रबर काय आहे?
नैसर्गिक रबराचा उगम, रबराच्या झाडाच्या लाटेक्सपासून (कच्चे रबर) झाला. रबराची झाडं स्पर्ग, या प्रकारात मोडतात आणि उबदार, उष्णदेशीय भागात येतात. एकदा रबराच्या झाडाची, साल एखाद्या ठिकाणी काढली की, कच्चे रबर बाहेर वाहू लागते आणि गोळा केले जाते. जेव्हा ते हवेत उघडे ठेवले जाते तेव्हा ते घट्ट होण्यास सुरु होते आणि लवचिक, किंवा “रबरी” बनते. रबराची झाडं, फक्त विषुववृत्ताजवळील गरम, दमट हवामानात टिकून राहू शकतात आणि त्यामुळे, कच्च्या रबराचे, बहुतांश उत्पादन, मलेशिया, थायलंड आणि इंडोनेशिया या आग्नेय आशियाई देशांमध्ये होते. रबर जगात मोठ्ठ्या प्रमाणात वापरले जाते. ते रोजच्या आयुष्यात, उद्योगांत वापरले जाते आणि रबराचा, एक सर्वात सामान्य वापर, म्हणजे “रबर बँड” आहे, जे सामान्यपणे एकाधिक वस्तू, एकत्र ठेवण्यासाठी वापरले जाते. बहुतांश रबर बँडसची निर्मिती नैसर्गिक रबर वापरून केली जाते, याचे प्रमुख कारण, त्याची वरच्या दर्जाची लवचिकता.
रबर बँड शिवाय, रबर उत्पादनांचे, घरगुती तसेच औद्योगिक वापरात, अतिशय विस्तृत आणि विविध उपयोग आहेत. स्टेशनरीतील एक खोड रबर किंवा पावसाळ्यात वापरावे लागणारे शूज, अशा दररोज वापरल्या जाणाऱ्या उदाहरणांवरून आपण ते पाहू शकतो.
रबर हा एक झाडें, झुडपें व वेलींपासून निघणारा पांढरा घट्ट चीक आहे. ह्या चिकास लॅटेक्स असेंहि म्हणतात. चांगल्या रबराच्या झाडापासून मिळणार्या लॅटेक्सपासून शेंकडा २० ते ५० र्प्यंत रबर मिळतें. हा लॅटेक्स त्या झाडाची बाह्यत्वचा व आंतील लांकूड ह्यांच्यामध्यें असल्यामुळें एखाद्या शस्त्रानें त्वचेवर आंतील लांकडापर्यंत पोंचेल अशा बेतानें घाव मारल्यास त्या चिरेंतून तो बाहेर पडतो. हा लॅटेक्स दुधासारखा असून दाट व स्निग्ध असतो. आणि सूक्ष्मदर्शक यंत्रानें त्याची पहाणी केल्यास त्यांत पाण्यासारख्या द्रवामध्यें पुष्कळ बारीक गोल कण तरंगत असलेले दिसतात. हा लॅटेक्स बाहेर येऊन कांहीं वेळ राहिल्यास या गोल कणांचा त्यावर तवंग जमतो व खालीं द्रव राहातो व हळू हळू हे गोल कण घट्ट होऊन कलचुक किंवा रबरस्वरूपांत जातात. कांहीं वेळेस हे कण घट्ट करण्याकरितां ते खूप हलवितात अगर अम्ल, अल्क किवां इतर रासायनिक द्रव्यांचा ते घट्ट करण्याकडे उपयोग करतात. खालीं राहिलेल्या द्रवामध्यें बरीच नत्रप्रचुर द्रव्यें (प्रोटिड्स), कर्वोज्जितें व कांहीं क्षरांचें द्रावण असे पदार्थ असतात. हा लॅटेक्स हवेंत उघडा राहिल्यास हळू हळू घट्ट होत जाऊन नासण्याचाहि संभव असतो; तें टाळण्याकरितां त्यांत थोडेसें अन्न टाकतात. शिसपेन्सिलीनें लिहिलेलें पुसण्याचा याच्या अंगीं धर्म आहे. म्हणून याला ‘रबर’ (पुसणारें) असें इंग्रजी नांव पडलें; व वेस्ट इंडीज बेटांत याचा प्रथम शोध लागला म्हणून याला इंडिया रबर म्हणूं लागले. आतांपर्यंत रबर बहुतेक दक्षिण व पश्चिम अमेरिका, पूर्व व पश्चिम आफ्रिका व आशियामधून येत असे पण त्याच्या वाढत्या खपाबरोबर त्याची लागवड सीलोन, मलायाद्वीपसमूह वगैरे भागांत जोरानें होऊं लागली आहे. पण अद्याप या नवीन झाडापासून जुन्या झाडाप्रमाणें चांगलें रबर मिळत नाहीं कारण झाडांच्या जुनेपणावर रबराचा चांगुलपणा अवलंबून असतो. रबराच्या लागवडीबरोबर त्याचा खपहि मोठया प्रमाणावर आहे आणि रबराची किंमत उतरली तरी त्याचा खप होणार नाहीं असें नाहीं. कारण त्याचे नवीन नवीन उपयोग सुचविण्यांत येत असून उतरत्या किंमतीबरोबर रस्ते करण्याकडेहि त्याचा उपयोग करावा अशी एक सूचना आहे.
रबराचीं झाडें.-
(१) ब्राझीलमधील हेव्हिआ ब्रॅसिलीन्सिसपासून पॅरा नांवाचें पहिल्या नंबरचें रबर मिळतें. ही झाडें ब्राझीलमध्यें पुष्कळ असून त्यांनीं जवळजवळ १ लक्ष चौरस मैल क्षेत्र व्यापलें आहे. हें झाड उत्तम व गारवा धरणार्या जमिनीमध्यें लागतें. सिलोन वगैरे ठिकाणीं ह्याच झाडाची लागवड केलेली आहे.
(२) मॅनिकोबा रबर हें मॅनिहट ग्लेझिओव्हाय या झाडापासून मिळतें. याहि झाडाची लागवड ब्राझीलमध्यें बरीच असून इतर ठिकाणींहि आहे. हें झाड कोरडया व खडकाळ पण बर्याच उंचीवर असलेल्या व फार पाऊस पडत नसलेल्या जमिनीवर चांगलें येतें. ह्या झाडाची लागवड पूर्व आफ्रिका, सीलोन व दक्षिण हिंदुस्थानांत होत असून त्यापासूनबरें रबर मिळतें.
(३) मध्यअमेरिकेतून येणारें ‘उल’ नांवाचें बरबर कॅस्टिलोआ इलेंस्टिका नांवाच्या झाडापासून काढतात. हें रबर काळसर असून तें टिकण्यासहि पॅरा रबरापेक्षां कमी असतें. ह्या बरराचें झाड सर्द जमिनींतून बरेंच दिसून येतें. ह्यास सुपीक व उत्तम जमीन लागत असून हें नदीच्या कांठीं चांगलें येतें पण दलदलीच्या भागांत याची लागवड होत नाहीं.
(४) रामबाँग किंवा आसाम रबर; हें फिकस-इलास्टिका किंवा इंडिया रबराच्या झाडापासून मिळतें. ह्या झाडाची लागवड हिंदुस्थानांत बरीच होते. हिंदुस्थानांतून बहुतेक याच रबराचा पुरवठा हातो. हीं झाडें सर्द हवेंत चांगलीं येतात. व यांचें अस्तित्व डोंगराळ प्रदेशांतून विशेष दृष्टोत्पत्तीस येतें. (५) लेंगोंस नांवाचें रबर आफ्रिकेंतील रेशमी रबराच्या झाडापासून (सिल्क रबर-ट्री) मिळते. या झाडांशिवाय कांहीं झुडपें आणि वेलींपासूनहि रबर मिळतें. त्यांत लॅंडोल्फिआ नावाच्या वेलीपासून बरें रबर मिळते. ह्या वेली आफ्रिकेंतील जंगलामधून झाडावरून चढलेल्या आढळतात.
रासायनिक पृथक्करण.-रबरामध्यें मुख्यत: कलचुक नांवाचें द्रव्य असतें व त्यावरच रबराचा चांगुलपणा अवलंबून असतो. चांगल्या रबरामध्यें याचें प्रमाण शें. ७० ते ८० पर्यंत असतें. रबराचा रंग त्यांत असणार्या नत्रप्रचुर द्रव्यावर अवलंबून असून त्यांतील राळ त्याच्या टिकाऊपणास घातक असते. रबर पाण्यामध्यें किंव अल्कहलमध्यें विद्रुत होत नसून त्याचें द्रावण कर्बचतुर्हरिद, कर्बद्विगंधकिद, उदोल (बेन्झाल), नॅप्था व क्लोरोफार्म ह्यांमध्यें मिळतें. रबराची व्यापारी रीत्या किंमत तें न तुटतां किती ताणलें जातें व ताणण्यापूर्वीच्या स्थितींत त्यास येण्यास किती वेळ लागतो त्यावर ठरवितात. अद्याप रबराचे रासायनिक गुणधर्म व सारणी निश्चित ठरविली गेली नाही.
रबर व्यापारोपयोगी करण्याकरितां त्यावर कराव्या लागणार्या क्रिया:-कच्चें रबर ऊन पाण्यानें मऊ करून पातळ तुकडे करून खोबणी असलेल्या रुळांत दाबतात. या क्रियेनें त्यांत मिश्रित असलेले वाईट पदार्थ चिरडले जातात व या रुळावरून सारखें पाणी जात असल्यामुळें त्या पाण्याबरोबर ते निघून जातात. ह्या रीतीनें धुतलेल्या रबरामध्यें पाणी सांचतें, तें नाहीसें करण्याकरितां तें उबदार खोलीमध्यें कांहीं दिवस टांगून ठेवतात. हें जलविरहित झालेलें रबर गंधयुक्त करण्यास किंवा दळून (मॅस्टिकेशन) त्याचा गोळा बनविण्यास उपयुक्त होतें. दळून तयार झालेल्या रबराच्या गोळ्यापासून निरनिराळे पदार्थ तयार करून त्या पदार्थांतील निरनिराळे भाग रबराच्या उदोल (बेन्झॉल) मधील द्रावणाच्या योगानें चिकटवितात. ह्यानंतर तें गंधकांत सुमारें १ तासभर ठेवून १४०० उष्णता देऊन तापवितात. ह्या रीतीनें ते पदार्थ बरेच टिकाऊ होतात. अलीकडे त्या गोळ्यांतच त्याच्या वजनाच्या १/१० इतकें गंधक घालून मिश्रणकारी रुळाच्या सहाय्यानें मिसळून तयार करतात. हें रबर तापविलें असतां लवकर मऊ होत असल्यामुळें त्याचा आपणांस पाहिजे तो पदार्थ बनवितां येतो. तयार झालेल्या पदार्थांस १५०० ते १६०० पर्यंत उष्णता देऊन तें टिकाऊ झालें किंवा नाहीं हें पहातात. रबर टिकाऊ करतानां गंधकाचा उपयोग जास्त प्रमाणांत केला तर त्यापासून एबोनाईट नांवाचा एक पदार्थ मिळतो. ह्या पदार्थाचा विद्युच्छास्त्रामध्यें बराच उपयोग होतो. शिवाय ह्या पदार्थांपासून तयार केलेल्या भांडयावर बर्याच रासायनिक द्रव्यांची क्रिया होत नसल्यामुळें रसायनशाळेंत याचा बराच उपयोग केला जातो. रबरामध्यें हिंगूळ किंवा तत्सम द्रव्यें घालून कृत्रिम दांत करण्याकडेहि त्याचा उपयोग करतात.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.