शहामृग (इमू) पालन : भाग १

0

दिवसेंदिवस हवामानात होणारे बदल, पावसाची अनियमितता, पाण्याची कमी इत्यादी कारणांमुळे शेती व्यवसाय बिकट अवस्थेतून जात आहे. अश्यासमयी शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यास तारून नेऊ शकतात. चला माहिती घेऊ या अश्याच एका व्यवसायाची जो शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यात मदतगार ठरू शकतो – शहामृग किंवा इमू पालन.

शहामृग ( इमू )

इमू रॅटाइट (ratite) समूहाचे घटक आहेत आणि त्‍यांचे मांस, अंडी, तेल, त्वचा आणि पंख ह्यांचे आर्थिक मूल्य उच्‍च आहे. हे पक्षी विविध हवामान व परिस्थितीशी जुळवून घेतात. इमू आणि शहामृग हे दोन्ही पक्षी भारतात सादर झाले असले तरी इमू संवर्धनास जास्‍त महत्व प्राप्त झाले आहे. उडू न शकणार्‍या पक्ष्‍यांचे पंख विकसित नसतात आणि ह्यांमध्‍ये इमू, शहामृग, रिया, कॅसोवरी आणि किवी समाविष्‍ट आहेत. इमू आणि शहामृग व्यापारी महत्‍वाचे पक्षी असून त्‍यांचे मांस, तेल, त्वचा आणि पंख ह्यांना चांगला बाजारभाव आहे. ह्या पक्ष्‍यांची रचनात्मक आणि शारीरिक वैशिष्‍ट्ये समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय हवामान परिस्थितीसाठी उपयुक्त अशी आहेत. शेतावरील मोकळ्या तसेच अर्धबंदिस्त पध्‍दतींद्वारे यथोचित प्रकारे उच्च तंतुमय आहार देऊन ह्या  पक्ष्‍यांना वाढवता येते. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि चीन इमू संवर्धनात आघाडीवर आहेत. इमू पक्षी भारतीय हवामानाशी चांगल्‍या प्रकारे जुळवून घेतात.

इमूची वैशिष्ठ्ये

१) इमूची मान लांब असते, तुलनेने लहान बोडके डोके, पायांना तीन बोटे आणि शरीर पिसांनी झाकलेले असते. सुरूवातीला ह्या पक्ष्‍यांच्‍या अंगावर उभ्या पट्ट्या असतात (वय 0-3 महिने) मग हळू-हळू 4-12 महिन्‍यांत त्या भुर्‍या रंगाच्‍या होतात.

२) प्रौढ इमू पक्ष्‍यांची बोडकी मान निळी तर शरीरावर नक्षीदार पिसे असतात.

३) प्रौढ इमू पक्ष्‍यांची उंची सुमारे 6 फूट असून 45-60 किलो वजन असते.

४) इमूंचे खवल्‍यांसारची त्‍वचा असलेले लांबलचक पाय कडक आणि कोरड्या मातीकरिता योग्य आहेत.

५) इमू चे नैसर्गिक अन्न किटक, वनस्पतींची कोवळी पाने, आणि केरकचरा आहे. हे पक्षी गाजर, काकडी, पपई   इत्‍यादींसारख्‍या भाज्‍या आणि फळे खातात.

६) इमूंमधील मादी आकाराने जास्‍त मोठी तसेच वर्चस्‍व गाजविणारी असते, विशेषत: प्रजनन  काळात.

७) इमू ३० वर्षे जगतात. आणि १६ वर्षांपेक्षा जास्त काळ ते अंडी देतात.

८) इमू पक्ष्‍यांचा कळप किंवा जोड्या बाळगता येतात.

 

पिल्लांचे व्यवस्थापन

१) इमूची पिल्‍ले सुमारे ३७० ते ४५० ग्रॅम वजनाची असतात (अंड्याच्‍या सुमारे ६७% वजनाची ) अर्थात हे वजन अंड्याच्‍या आकारावर अवलंबून असते.

 

२) पहि‍ले ४८ ते ७२ तास, इमूच्‍या पिल्‍लांना पिवळ्या बलकाचे (योक) वेगाने शोषण व्हावे व ती कोरडी राहावी ह्यासाठी इन्क्युबेटरमध्ये म्हणजे गरम पेटीत ठेवतात.

 

३) पिल्‍लांचा जन्‍म व्‍हायच्‍या आधीच शेड स्वच्छ आणि जंतुसंसर्गरहित करून ठेवा. तांदुळाचा भुसा पसरून तो रिकामी पोती इत्‍यादीने झाका ज्‍यायोगे पिल्‍लांना त्रास होणार नाही.

 

४) पहिले ३ आठवडे सुमारे २५ ते ४० पिल्‍लांसाठी दर पिल्‍लास ४ चौरस फूट जागा मिळेल या हिशेबाने ब्रूडरचा वापर करा. पहिल्‍या १० दिवसांत ९० डिग्री फॅ. ब्रूडिंग तापमान पुरवा आणि ३ – ४ आठवडे ८५ डिग्री फॅ. राहू द्या. योग्‍य तापमानावर ब्रूडिंग (वीण) यशस्‍वी होते.

 

५) एक लीटर क्षमता असलेले पाण्‍याचे मग पुरवा आणि ब्रूडरखाली तितकेच फीडर ट्रफ (हौद) द्या.

 

६) चिक गार्ड म्हणजे जाळीची उंची २.५ फूट असली पाहिजे ज्‍यायोगे पिले तीवरून उडी मारून इकडे-तिकडे जाऊ नयेत.

 

७) ब्रूडर शेडमध्‍ये प्रत्‍येक १०० चौ.फू. क्षेत्रात ४० वॅटचा एक बल्‍ब लावा.

 

८) ३ आठवड्यांनंतर, हळू-हळू चिक गार्डचे क्षेत्र वाढवा आणि पिल्‍ले ६ आठवड्यांची झाल्‍यावर नंतर ते काढून टाका. पहिल्‍या १४ आठवड्यांत किंवा त्‍यांचे वजन १० कि.ग्रॅ होईपर्यंत त्‍यांना स्‍टार्टर मॅश खायला द्या.

 

९) पक्ष्‍यांना हालचाल करण्‍यासाठी योग्‍य तितकी जागा आहे की नाही ह्याची खात्री करून घ्‍या कारण  त्‍यांच्‍या आरोग्‍यमय जीवनासाठी हे गरजेचे आहे. ३० फुटांची रन स्‍पेस म्‍हणजे मोकळी जागा पाहिजे, म्‍हणून सुमारे ४० पिल्‍लांसाठी ४० x ३० फुटांची जागा हवी, जर बाहेर जागा असेल तर. फरशी सहज कोरडी होणारी व ओलसरपणा नसलेली हवी.

 

हे करा

  

  • पहिल्‍या काही दिवसांसाठी स्‍वच्‍छ केलेले पाणी व एँटी-स्‍ट्रेस औषधे द्या.
  • दररोज स्वच्छ पाणी ठेवा.
  • पक्ष्‍यांचा आराम, अन्न पाण्याचे सेवन, विष्ठेची स्थिती ह्यांचे रोज निरीक्षण करा. गरजेनुसार लगेच सुधारणा करा.
  • पिल्‍लांच्‍या आरोग्‍यमय वाढीसाठी त्‍यांच्‍या आहारांत योग्‍य ती खनिजे व जीवनसत्‍वे असल्‍याचे सुनिश्चित करा आणि पाय फेंगडे होण्यापासून त्‍यांचा बचाव करा.
  • उत्‍कृष्‍ट संवर्धनासाठी ऑल-इन-ऑल-आउट पध्‍दतींचा वापर करा.

 

हे करू नका

  • दिवसातील ऐन गरमीच्या वेळेत पक्ष्‍यांना हाताळू नका.
  • पक्षी सहज उत्तेजित होतात. म्‍हणून, खुराड्यामध्‍ये शांत आणि सौम्‍य वातावरणाची आवश्यकता असते.
  • पक्षी चटकन कोणत्‍याही वस्‍तूवर झडप घालतात, म्‍हणून खिळे, लहान खडे इत्‍यादिंसारख्‍या वस्‍तू पक्ष्‍यांच्‍या झडपेच्‍या सीमेत ठेवू नयेत.
  • फार्ममध्‍ये अपरिचित व्यक्ती, सामग्री आणू नका. योग्‍य ती जैविक सुरक्षितता पाळणे आवश्‍यक आहे.
  • पक्ष्‍यांना कधीही भुशाच्‍या बिछान्‍यावर थेट ठेवू नये कारण लहान पिले धावपळ करीत राहतात आणि ह्यामुळे त्‍यांचा पाय घसरून पडण्‍याची, पाय मोडण्‍याची शक्‍यता आहे.

या पुढील भागात इमू पालनाविषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

https://krushisamrat.com/ostrich-rearing/

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.