- गोचीड हा रक्तावर उपजीविका करणारा परजीवी आहे.
- गोचीडचे जीवनचक्र हे साधारण तीन वर्षांचे असते.
- गोचीडाच्या अंडी,डिंभ,तरुण आणि प्रौढ अशा चार अवस्था असतात.
- पशुचा वास,श्वासातून उत्सर्जित होणारा कार्बन डायॉक्साईड वायु, सावली व घामाचा गंध यावरून गोचीड जनावरांना ताबडतोब ओळखतात.
- जीवनचक्र पुर्ण करण्यासाठी एक ते तीन प्राण्यांची गरज असते.
- रक्त पिण्यासाठी गोचीडाला अर्धा ते चार तास लागतात.
- मऊ गोचीड जास्त वेगाने रक्त पितात तर टणक गोचीडला वेळ लागतो.
- त्वचेत तोंड खुपसून ते लाळ पसरवितात, त्यामुळे त्वचा बधीर होते आणि प्राण्याला जाणीव होत नाही.
- लाळ सोडताना व रक्त पिताना गोचीड बरेच जीवजंतूंचा प्रसार करतात.
- प्रजननानंतर नर गोचीड मरतो तर मादी गोचीड 30 ते 180 अंडी टाकते.
- प्रत्येक वेळी रक्त पिल्यानंतर गोचीड ते पचविण्यासाठी जमिनीवर येतो.
- गोचीड प्राण्यांच्या शोधात गवताच्या टोकावर बसून राहतो आणि दोन पाय सतत हवेतच ठेवतो. जनावर बाजूने गेले की लगेच शरीरावर चढतो.
- सहा पायाची डिंभ अवस्था फार छोटी असते.तीन आठवड्यातच गोचीड तरुण अवस्थेत पोहोचतो.ही अवस्था जास्त काळ टिकते. यात त्याला आठ पाय असतात.
- प्रत्येक अवस्था पुर्ण करण्यासाठी गोचीडाला भरपुर रक्त प्यावे लागते.
- उष्ण ज्योतीचा वापर करून आणि गोठ्यातील भेगा भरल्याने गोचीडची अंडी नष्ट करता येतात.
- जनावरांना प्रत्येक आठवड्यात किटकनाशके किंवा आयुर्वेदिक औषधी वापरून धुतल्याने तरुण व प्रौढ गोचीडाचे निर्मूलन करता येईल.
- प्रत्येक अवस्था पुर्ण करण्यास गोचीडास जमिनीवर यावे लागते,त्यामुळे गोठ्यात नेहमी फवारणी आवश्यक आहे.
- मुक्त गोठ्यात कोंबड्या पाळून प्रौढ गोचीडचे निर्मुलन करता येईल.
- वरील सर्व उपाय हे सतत करत राहिल्याने गोठ्यातुन गोचीडाचे कायमचे निर्मुलन शक्य आहे.
- नवीन जनावरे गोठ्यात सोडण्यापूर्वी औषधे फवारली पाहीजेत.रानात चरायला जाणाऱ्या जनावरांची नेहमी तपासणी करून फवारणी केली गेली पाहीजे. हल्ली औषधे यांचा अतिवापर व अयोग्य मात्रेत वापर यामुळे प्रतिरोधकता ही मोठी समस्या बनली आहे.फवारणी करणे,पाठीवर औषध लावणे किंवा किटकनाशक साबण व स्प्रे वापरणे व आयुर्वेदिक औषधे यासारखे उपाय आलटून पालटून जर केले तर प्रतिरोधकता कमी होईल.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!