समस्यायुक्त पाणी -एक गंभीर प्रश्न.

0

समस्यायुक्त पाणी म्हणजे जमीनीची आणि पिकांचा नासाडी !     

सिंचनाच्या पाण्याच्या परीक्षण व समस्येचे योग्य निदान करणे आज खूप महत्वाचे आहे. पाण्याची गुणवत्ता सिंचनासाठी योग्य नसल्यास शास्त्रोक्त उपाय योजने गरजेचे आहे. सिंचनाच्या पाण्याच्या योग्य व्यवस्थापने मुळे जमिनीचे आरोग्य टिकवता येते. पाण्याचा

सिंचनाच्या पाण्याची प्रत योग्य नसल्यास……..

१) क्षारयुक्त पाण्याचा सिंचनासाठी वापर केल्यास पाण्यातील विद्राव्य क्षार जमिनीत त्यांचे प्रमाण वाढत जाते.जास्त चिकण माती असलेल्या जमिनी, उताराचा अभाव आणि अवर्षण ह्यांच्यामुळे क्षारांचे प्रमाण वाढत जाऊन जमिनी क्षारयुक्त होतात. अश्या जमिनीत पाणी व अन्नद्रव्ये यांचे पिकांकडून शोषण होत नाही.

२) क्षारांचा पिकांवर विषारी परिणाम होतो. परिणामी पिकांची वाढ खुंटते, बियाण्याची उगवण कमी होते, मुळांची टोके मरतात आणि त्याचा आतील परिणाम पिकांवर दिसून येतो. अशा जमिनी अन्नद्रव्यांची कमतरता होऊन सुपीकता कमी करते.

३) ऊष्ण हवामानाच्या प्रदेशात कमी पावसाच्या परीस्थितीत जमिनितील क्षार धुवून जाण्याचे प्रमाण कमी होऊन ते साचत जातात आणि परिणामी हळूहळू ही गंभीर समस्या निर्माण होत आहे.

४) शहरातील पाण्याचा सतत सिंचनासाठी वापर धोक्याचा ठरू शकतो. विशेषत भाजीपाल्यांच्या पिकांसाठी शहरालगतच्या शेतीमध्ये या सांडपाण्याचा सिंचनासाठी वापर होताना आपणास दिसून येतो. या पाण्याचा जास्त दिवस वापर केल्यास जमिनीत जड धातू साचून ते पिकांवाटे मानवी आहारातून प्रवेशकरू शकतात, त्यामुळे या सांडपाण्याचा वापर प्रक्रिया करूनच सुरक्षित पद्धतीने करावा लागेल.

५) सिंचनाचे पाणी विम्लयुक्त असल्यास अशा पाण्यात क्षार कमी असून सोडीयम चे प्रमाण जास्त असते. अशा पाण्याचा दीर्घकाळ वापर केल्यास कॅल्शीयम, मॅग्नेशियमचे, कार्बोनेट तयार होऊन ते अचल राहतात. मातिच्या कणांवरील सोडियमचे प्रमाण वाढते त्यामुळे जमिनीच्या भौतिक गुणधर्मांवर अनिष्ट परिणाम दिसून येतो.

६) विनिमययुक्त सोडियमचे प्रमाण वाढून जमिनीची संरचना बदलते. जमिनीच्या पृष्ठभागावरच पाणी पिकांना प्राणवायू उपलब्ध होऊ देत नाही. जमिनी चोपण होऊन त्यांचा सामू वाढतच जातो.

७) पिक वाढीसाठी आवश्यक नत्र, लोह, जस्त यांची उपलब्धता कमी होते.

 

काय बरं उपाय योजावे आता ह्यासाठी ?

स्मस्यायुक्त पाण्याचे व्यवस्थापन :-

१) क्षारयुक्त जमिनीच्या परिणामकारक खोलीतून बाहेर काढणे गरजेचे असते. वालुकामय, पोयटाच्या, जाड पोताच्या जमिनीतक्षार निघून जाऊन जमिनीवर विपरीत परिणाम न होता असे पाणी वापरले जाऊ शकते. परंतु भारी चिकन मातीच्या जमिनीत हे पाणी वापरल्यास या जमिनी समस्यायुक्त होतात.

२) पाण्याची प्रत खराब असल्यास योग्य फारसे की उपाय सहजासहज करता येत नाहीत.

३) चुकीचा पद्धतीने पाणी सिंचनासाठी वापरू नये. तपासणी करून सुधारित व्यवस्थापनाचा वापर करावा.

शेतीतील पाणी व्यवस्थापन

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.