खरोखरच बडी आहे बडीशोप

2

घरातील जेवण असो किंवा लग्नाच्या पंगती जेवण अपूर्ण असते ते बडीशोपे शिवाय. लग्नात जेवल्यानंतर हातात येते ती बडीशेपची पुडी तर  घरी जेवल्यानंतर हातात येतो तो डबा  भाजून ठेवलेल्या बडीशोपेचा. मुखशुद्धी व पचनासाठी अत्यंत उपयोगी बडीशेप औषधी म्हणूनही वापरली जाते. यात फिंकोन नावाचा स्वादकारक घटक असतो. बी लहान, पिवळट हिरव्या आणि करडय़ा रंगांचं असून त्यावर रेषा असतात. त्याला काहीसा गोड वास असतो.

कुठे कुठे वापरली जाते?

  • बडीशेपचा वापर आता मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने सॉस, टूथपेस्ट, सूप्स, आदींमध्ये वापर केला जात आहे.
  • लोणची, बेकरी पदार्थात, मसाल्यात बडीशोपेचा वापर केला जातो.
  • मुखशुद्धीसाठी ती जेवणानंतर बडीशोप खाल्ली जाते.
  • सध्या हर्बल टीचे खूप फॅड आहे त्यातही बडीशेप वापरली जाते.
  • रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि गोवा, कारवार या ठिकाणी माशांच्या कालवणाच्या जेवणात बडीशेप हमखास वापरली जाते.आसाम, बंगाल, ओडिशा येथे पाच विविध मसाले महत्त्वाचे मानले जातात. त्याला ‘पंच पोहरण’ म्हटले जाते.
  • बडीशेपमध्ये एनिथॉल नावाचा घटक असतो, ज्यामुळे तिला औषधी स्वरूप प्राप्त झाले आहे.मानव व प्राण्यांच्या शरीरात गॅसवातचा त्रास झाला तर बडीशेप गुणकारी मानली जाते.

 

बडीशोपचे उपयोग

– बडीशोप ही भूक वाढवणारी असून अन्नपचन नीट घडवण्यास मदत करते.

– मूत्रप्रवृत्ती वाढवणारी आहे. त्यामुळे किडनीचं कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते.

– बडीशेपबरोबर खडीसाखर सामान प्रमाणात घेतल्यास डोळ्याची दृष्टी स्वच्छ होऊन आपली नजर तीक्ष्ण करण्यास मदत होते.

– बडीशेप साखरेबरोबर बारीक चूर्ण करून घेतल्यास बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर करण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी हे चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास पोटाच्या समस्या कमी होऊन बद्धकोष्ठता आणि गॅस दूर होण्यास मदत होते.

– नियमितपणे जेवून झाल्यावर बडीशेप खाल्यामुळे जेवण चांगले पचायला मदत होते. जेवणानंतर बडीशेप, काळे मीठ आणि जिरे घेऊन हे पाचक चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास जेवण पचण्यास मदत होते.

– खॊकाला झाला असल्यास बडीशेप आणि मध एकत्र घेतल्याने खोकला कमी होण्यास मदत होते.

– जर पोटात दुखत असल्यास भाजलेली बडीशेप खाल्यास पोटदुखी कमी होते. बडीशेपची थंडाई बनवून प्यायल्यास शरीराला थंडावा मिळतो तसेच जीव घाबरल्यासारखा होण्याचेही प्रमाणही कमी होते.

https://krushisamrat.com/benefits-of-tulsi/

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

2 Comments
  1. black-rice

    […] खरोखरच बडी आहे बडीशोप […]

  2. […] खरोखरच बडी आहे बडीशोप […]

Leave A Reply

Your email address will not be published.