राज्यातील ऊसतोड कामगारांची नोंदणी सुरु

0

मुंबई / प्रतिनिधी
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील ऊसतोड कामगारांची नोंदणी सुरु असल्याची माहिती, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी नुकतीच विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

देशमुख पुढे म्हणाले, राज्यातील ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांकरिता लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत घरबांधणी, वृद्धाश्रम, शैक्षणिक योजनेसाठी निधी देण्यात येतो. राज्यातील अंदाजे 8 लाख ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांपैकी 18 ते 50 वयोगटातील 7 लाख 20 हजार कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा प्रिमियम रुपये 165 प्रमाणे एकूण 11 कोटी 88 लाख रुपये खर्च अपेक्षित असून 51 ते 59 वयोगटातील 80 हजार कामगार व कुटुंबियांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा प्रिमियम 6 रुपयेप्रमाणे एकूण 4 लाख 80 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच अंत्यविधी अर्थसहाय्यासाठी 4 कोटी 80 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याणकारी योजनेकरिता वित्त विभागाने प्रथम टप्प्यामध्ये योजनेसाठी 20 कोटी एवढा नियतव्यय उपलब्ध करून दिला आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

याविषयावर सदस्य विनायक मेटे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यावर झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह सदस्य जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादीं ची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

 

https://whatsapp.heeraagro.com

 

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.
Leave A Reply

Your email address will not be published.