
- हंगाम:
- खरीप हंगामात जिरायत भुईमुगाची पेरणी जुन महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केलीजाते,व जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करता येते. जेथे जास्त हिवाळा नसतो व रात्रीचे तापमान ५२ अंश पेक्षा कमी नसते. तेथे भुईमुगाची रब्बी, पेरणी नोव्हेंबर महिन्यात करणे शक्य असते. तसेच उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यत करवी. उन्हाळी भुईमुगाचे उत्पादन हे खरीपातील भुईमुगापेक्षा दुप्पट येते.
- जमीन:
- भूईमुगाच्या पीकास मध्यम खोल व उत्तम निचा-याची हलक्या रंगाची मोकळी, भुसभीशीत, वाळुमय,पुरेसा चुना आणि मध्यम सेंद्रिय द्र्व्ये असलेली जमीन हवी.हलक्या जमिनीत सुध्दा भूईमुभुग चांगला प्रकारे उत्पन देतो येतो.
- जमीनीची पूर्व मशागत :-
- जमीनीचीपूर्व मशागत जमीनीचा प्रकार व पाऊससावरअवलंबून असते. जमीनीची उभी आडवी पद्धतींनी नांगरणी करावी, आणि ३ -४ कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.
- लागवड ची पध्दत :
- भुईमुगाच्या उपट्या निमपस-या व पस-या जातीची लागवड सर्व साधारण पणे,रुंद वरंबा व सरी पध्दत यामध्ये तसेच सपाट वाफ्यावरती करावी. वरंब्याची रुंदी १– २ मी.सरीची रुंदी ३० सें मी त्याच प्रमाणे जोड ओळ पध्दतीत दोन जोड ओळी (३० सेंमी अंतराच्या ) ह्या ६० सेंमी. अंतराने पाडाव्यात अशा पध्दतीनेझाडातील अंतर (१० सेंमी)वाढते.
- प्रति हेक्टरी बियाणे :-
- प्रति हेक्टरी १६०किलो बियाणे लागतात.बी जमीनीत ५ -६ सेंमी . खोलीवर हाताने, पेरणीयंत्राने पेरता येते. उभी -आडवी पेरणी केल्याने पिकात खडे राहत नाहीत. व पिकाची एक सारखी वाढ होत राहते. जीवाणू संवर्धनाचा (रायझोबियम जीवाणू ) चा उपयोग बीज प्रक्रियेत करावा.
- पीक सरंक्षण :
- फुलकिडे तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी १० मिली, किंवा ८ मिली, डिमॅटोन १५ टक्के प्रवाही औषध १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आणि पाने खाणारी अळी व पाने गुंडाळणारी अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन २० इ.सी ४ मिली किंवा डेकामेथ्रीन २८ इ.सीय १० मिली किंवा किनॉसफॉस २५ इ.सी. २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे. टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब (डायथेन एम-४५) १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

- काढणी :-
- पीक तयार झाले म्हणजे, पाने पिवळी पडू लागतात. शेंगाचे टरफल टणक बनते, व शेंगाच्या टरफलाची आतील बाजू काळी दिसू लागते. अशा प्रकारे पीक तयार झाल्यावर काढणी करावी.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.