी खनिजे व जीवनसत्‍वे ह्यांचा भरपूर पुरवठा होईल ह्याची खात्री करून घ्‍या. सामान्‍यत: प्रौढ पक्षी १ किलो/दिवस असा आहार घेतो. पण ब्रीडिंग हंगामात, आहार घेणे अत्‍यंत कमी होते. म्‍हणून आहारात पोषक तत्‍वांचा समावेश असल्‍याची खात्री करून घ्‍या.

३) सुमारे अडीच वर्षे वय असतांना पहिले अंडे घातले जाते. ऑक्टोबर ते फेब्रुवारीच्‍या दरम्‍यान अंडी घातली जातील, विशेषत: वर्षाच्‍या थंड दिवसांमध्‍ये. अंडी घालण्‍याची वेळ सुमारे ५.३० ते ७.०० संध्‍याकाळची असते. खुराड्यामध्‍ये दिवसांतून दोनदा अंडी गोळा केली जाऊ शकतात म्हणजे त्यांचे नुकसान होणार नाही. सामान्‍यपणे, पहिल्‍या वर्षचक्राच्या दरम्‍यान मादी १५ अंडी घालते, त्‍यानंतरच्‍या वर्षांमध्‍ये, अंड्यांचे उत्‍पादन सुमारे ३० – ४० अंड्यांपर्यंत वाढत जाते.

४) सरासरी प्रमाणात, दर वर्षी एक मादी २५ अंडी घालते. एका वर्षांत ५६० ग्राम वजन असलेल्‍या अंड्यांसह सुमारे ४७५ – ६५० ग्रॅम वजनाची अंडी असतात. अंड्यांचा रंग हिरवट असतो आणि हिरवट रंगाच्या टण

क काचेच्‍या गोट्यांसारखी ती दिसतात. रंगाचा गडदपणा प्रकाशानुसार बदलतो, मध्‍यम ते गडद हिरवा. पृष्‍ठभाग खडबडीत असतो तो नितळ होतो. बहुतेक अंडी (४२%) मध्‍यम हिरवट तसेच खडबडीत पृष्‍ठभाग असलेली असतात.

इमूची अंडी

 • ब्रीडर आहार पुरेशा कॅल्शियमसह (२.७%) द्या ज्‍यायोगे सशक्‍त अंडी प्राप्‍त केली जाऊ शकतात. अंडी घालण्‍याआधी ब्रीडर पक्ष्‍यास अतिरिक्‍त कॅल्शियम दिल्‍याने अंड्यांच्या उत्पादनावर परिणाम होतो आणि नर प्रजननसक्षम राहात नाहीत.
 • अतिरिक्त कॅल्शियमसाठी ग्रिट किंवा कॅल्साइट भुकटीच्‍या स्‍वरूपात, एका वेगळ्या हौदात ठेवून ते पक्ष्‍यांना द्या. खुराड्यामधून वारंवार अंडी गोळा करीत राहा.
 • जर अंडी मातीने खराब झाली, तर ती सँण्‍डपेपरने घासा व कापसाने पुसा.
 • अंड्यांची साठवण ६० डि.फॅ. तापमानाच्‍या थंड जागेवर करा. जास्‍त चांगल्‍या प्रकारे उबविली जावीत म्‍हणून कधी ही अंडी १० दिवसांपेक्षा जास्‍त दिवस साठवू नयेत.खोलीच्‍या तापमानावर ठेवलेली अंडी चांगल्‍या प्रकारे उबविण्‍यासाठी प्रत्‍येक ३ ते ४ दिवस सेट ठेवली जाऊ शकतात.

अंडी उबविणे व पिले बाहेर येणे

१) प्रजननक्षम अंडी खोलीच्‍या तपमानाशी जुळल्यानंतर मांडा. एका ट्रेमध्‍ये ह्यांना थोडेसे तिरप्‍या किंवा आडव्‍या ओळींमध्‍ये लावून ठेवा. अंडी उबविण्‍याचे यंत्र (इनक्‍यूबेटर) नेहमी स्‍वच्‍छ व निर्जंतुक करून ठेवा. अचूक इनक्‍यूबेटिंग तपमान कायम राखण्‍यासाठी ड्राय बल्‍ब तपमान सुमारे ९६ – ९७ डि.फे. आणि वेट बल्‍ब तपमान सुमारे ७८ – ८० डि. फे.(सुमारे ३० – ४० टक्‍के तुलनात्मक आर्द्रता उर्फ आर एच).

२) एका सेटरमध्‍ये अंड्यांचा ट्रे काळजीपूर्वक ठेवा, एकदा इनक्‍यूबेटर सेट तपमानासह संबंधित आर्द्रतेवर तयार झाले की सेट केल्याची तारीख आणि पेडिग्रीसाठी ओळख स्लिप लिहून ठेवा, आवश्‍यक वाटल्‍यास इनक्‍यूबेटरच्‍या जागेच्‍या प्रत्‍येक १०० घनफुटासाठी ४० एमएल फॉर्मेलिन +२० ग्राम पोटॅशियमसह इनक्‍यूबेटरला धुरी द्या.

३) इनक्‍यूबेशनच्‍या ४८ दिवसांपर्यंत प्रत्‍येक तासाला अंडी फिरवा. ४९ व्‍या दिवसापासून, अंडी फिरविणे थांबवा आणि ध्‍वनि संकेताची वाट पहा. ५२ व्‍या दिवशी, इनक्‍यूबेशनचा काळ संपतो.पिलांना कोरडेपणाची गरज असते.

४) पिलांना कमीत कमी २४ ते ७२ तास हॅचर कंपार्टमेंटमध्‍ये ठेवा, ज्‍यायोगे लव कमी होवून पिले निरोगी होतील. सामान्‍यपणे, हॅचिंग (अंड्यातून पिले बाहेर येणे ) क्षमता ७० टक्‍के किंवा जास्‍त असेल. कमी क्षमतेची अनेक कारणे असू शकतात. योग्‍य तो ब्रीडर आहार आरोग्‍यमय पिलांची खात्री देतो.

       ह्या पुढील भागात आपण शहामृग ( इमू ) पालनातील आहार व्यवस्थापन , अर्थकारण व आरोग्य व्यवस्थापन विषयक माहिती घेऊ.

शहामृग (इमू) पालन : भाग १

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.