गुलाब हे नुसते नाव घेतले तरी डोळ्यासमोर एक प्रकारचा आकर्षकपणा, ताजेपणा, आनंद दिसतो. मन प्रफुल्लित होऊन जाते. आताच एका खाजगी संस्थेने घेतलेल्या अहवालानुसार “गुलाब” हे जगातील सर्वाधिक प्रिय असलेले फुल आहे. भारतात गुलाबाच्या रानटी जाती फार पूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते. गुलाबाची मनुष्यवस्तीमध्ये पहिल्यांदा लागवड मुघल राजवटीच्या काळात झाली. बाबर याने इ.स. १५२६ साली गुलाबाची काही झाडे आणून यमुनातीरी लावण्याची नोंद आहे. त्यानंतर सौंदर्यसम्राज्ञी नूरजहान या मुघल राणीने गुलाबाचा ध्यासच घेतला होता. तिच्या हौसेखातर बादशाहने अनेक ठिकाणाहून अनेक तऱ्हेचे गुलाब आणले आणि थोड्याच काळात दिल्ली, आग्रा, मथुरा इ. शहरांचे आसपास यमुना नदीचे काठाने गुलाबाची लागवड होऊ लागली. साम्राज्याचे विस्ताराबरोबरच गुलाबही आपोआप दक्षिणेकडे आले. सुरुवातीस गुलाब हे फक्त शौकीन श्रीमंतांचे आणि राजेमहाराजांचेच फुल समजले जाई. मुघल बादशहाप्रमाणेच काही राजपूत राजांनीही त्यांच्या महालात, राजवाडयात आणि बागबगीच्यात गुलाबाचे ताटवे फुलविले. इतर ठिकाणी देवपूजेत आणि वैद्य लोक आयुर्वेदिक औषधात गुलाब फुलाचा वापर करीत असत.
गुलाब फुलाच्या सौंदर्याप्रमाणेच, त्यातील सुवास आणि औषधी गुणधर्माचे मनुष्य चाहता बनला आणि त्यासाठी उपयुक्त असणारे गुलाब गोळा करून त्याची पैदास सुरु झाली. आता संपूर्ण भारतामध्ये विशेषकरून, बंगलौर, म्हैसूर, उटकमंड, बेळगाव, कोल्हापूर, सांगली, पुणे, नाशिक आणि मुंबई ह्या शहरांच्या आसपास गुलाबाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आज एकट्या महाराष्ट्रात गुलाबाखाली लहान मोठ्या बागांमधून ५०० हेक्टर क्षेत्र आहे.
भाग-२ मध्ये आम्ही आपणांस गुलाबाच्या विविध जातींबद्दल माहिती देणार आहोत. तरी अधिकच्या माहितीकरिता कृपया आमच्या पेजला लाईक करायला विसरू नका.
Cradit By: Damodar Tayde
Nanded
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.