वनरोपवाटिका व्यवस्थापन – (भाग – ७)

1

वनरोपवाटिका म्हणजे काय ?

वनरोपवाटिका म्हणजे असे क्षेत्र कि, जेथे उत्तम प्रतीचे व निरोगी वनझाडांची रोपे तयार करून, ती लागवाडी योग्य होण्यासाठी त्यांची योग्य ती काळजी व व्यवस्थापन केले जाते. वनरोपवाटिकेमध्ये प्रत्यक्ष बी रोपण, छाटापासून आणि वनस्पतीच्या विविध भागापासून तयार रोपांचे स्थानांतर करून रोपे निर्मित केली जाते. उत्तम प्रतीच्या रोपवाटीकेसाठी तंत्रशुद्ध पद्धतीने तयार केलेले वाफे, खते, पाणी देण्यासाठी आधुनिक पद्धती, मशिनरी, अवजारे, भांडार, कर्मचारी वसाहत, कुंपण रस्ता इ. गोष्टी आवश्यक असतात. पाण्याच्या उपलब्धतेनुसार रोपवाटीकेचे दोन प्रकार पडतात.

 

शुष्क रोपवाटीका व पाण्याची उपलब्धता असलेली रोपवाटिका : शुष्क वनरोपवाटीकेमध्ये पाण्याचा वापर कमीत कमी केला जातो. शक्यतो पावसाचे आगमन होण्यापूर्वी बियाणे वाफ्यावरती पेरले जाते. या वाफ्यांना इतर कोणतेही संरक्षण, पाणी व्यवस्थापन केले जात नाही.

 

पाण्याची उपलब्धता असलेली रोपवाटिका : या रोपवाटिकेत कृत्रिमरित्या पाणी पुरवठा आणि व्यवस्थापन करून रोपे तयार केली जातात. या रोपवाटिकेत चांगल्या दर्जाची रोपे होतात. पाण्याच्या नियोजनामुळे खत, तण व्यवस्थापन करणेही सोपे होते. या रोपवाटीकांच्या उपयोगानुसार त्यांचे दोन प्रकार पडतात.

 

तात्पुरत्या स्वरुपाची रोपवाटिका : या रोपवाटीकेमध्ये साधारणतः एक ते दोन वर्षांपर्यंत रोपांची वाढ केली जाते. त्यामुळे कोणत्याही कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची गरज नसते. त्यामुळे ही रोपवाटिका शक्यातो जास्त लागवड करणाऱ्या क्षेत्रापाशी केली जाते. त्यामुळे वाहतुकीचा मोठा खर्च वाचण्यास मदत होते.

 

कायम स्वरुपाची रोपवाटिका : सर्व सोयींयुक्त मध्यवर्ती ठिकाणी ही रोपवाटिका असते या रोपवाटीकेसाठी योग्य ती आणखी, रस्ते, देखदेख, वाफे, पाणी व्यवस्थापन,  पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था, खत निर्मिती, बियाण्यांसाठी भांडार, हत्यारे, इ. गोष्टी कराव्या लागतात. या रोपवाटिका मुख्य रस्त्यालगत असतात व त्यासाठी कायमस्वरूपी कुंपण केलेले असते.

वनरोपवाटिकेत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ लागला आहे. बियाणे साठविण्यासाठी कंटेनर, पेरण्यासाठी वेगवेगळे कंटेनर, बियाणे सुप्तावस्था मोडण्यासाठी संप्रेरके, रसायानांचा वापर, पाण्यासाठी मायक्रोस्प्रीन्कलर, फॉगर, खते, सेंद्रियखते , इ. प्रभावी व्यवस्थापन करून आपण रोपवाटिकेचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकतो.

 

रोपवाटीकेसाठी संग्रहित केलेले बियाणे कसे साठवावे ?

आवश्यक असलेल्या प्रजातीचे बियाणे जमा केल्यानंतर ते चांगले वाळवून त्यास बुरशीनाशकांद्वारे संस्करण करून साठ्विल्यास बुरशी रोगापासून बचाव होऊ शकतो. चांगल्या प्रजातींचे बियाणे जमा केल्यानंतर ते चांगले वळवून त्यास कपटन, बाविस्टीन, डायथेन एम-४५ इ. बुरशीनाशकांद्वारे संस्करण करून साठ्विल्यास बुरशी रोगापासून बचाव होऊ शकतो.

 

रोपवाटीका तयार करतांना बियाणांस संस्करण करणे आवश्यक असते का ?

बऱ्याच वनस्पतींची बियांची सुप्तावस्था मोडण्यासाठी बियाणे संस्करण करण्याची गरज पडते. बियाणे संस्करण करण्यासाठी वनरोपवाटीकेत कमीखर्चाच्या पध्दती वापरल्या जातात. यात गरम पाणी, कोमट पाणी, चोळणे, घासणे, आपटणे, शेणात ठेवणे इ. पद्धती मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. याशिवाय काही ठराविक वृक्षांसाठी आम्लधर्मी रसायने, जीएसारखे संप्रेरके, काही यंत्र इ. गोष्टी वापरल्या जातात.

रोपवाटिकेत सावलीची आवशकता : बियाणे उगवल्यानंतर रोपांचे ऊन, पाऊस, वारा, थंडी, इ. गोष्टीपासून बचाव होण्यासाठी निवारा किंवा सावली करणे आवश्यक असते. सावलीसाठी गावात, बांबूच्या पट्ट्या नारळाच्या झावळ्या, झाडांचा पाला, प्लास्टिक, शेडनेट इ. गोष्टी वापरतात. ५०-१०० % प्रकाश देणाऱ्या जाळ्या प्रजातीनुसार वापरता येतात.

खतांची आवशक्ता :- शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी, तसेच शुद्ध रोपापोटी झाडे चांगली वाढती, दर्जेदार रोपांसाठी मातीची सुपिकता वाढविणे रोपवाटिकेत आवश्यक असते. त्यासाठी मातीत कुजलेले शेणखत, जंगलामधील जमिनीच्या वरच्या थरातील कुजलेला पालापाचोळा, हिरवळीचे खत, गांडूळ खत, इ. गोष्टींचे अंतर्भाव करणे आवश्यक असते. त्यासाठी रोपवाटिकेबरोबरच नैसर्गिक खतनिर्मिती प्रकल्प उभारणी केल्यास रोपवाटिकेमध्ये चांगला फायदा होऊ शकतो. शेवरी सारख्या हिरवळीची खते देणाऱ्या पिकांची लागवड नर्सरीच्या बांधावर कडेने केल्यास तण नियंत्रणाला मदत होईल व खतही मिळेल.

कीडा व रोग व्यवस्थापन – चांगली दर्जेदार रोपे निर्मितीचा उद्देश ठेवून लागवड क्षेत्रासाठी रोपे बनविली जातात. तथापि रोग, किडी इ. गोष्टींमुळे रोपे दर्जेदार होऊ शकत नाही. वाळवी, पाने कुरतडणाऱ्या अळया, अन्नद्रव्य शोषणाऱ्या किडी, मुंग्या इ. मुळे रोपवाटीकेत मोठे नुकसान होते. यासाठी रोपवाटिका स्वच्छ असणे आवश्यक असते.

 

सागाची रोपवाटिका :

 • सागाची नर्सरी करण्यापुर्वी चांगले गुण असलेले म्हणजे खोड सरळ, मोठी पाने, टिकाऊ लाकुड, रोग कमी असलेली झाडाची निवड करूनच अश्या झाडांची बियाणे गोळा करावे. अशा निवडलेल्या झाडांना ‘प्लस ट्री’ असे म्हंटले जाते.
 • सागाचे बियाणे नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत परिपक्व होते.
 • बियाणे गोळा करून पक्क्या जागेवरती पसरवून वाळवावे.
 • वाळवत असताना बियाणे हलवून देणे आवश्यक असते.
 • सागाच्या बियाचे कवच टणक असल्याने त्यासाठी बियाणे संस्करण करणे आवश्यक असते. त्यासाठी बियाणे शेणामध्ये टाकून उन्हात वाळवावे. कवच मऊ करण्यासही बियाणे काही ठिकाणी काठीच्या सहाय्याने झोडपले जाते.
 • प्रक्रिया केलेले बी रोपवाटिकेत गादीवाफ्यावर मे महिन्यात पेरावे.
 • दोन ओळीतील व रोपांतील अंतर साधारणतः १० ते १५ सेमी. खोलीवर पेरावे.
 • बियाणे जास्त गर्दीने पेरू नये, त्यामुळे प्लास्टिक पिशवीत सुद्धा पेरता येते.
 • बियाणे पेरण्यापुर्वी मातीमध्ये २:१:१ अशा प्रमाणात माती, वाळू व कुजलेले शेणखत चांगले मिसळून त्यात कीड प्रतिबंधक करंज पेंड किंवा निंबोळी पेंड मिसळावी.
 • गादीवाफे जास्त पावसाच्या प्रदेशात केले जातात.
 • गादीवाफ्यावर ठेवलेली रोपे व्यवस्थित पुढील पावसापर्यंत तशीच ठेवली जातात.
 • त्यानंतर धारदार कात्रीने सोटमुळे व केसासारखी बारीक उपमुळे छाटून टाकतात.
 • खोडाचा १ ते २ सेमी पर्यंतचा भाग काढून टाकतात.
 • अंतराच्या तुकडयालाच ‘साग्जाडी’ असे म्हणतात.
 • सागजाड्या करते वेळी मुळाची जाडी हाताच्या अंगठ्याच्या आकाराची असणे आवश्यक असते.
 • अशा तयार केलेल्या ‘सागजाड्या’ प्रत्यक्ष रोपवन क्षेत्रामध्ये लागवडीच्या ठिकाणी नेवून लागवड केली जाते.

लागवड :

 • सागाची लागवड दोन पद्धतीने केली जाते. यात पिशवीत केलेल्या रोपापासून व सागजाड्यापासून आपण लागवड करू शकतो.
 • रोपवाटिकेच्या गाडीवाफ्यावरून रोपे काढून सागजाडी तयार केल्यानंतर शक्यतो लगेच त्याची लागवड करावी.
 • साग्जाड्यापासून लागवड करताना प्रथम लागवड क्षेत्रात प्रहारीने जाडीच्या उंचीची तिरकस छिद्रे करावी.
 • तिरकस छिद्रामुळे नवीन येणारे फुटवे जोमाने व सरळ येतात.
 • खोडाचा भाग जमिनीच्या वर ठेवून मुळाचा भाग जमिनीत लावावा.
 • नंतर आजूबाजूने पोकळ राहुन पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी.
 • पाऊस सुरु झाल्यानंतर पिशवीत तयार केलेल्या रोपापासून लागवड करावी.
 • लागवडीच्या ठिकाणी खड्डे खोदावीत. लागवड करताना पिशवीतील मातीचा गड्डा न फोडता अलगद लागवड करावी.
 • पिशवी फोडण्यासाठी धारदार ब्लेडचा उपयोग करावा.
 • ढगाळ व उष्ण हवामान असताना केलेली लागवड अधिक यशस्वी होते.
 • १० ते १२ वर्षांनी विरळणी करणे आवश्यक असते.
 • अंतराने रोपाची लागवड करावी.
 • विस्तार वाढत गेल्यानंतर काही झाडे काढून घेतल्यास राहिलेली झाडे चांगली वाढतात.

https://krushisamrat.com/caring-for-a-nursery-during-summer-season-part-8/

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

1 Comment
 1. […] वनरोपवाटिका व्यवस्थापन – (भाग – ७) […]

Leave A Reply

Your email address will not be published.