• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 5, 2021
  • Login
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result
Home शेतीपुरक उद्योग

अळींबी लागवड

Team Krushi Samrat by Team Krushi Samrat
November 6, 2018
in शेतीपुरक उद्योग
1
अळींबी लागवड
Share on FacebookShare on WhatsApp

अळींबी ही एक बुरशी वर्गातील वनस्पती असून तिलाच भूछत्र किंवा टेकोळे असे देखील म्हणतात. इंग्रजीत मशरुम असे संबोधतात. पावसाळ्यात कुजणार्‍या पाल्यापाचोळ्याच्या ढिगार्‍यावर किंवा कुजणार्‍या लाकडावर विविध प्रकारच्या अळींबी निसर्गत: वाढताना आढळून येतात. ही बुरशी जातीतील वनस्पती असल्यामुळे तिच्यामध्ये हरितद्रव्ये नसतो. त्यामुळे ती स्वत:चे अन्न तयार करू शकत नाही आणि त्यांना अन्नासाठी कुजणार्‍या सेंद्रिय पदार्थांवर अवलंबून रहावे लागते. आतापर्यंत संकलीत केलेल्या माहितीवरून असे आढळून आले आहे की, पृथ्वीतलावर अळिंबीच्या जवळजवळ दोन हजार जाती ज्ञात आहेत. त्यापैकी 180 प्रकारच्या 70 कुळात मोडणार्‍या अळींबी भारतात आढळून येतात. यापैकी काही अळींबी उदा. व्होल्वेरियल्ला, प्ल्युरोटस, लेन्टीन्स आणि गरिकस या अळींबीची अनादिकाळापासून लागवड करण्यात येते. तथापि व्यापारीदृष्ट्या एक उद्योेग म्हणून अळींबीची लागवड 19 व्या शतकातच प्रचलित झाली आहे. सद्या दोन डझन विविध प्रकारच्या व्यापारी तत्वावर जगभर लागवड केली जाते.

अळींबीचे महत्वः
अळींबी खाण्यास स्वादिष्ट तर असतेच त्याशिवाय तिच्यामध्ये प्रथीने, जीवनसत्वे व खनिजे विपूल प्रमाणात असतात. अळींबीमध्ये साधारणपणे 3.5 टक्के प्रथीने असतात. हे प्रमाण आपल्या नेहमीच्या भाज्यांपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. याशिवाय या प्रथिनांची पाचकता 70 ते 90 टक्के इतकी असते. अळींबीस एक विशिष्ट प्रकारचा स्वाद असतो. जीवनाश्यक अमिनो आम्ले व ब, क, ड ही जीवनसत्वे विपुल प्रमाणात असतात. अळींबीमध्ये लोह, कॅल्शीयम, पोटॅशियम आणि फॉस्फरस ही खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. मधुमेह असणार्‍या व्यक्तीस कमी उर्जा व जास्त प्रथिनांचा आहार सूचविला जातो. अळींबी हे कमी ऊर्जा व जास्त प्रथिनेयुक्त अन्न आहे. अळींबी कार्बोदकामध्ये स्टार्च व शर्करा नसतात, ज्या मधुमेहींना वर्ज्य आहेत. त्यामुळे अळींबी हे मधुमेहींना एक औषध ठरते. धिंगरी अळींबीमध्ये मिथिओनिन जास्त प्रमाणात असते. ते यकृताच्या आरोग्यासाठी हितकारक असून कावीळ व यकृत उत्तकमूल्य यापासून बचाव करते.
अळींबीमध्ये उर्जा, स्निग्धता, संयुक्त स्निग्ध आम्ले आणि सोडीयम याचे प्रमाण कमी असून ते कोलेस्टेरॉलमुक्त आहे. उच्च रक्तदाब व रोहिणी काठीण्य या रोगांच्या नियंत्रणासाठी एक उत्तम अन्न आहे. अळींबीमध्ये इव्हॅनिन नावाचा रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणारा घटक आढळून आला आहे. हा घटक चयापचयाची रक्तातील गती व कोलेस्टेरॉल उत्सर्जनाचे प्रमाण वाढवितो. इतकेच नव्हे तर अळींबीच्या सेवनाने ट्रायग्लीसराईड व फॉस्फोलिपीडच्या पातळीवरही नियंत्रण ठेवले जाते.
अळींबीमध्ये असलेल्या जलद्राव्य बहुशर्करामुळे कर्कपेशीच्या वाढीवर नियंत्रण येते. हा घटक कॅन्सर पेशींच्या श्‍वासोच्छवास प्रक्रीयेला विरोध करतो, म्हणून अळींबी कॅन्सरसारख्या रोगावर उपयुक्त आहे. संशोधनाने सिध्द केलेल्या अळींबीच्या असाधारण बहुरंगी, बहुगुणांचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
अळींबी हे शेतातील वाया जाणार्‍या काडीकचर्‍यावर वाढविता येते. प्रथिनांच्या उत्पादकतेचा विचार केल्यास अळींबीची प्रती हेक्टर उत्पादकता इतर कोणत्याही पिकापेक्षा जास्त आहे. अळींबीचे वैशिष्टे असे की, हिच्या लागवडीसाठी कोणत्याही प्रकारची सुपीक जमिनीची आवश्यकता नाही तर हे घरात घेण्यासारखे, सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसणारे व सेंद्रीय पदार्थांवर वाढणारे पीक आहे. प्रत्येक हवाई घनफळाचा उपयोग करून अळींबीची उत्पादकता वाढविता येते. आपल्या देशात 6 दशलक्ष टनाहून अधिक शेती अवशेषांची प्रतीवर्षी निर्मिती होते. त्याचा प्रभावीपणे उपयोग अळींबी उत्पादनासाठी करता येतो.

अळींबीचे वर्गीकरणः
माध्यमाच्या आवश्यकतेनुसार खाण्यायोग्य अळींबीचे 5 प्रकार आहेत.
वनस्पतीच्या ताज्या अवशेषांवर वाढणारी अळींबी.
उदा. लेन्टीनस, फ्ल्म्युलीना, रिक्युलेरिया, फोलिओटा, ट्रेमेला, प्ल्युरोटस
2. अर्धवट कुजलेल्या सेंद्रीय पदार्थांवर वाढणारी अळींबी – उदा. व्होल्वेरियल्ला, स्ट्रोफेरिया, कोप्रिन्स, 3. संपूर्णपणे कुजलेल्या सेंद्रीय पदार्थांवर वाढणारी अळींबी- उदा. गॅरिकस. 4. माती व सेंद्रीय पदार्थांवर वाढणारी अळींबी- उदा. लेपिओटा, मोर्चेला
5. उच्च वनस्पतीच्या मुळांवर वाढणारी अळींबी – उदा. ट्युबर, मोर्चेला, लॅक्टॅरिअम, केनथारेलस.
आपल्या देशात तीन प्रकारच्या अळींबीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. या अळींबींना त्यांच्या वाढीसाठी एका विशिष्ट तापमानाची गरज असते. व्यापारीतत्वावर अळींबीची लागवड करण्यापूर्वी या विशिष्ट तापमानाची आवश्यकता लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या देशात व्यापारी तत्वावर लागवड करण्यात येणार्‍या अळींबीच्या जाती व त्यांच्या वाढीस लागणारे अनुकूल तापमान खालील प्रमाणे आहे.

अळींबीच्या जातीः अनुकूल तापमान
1. बटन अळींबी किंवा युरोपियन अळींबी
(गॅरिस बायस्पेारस)
अ. वाढीसाठी 24 ते 26 सें. ग्रे.
ब. पिकासाठी 16 ते 18 से. ग्रे.
2. धिंगरी अळींबी ओएस्टर अळींबी (प्ल्युरोटस)
20 ते 30 से. ग्रे.
3. भाताच्या काडावरील अळींबी (व्होल्वेरियल्ला)
30 ते 40 से. ग्रे.
धिंगरी अळींबीची लागवड
यासाठी भाताचा पेंढा, गव्हाचे काड, उसाचे पाचट, कापसाचे काड, सोयाबीनचे काड किंवा कोणत्याही वनस्पतीचा किंवा पिकाचा पालापाचेाळा
स्पॉन (अळींबी बी) यांचा वापर करावा. 35 बाय 50 से. मी. मापाची प्लॅस्टिकची पिशवी, काड भिजविण्याची टाकी, लागवडीचे यंत्र.
प्रथम अळींबी लागवडीस वापरायचे काड किंवा पालापाचोळ्याचे 3 ते 4 सें. मी. लांबीचे तुकडे करून घ्यावेत. ते पोत्यात भरून स्वच्छ पाण्यात 10 ते 12 तास भीजत घालावेत. त्यानंतर ते पाण्यातून काढून 4 तास निचरत ठेवावे, म्हणजे जास्तीचे पाणी त्यातून निघून जाईल.

काडाचे निर्जतुकीकरण :
या प्रक्रियेमुळे काडावर व पाण्यात असलेल्या वेगवेगळ्या जंतुंचा नाश होतो. हे निर्जंतुकीकरण करण्यासाठी काड 80 ते 85 सें. ग्रे. तापमानाच्या पाण्यात 30 ते 45 मिनिटे बुडवून काढावे अथवा उकळत्या पाण्यात 10 ते 15 मिनीटे बुडवावे. काडाचे पोते पाण्यात पूर्ण बुडून जाईल, याची काळजी घ्यावी. या काडाचे रासायनिक निर्जंतुकीकरण सुध्दा करता येते. त्यास 7.5 ग्रॅम बाविस्टीन + 125 मि.ली. फॉर्मेलीन 100 लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये काड 15 तास भिजत ठेवावे. निर्जंतुकीकरणानंतर पाण्याचा निचरा करण्यासाठी पोते तिवईवर सावलीत ठेवावे.
निर्जंतुक केलेले काड प्लॅस्टिकच्या पिशवीत भरतांना स्वच्छतेची खबरदारी अतिशय महत्वाची असते. त्यासाठी पिशवी भरण्याची जागा स्वच्छ, निटनेटकी व बंदिस्त असावी. लागणारे सर्व साहित्य 2 टक्के फॉर्मेलिनने निर्जंतुक करावे. प्रथम पिशवीच्या तळाशी 2 ते 3 इंच काडांचा थर ठेवून त्यावर स्पॉन पेरावे. काड भरत असतांना ते तळहाताने हलकेसे दाबावे. काड, स्पॉन याचे एकावर एक याप्रमाणे 5 ते 6 थर भरावेत. नंतर पिशवीचे तोंड घट्ट बांधून सर्व बाजुंनी 20 ते 25 ठिकाणी छोट्या खिळ्याने किंवा दाभणाने छिद्रे पाडावीत. त्या पिशव्या मांडणीच्या कठ्यावर किंवा तिवईवर स्वच्छ व बंदिस्त ठिकाणी ठेवाव्यात.
काडावर अळींबीच्या बुरशीची पूर्ण वाढ 25 सें. ग्रे. तापमान 15 दिवसात होऊन काड्याचा रंग पांढरा दिसतो. टाचणीच्या टोकाएवढी अळींबी प्लॅस्टिकच्या पिशवीत दिसू लागल्यास वरील पिशवी ब्लेडने अलगद कापावी व वेगळी करावी. बेड 15 सें. मी. अंतर ठेवून ओट्यावर ठेवावेत. हवामानावर बेडवर दिवसातून 2 ते 3 वेळेस पाण्याची फवारणी करावी. जमिनीवर व भिंतीवर पाणी शिंपडून खोलीत आर्द्रता 85 टक्यांपर्यंत राहील याची काळजी घ्यावी. पुढील 3 ते 4 दिवसांत 8 ते 10 सें. मी. व्यासाची पांढरी किंवा करड्या रंगाची शिंपल्यासारखी अळींबी तयार होते. पक्‍व अळींबी काढण्यापूर्वी 4 – 6 तास अगोदर बेडवर पाणी शिंपडू नये. पूर्ण वाढलेली अळींबी स्वच्छ चाकू किंवा ब्लेडच्या सहाय्याने हळुवार कापून घ्यावी. त्यानंतर स्वच्छ करुन अळींबी सछिद्र प्लॅस्टिकच्या पिशव्यात भरुन विक्रीसाठी पाठवावीत. पूर्ण वाढ झालेली अळींबी काढल्यानंतर 2 ते 3 वेळेस पाणी घालावे. साधारणपणे 8 – 10 दिवसांनी दुसरे तर परत 8 ते 10 दिवसांनी तिसरे पीक त्याच बेडवर तयार होते. दोन किलो वाळलेल्या काडाच्या एका बेडपासून 45 दिवसात 1.50 ते 1.75 किलो अळींबीचे उत्पादन मिळते.

अळींबी वाळवून ठेवण्याची पध्दत :
जरुरीपेक्षा जास्त अळींबी तयार झाल्यास अथवा वाळविलेल्या अळींबी विकावयाची असल्यास गार पाण्यात प्रथम अळींबी स्वच्छ धुवावी. त्यानंतर पातळ फडक्यात अळींबी बांधून ती उकळत्या पाण्यात 3 ते 4 मिनीटे ठेवावी. त्यानंतर ती गार पाण्यात ठेवून थंड करावी. या प्रक्रीयेला ब्लॅचिंग म्हणतात. अळींबीतील जादा पाणी काढून झाल्यावर ती उघड्यावर परंतु सावलीत वाळवावी. अळींबी पूर्ण वाळल्यावर प्लॅस्टिकच्या पिशवीत भरुन सील करावी.
अळींबी उत्पादन प्रथम 20 हजार रुपयांची गुंतवणूक करून फायदेशिररित्या उत्पादन सुरु करता येईल.
अळींबीवरील रोग व त्यांचे नियंत्रण

बुरशीमुळे होणारे रोग :
मऊ भुरी रोग किंवा कॉबवेब रोग (सॉफ मिल्डयू), तपकिरी बुरशीचा मुलामा (ब्राऊन पलास्टर मोल्ड), कोरडा फुगा (ड्राय बबल), भूमिगत अळींबी रोग (फाल्स ट्रफल).

ट्रायकोडर्मामुळे होणारे रोग
जीवाणुमळे होणारे रोग  तांबड्या आकाराचे ठिपके किंवा जीवाणंचे ठिपके (ब्राऊन ब्लॉच किंवा बॅक्टेरीअल स्पॉट).

नियंत्रणाचे उपाय :
या रोगाचा प्रसार अपूर्ण निर्जंतुक केलेली माती, रोगाची लागण झालेले इतर साहित्य यामुळे होतो. म्हणून अळींबी लागवडीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य निर्जंतुक करुनच वापरायला हवे. अळींबीच्या खोलीतील आर्द्रता 80 टक्कयापर्यंत ठेवावी. क्लोरीनच्या पाण्याचा वापर करावा, त्यामुळे रोगाची लागण कमी होण्यास मदत होईल.
वापरात असलेले सर्व साहित्य फॉर्मेलीनच्या 4 – 5 टक्के द्रावणाने निर्जंतुक करावे, केसिंगसाठी वापरण्यात येणारे मिश्रण निर्जंतुक करुनच वापरावे, लागण झालेल्या ट्रेला निर्जंतुक करुनच पुढील कामासाठी वापरावे.

अळींबीवरील किडी आणि त्यांचे नियंत्रण:
ज्याप्रमाणे शेतातील पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो, त्याच प्रमाणे अळींबीवर सुध्दा विविध किडींची लागण होत असल्याचे आढळून आलेले आहे. अळींबीवर प्रामुख्याने सियारीड माशी, फोरिड माशी, सेशिडस माशी, माईटस (कोळी), सूत्रकृमी व स्प्रिंग टेल्स या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडी अळींबीवर हल्ला करुन त्याची कुज घडवून आणतात. काही किडी कंपोस्ट व अळींबीवर अंडे घालून त्यावर उपजीविका करतात. त्याचप्रमाणे अळया अळींबीच्या देठांना पोखरुन खातात. त्यामुळे अळींबीची वाढ खुंटते व परिणामी उत्पन्नावर फरक पडतो.

नियंत्रणः
सियारिड माशी, फोरिड माशी, सेशिडस माशांना आकर्षित करुन घेण्यासाठी स्पॉनिंग रुममध्ये चिकट सापळयाचा वापर करावा. पायरेथ्रिन्स (0.03 टक्के) या द्रावणाची फवारणी माशांचा प्रादुर्भाव दिसताच करावी. अळींबीच्या वाढीच्या वेळेस सर्व ठिकाणी स्वच्छता पाळावी. ज्या लाकडी ट्रेवर अळींबीचे उत्पादन घ्यावयाचे आहे, तो लाकडी ट्रे दोन टक्के सोडियम पेन्टाक्लोरिफेनेटच्या द्रावणात बुडवून घ्यावेत. सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी 40 मि. ली. निमॅगॉन 10 लिटर पाण्यात मिसळून कंपोस्टमध्ये फवारावे. माईटस या किडीच्या नियंत्रणासाठी लिन्डेन पावडर (0.65 टक्के) दर 100 किलो कंपोस्टमध्ये 800 ग्रॅम या प्रमाणता मिसळावी.

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

https://whatsapp.heeraagro.com

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.
Tags: Sausage plantingअळींबी लागवड
Team Krushi Samrat

Team Krushi Samrat

Related Posts

कालावधी लॉकडाऊनचा, मासळी उत्पादनाचा!
शेतीपुरक उद्योग

कालावधी लॉकडाऊनचा, मासळी उत्पादनाचा!

May 4, 2020
flower-farming
बातम्या

करोनामुळे फूलशेती अडचणीत

April 4, 2020
ठंड के मौसम में पशुपालन कैसे करें ?
शेतीपुरक उद्योग

ठंड के मौसम में पशुपालन कैसे करें ?

December 24, 2019

ताज्या बातम्या

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

by Team Krushi Samrat
October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

by Team Krushi Samrat
October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

by Team Krushi Samrat
October 16, 2020
परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास
शेती

परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास

by Team Krushi Samrat
October 16, 2020
खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव
शेती

खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव

by Team Krushi Samrat
October 15, 2020
कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक
शेती

कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक

by Team Krushi Samrat
October 15, 2020
२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित
शासकीय योजना

२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित

by Team Krushi Samrat
October 10, 2020
अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान
शेती

अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान

by Team Krushi Samrat
October 10, 2020
करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न
शेती

करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न

by Team Krushi Samrat
October 10, 2020
Prev Next

About us

Krushi Samrat

कृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अवजारे
  • आयुर्वेदिक नुस्खे
  • कायदा
  • कृषीसम्राट सल्ला
  • तंत्रज्ञान
  • प्रेरणा
  • प्रेरणादायक गोष्टी
  • बातम्या
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासकीय योजना
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • हवामान
  • हिन्दी

Recent News

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In