शहामृग [इमू] साधारणपणे वयाच्या 18 महिन्यांनंतर अंडी द्यायला सुरुवात करतात. दरवर्षी ते थंडीच्या महिन्यात 35 ते 40 अंडी देतात. हे अंडे 600 ते 800 रु. दराने विकले जाते. एक पक्षी सुमारे 35 ते 40 वर्षे जगतो. कोंबडी, मेशी गवत, पालेभाज्या यांसारख्या खाद्यावर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत प्रचंड रोगप्रतिकारक शक्ती असणारा हा पक्षी पूर्ण वाढीनंतर 40 ते 50 किलो वजनाचा व सहा फूट उंचीचा होतो.
कल्पवृक्षाप्रमाणे हा शहामृग कल्पपक्षी म्हणावा लागेल. कारण त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव, अंगावरची पिसे यांचा उपयोग करता येतो. आयुर्वेदिक औषधे व तेले या प्राण्यापासून बनवली जातात. इमू पक्षाचे अंडे नारळाच्या आकाराचे असते.
शहामृगाच्या मासांलाही पंचतारांकित हॉटेलांमध्ये 300 ते 400 रु. प्रतिकिलो दराने मागणी असते. या प्रकल्पातून कमी खर्चात, कमी काळात नोकरीपेक्षा जास्त उत्पादन मिळवून देणारा हा व्यवसाय तरुणांनी करावा.
दुष्काळी भागात शेतीपूरक व्यवसाय व नोकरीच्या शोधात असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना अपेक्षित अर्थसाह्य मिळवून देणारा इमू (शहामृग) प्रकल्प आहे.
इमू हा ऑस्ट्रेलियातील पक्षी आहे..
इमू पक्षाची उंची ५-६ फूट असते व तो ३०-४० वर्ष जगतो.
एकून १२-१५ महिन्यात या पक्षाची वाढ होते व तो १८-२४ महिन्यात अंडी देतो,एक पक्षी २५-३० अंडी देतो.
जास्त तापमानात सुद्धा हा पक्षी तग धरू शकतो.
एका पक्षाला प्रती दिवसाला ४०० ग्रॅम खाद्य लागते.
एकूण ४ माद्यांसाठी १ नर असे प्रमाण ठेवावे.
नेहमीच्या अंडयातील प्रथिनांपेक्षा जास्त प्रथिने इमू (शहामृग)च्या अंडयात असतात व एका अंडयाची किंमत रू. ६००/- पर्यंत असते.
इमू पालनाच्या दोन पद्धती :
१) मोकाट शहामृग पालन,
२) अर्धबंदिस्त शहामृग पालन
१) मोकाट पद्धत : या पद्धतीत पक्षी नैसर्गिक व मोकळ्या वातावरणात राहतात. निसर्गात उपलब्ध असणारे खाद्य व किडे खातात. रात्रीच्या वेळेस त्यांना हाकारा
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.