रेन वॉटर हार्वेस्टिंग (Rain Water Harvesting)

2

पाऊस आला की असा कोसळतो की बहुतांश पाणी हे वाहून जातं. समुद्राला मिळतं आणि आपण बसतो पाणी टंचाईच्या नावाने शंख करीत. पाऊस पडतो, नदी-नाल्यांतून वाहतो, धरणे भरतो, समुद्रात वाहून जातो. हे पावसाळ्याच्या चार महिन्यांत घडते आणि मग उरतात ती कोरडी नद्यांची पात्रे, गाळाने भरलेली धरणे, पाण्यावाचून वणवणणारी गावे! लोकसंख्या वाढली, राहणीमान सुधारले, उद्योगधंदे वाढले. या सगळ्याला जास्तीचे पाणी हे लागणारच! हे सगळे पाणी आजही आहे, पण ते पाणी साठविण्याचे, वाटण्याचे आणि कौशल्याने वापरण्याचे नियोजन मात्र नाही. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. म्हणून जर एक पद्धत कमीत कमी खर्चात राबविली तर त्याचा नक्की फायदा होईल, ती पद्धत म्हणजे “रेन वॉटर हार्वेस्टिंग.”

रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय?   

     रेन वॉटर हार्वेस्टिंग’ याला मराठीत ‘पावसाळी पाण्याचा संचय’ म्हणतात. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाच्या वाहून जाणार्‍या पाण्याची साठवण करण्यासाठीची कृत्रिम पद्धत होय. ही अत्यंत सोयीची आणि प्राचीन पद्धत आहे. यात आपल्या एरियामध्ये पडणारं पावसाचं पाणी आपल्या बोअरवेल, विहीर आणि शौच खड्डयामध्ये जिरवणं. यामुळे आपली जुनी बोअरवेल असेल तर त्याला चांगलं पाणी लागतं आणि ते पाणी वर्षभर टिकून राहतं.

रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करावे ?

यात पावसाचे पाणी मानवनिर्मित टाक्यांमध्ये किंवा नैसर्गिक भूजलांमध्ये साठविले जाते. या साठवलेल्या पाण्याचा आवश्यकतेनुसार वापर करणे अभिप्रेत असतो. आपल्याच घराच्या किंवा सोसायटीच्या आवारातील पाणी साठवायचे असल्याने अत्यंत कमी खर्चात हे काम कोणीही करू शकते. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे नेमके काय करायचे? रेन वॉटर हार्वेस्टिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात एक म्हणजे टाकीत पावसाचं पाणी साठवणं आणि दुसरा प्रकार म्हणजे ग्राउंड लेव्हल वॉटर रिफीलिंग करणं.

फेरोसिमेंट वापरून बांधलेली जमिनीखालची टाकी :

ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही, अशा जागी छतावर पडणारे पावसाचे पाणी बंद टाकीमध्ये साठवले तर ते पिण्यासाठी उपयोगात येऊ शकते. पाऊस सुरू झाल्यावर पहिल्या दोन पावसाचे पाणी हे सोडून द्यावे. छत स्वच्छ झाल्यानंतरचे पावसाचे पाणी हे फिल्टर द्वारे स्वच्छ करावे. चिकनमेश, वेल्डमेश, सिमेंट आणि रेती यांच्या साहाय्याने टाकीचे बांधकाम करावे. याला फेरोसिमेंटची टाकी म्हणतात.

झिरप खड्डा:

पावसाळ्यात घराच्या छतावर साठणारे पावसाचे पाणी छताच्या उताराच्या बाजूने पाईप लावून खाली घ्यायचे. पाईपद्वारेच हे पाणी विहिरीजवळच्या शोषखड्ड्यात किंवा ते वाहून न जाता जमिनीत मुरेल अशा प्रकारे झिरप खड्ड्यात सोडायचे. या पाईपाला फिल्टर लावणे आवश्यक असते. आपण राहत असलेल्या जागेमध्ये पाच फूट लांब, पाच फूट रुंद आणि साधारण चार-साडेचार फूट खोल खड्डा घ्यावा. हा खड्डा दीड फूट उंचीपर्यंत दगडी-गोट्यांनी भरावा. त्यावर दीड फूट उंच विटांच्या तुकड्यांचा थर द्यावा. विटांच्या तुकड्यांवर दीड फूट वाळू टाकून खड्डा भरून घ्यावा. छतावर पडणारे पाणी या खड्ड्यात सोडून द्यावे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग करताना घ्यावयाची काळजी:

१. छपराच्या उताराचा आणि कुटुंबाच्या गरजेचा नीट अभ्यास करून टाकीचे आकारमान ठरवावे.
२. पाऊस पडण्यापूर्वी छप्पर स्वच्छ करावे. किंवा सुरुवातीला एखादा तास पाऊस पडून गेल्यानंतर पाणी टाकीत सोडावे.
३. टाकीत पाणी सोडण्यापूर्वी फिल्टर टँकचा उपयोग केल्यास पाणी अधिक शुद्ध होते.
४. टाकी सिमेंट किंवा आरसीसीमध्ये बांधावी. टाकी जमिनीखाली बांधल्यास जागेची बचत होते आणि पाणी सुरक्षित राहते. तसेच टाकी सर्व बाजूंनी बंदिस्त असावी.

रेन वॉटर हार्वेस्टिंग करताना हिरा स्क्रीन फिल्टरचा उपयोग केल्यामुळे होणारे फायदे :

वरील प्रमाणे रेनवॉटर हार्वेस्टिंग कसे करावे हे तर आपल्या लक्षात आले आहे. परंतु हे रेन वॉटर हार्वेस्टिंग करतांना पाणी स्वच्छ करण्यासाठी फिल्टरचा उपयोग करणे खूप आवश्यक असते. फिल्टर वापरल्यामुळे पावसाच्या पाण्यातून येणारा गाळ व येणारा कचरा, पालापाचोळा आपण त्या पाण्यातून स्वच्छ करु शकतो.
त्यातच जर हिरा अॅग्रो इंडस्ट्रीजचे स्क्रीन फिल्टर वापरले तर अधिक उत्तम. या फिल्टरचे वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :

वैशिष्ट्ये –

प्लास्टिक स्क्रीन फिल्टर आय.एस.आय प्रमाणित आहे.

२’’, २.५’’, ३’’ तीन प्रकारच्या साईज मध्ये उपलब्ध आहे.

ह्या फिल्टरला एक इनलेट आणि दोन आउटलेट दिलेले आहे, जर एकाच वेळेस एक आउटलेट वापरायचे असेल किंवा एकाच वेळेस दोन आउटलेट वापरायचे असतील तरीही वापरता येते.

फिल्टरला दिलेले पाण्याचे दोन्ही आऊटलेट एकमेकांच्या ९० अंशाच्या कोनात असल्यामुळे फिल्टर सरळ किंवा आडवे बसवू शकतात.

फिल्टरची बॉडी इन्जिनिअरिंग प्लास्टिक पासून बनलेली असल्यामुळे त्याच्यावर वातावरणाचा किंवा उन्हाचा काहीही परिणाम होत नाही.

कृषी रसायनामुळे फिल्टरला काहीही नुकसान होत नाही.

फिल्टर उघडण्यासाठी जी क्लॅम्प वापरतात तिला टॅागल क्लॅम्प असे म्हणतात.

फिल्टरला दिलेली टॅागल क्लॅम्प सुध्दा इन्जिनिअरिंग प्लास्टिक पासून बनलेली आहे ज्यामुळे फिल्टरचे आयुष्य अधिक असते.

फिल्टरच्या वरच्या बाजूला व्हॅक्युम ब्रेकर लावलेला आहे. हा व्हॅक्युम ब्रेकर एयर व्हॉल्व्ह सारखा काम करतो.

फिल्टरच्या जाळीची साईज मोठी असल्यामुळे पाण्याचा प्रवाह जास्त मिळतो.

फिल्टरची जाळी साफ करण्यासाठी वेगळी सोय दिली आहे.

फिल्टर उभे व आडवे दोन्ही पद्धतीत वापरले जाऊ शकते.

फिल्टरच्या बाहेरून मध्ये या पद्धतीने पाणी स्वच्छ होते. त्यामुळे पाण्यामधील घाण जाळीच्या बाहेरील बाजुला जमा होते. व त्यामुळे जाळी स्वच्छ करण्यास मदत होते.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

 

2 Comments
  1. Pravin M.Taware. says

    सुंदर लेख आहे

    1. Girish Khadke says

      Thanks sir

Leave A Reply

Your email address will not be published.