लाव्ही हा पक्षी महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो. जमिनीवर राहणारा लाव्ही आकाराने लहान असतो. हिंदीत बटेर, तितर, इंग्रजीत क्वेल तर महाराष्ट्रात कुठे लाव्हरी, तर कुठे लाव्ही नावाने हा पक्षी ओळखला जातो. कुक्कुटपालनाप्रमाणे याही व्यवसायाला ग्रामीण भागात मोठा वाव आहे. शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अत्यंत फायदेशीर ठरतो.
बटेर पालन व्यवसायासाठी अत्यंत कमी जागा व कमी भांडवल लागते. बटेर पक्षी रोगांना कमी प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे रोगांवरील उपचारासाठी लागणारा खर्च कमी लागतो. हे पक्षी ५ आठवड्यांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतात. बटेर पक्षी ६ ते ७ आठवड्यांत अंडी देण्यासाठी तयार होतात. बटेर पक्ष्यांमध्ये अंडी देण्याची क्षमता जास्त असते. हे पक्षी साधारणत: एका वर्षात २८० अंडी देतात. ब्रॉयलर पक्ष्याच्या चिकनपेक्षा बटेर पक्ष्याचे चिकन रुचकर असते. बटेर पक्ष्याचे चिकन खाण्यामुळे लहान मुलांमध्ये मेंदूचा विकास होण्यास मदत होते. बटेर पक्ष्याच्या अंड्यांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण अत्यंत कमी असते. गर्भवती स्त्रियांनी बटेर पक्ष्याचे चिकन व अंडी खाल्ल्यास फार गुणकारक असते.
सहा आठवड्यांच्या बटेर पक्ष्यांमध्ये मादीचे वजन १७५ ते २०० ग्रॅम व नराचे वजन १२५ ते १५० ग्रॅम असते. बटेर मादी वयाच्या सातव्या आठवड्यांपासून अंडी देण्यास चालू करते व वयाच्या बावीसाव्या आठवड्यांपर्यंत अंडी देते. मादी पक्ष्यांची अंडी देण्याची वेळ साधारणतः रात्रीची असते. बटेर पक्ष्यांच्या अंड्याचे वजन ९ ते १० ग्रॅम असते.
बटेर पक्षी हा त्याच्या रुचकर मांसाकरीता, अंड्याकरीता व औषधीय गुणधर्मासाठी प्रसिध्द आहे.
काही वर्षापासून बटेर पक्षाच्या जपानी पाळीव जाती विकसित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बटेर पालन व्यवसाय हा सोपा झाला आहे. बटेर पालन व्यवसायाकरीता केंद्रीय कृषी विकास संघटन, खारी कॉलनी मुंबई तर्फे लायसन देण्यात येते. हे लायसन 4 प्रकारचे असते.
1) लाव्ही पाळण्याकरीता
2) लाव्ही विक्रीकरीता
3) लाव्ही मटन विक्रीसाठी
4) लाव्ही पिल्लाचे उत्पादन
असे एकूण चार प्रकारचे लायसन असतात.
लाव्ही उत्पादनाचा खर्च साधारण एका पक्षाला 9.50 एवढा येतो. त्यामध्ये
पिल्लांची किंमत 3 रुपये प्रती पक्षी एवढी असते.
खाद्याचा खर्च प्रतीपक्षी साधारण 5.50 एवढा येतो
ओव्हरहेड चार्ज प्रतीपक्षी 50 पैसे
असा एकूण खर्च 9 ते 9.50 रुपये एवढा येतो.
विक्री करताना हा पक्षी होलसेल मध्ये 14 ते 15 रुपयापर्यंत विकला जातो व रीटेल मध्ये साधारण 20 ते 25 रुपया पर्यंत विकला जातो.
एका दिवसाचे पक्ष्याचे वजन 7 ते 8 ग्रँम एवढे असते.
पाच आठवड्यात पक्षाचे वजन 180 ते 200 ग्रँम होते.
पुर्ण वाढ झालेल्या पक्षाचे वजन 200 ते 250 ग्रँम पर्यंत असते.
मादी पक्षाचे वजन नरापेक्षा जास्त असते.
मादी पक्षी वयाच्या 6 व्या आठवड्यापासून अंडी देण्यास सुरवात करते. व ही क्षमता 8 आठवड्यात 50 टक्क्यांपर्यंत पोहोचते.
पुढे 10 आठवड्यात अंडी देण्याची क्षमता 80 टक्के होते.
एक मादी वर्षाला सुमारे 200 अंडी देते व एका अंड्याचे वजन साधारण 12 ग्रँम पर्यंत असते.
अंडी रंगाने पांढरट पिंगट काळ्या ठिपक्याची असतात. व आता फक्त पांढ-या रंगाच्या अंडे देणा-या बटेर पक्ष्यांच्या जाती विकसित करण्यात आल्या आहेत. व ह्या पक्ष्यांच्या जाती अंडी उत्पादनासाठी प्रसिध्द असल्यामुळे पक्षी हा कधीच खुडूक होत नाही.
ही अंडी मशीन द्वारे अथवा पक्षाद्वारे उबवून यातून पिल्ले काढण्यात येतात.
बटेर पालनाचे फायदे :–
एका वर्षात बटेरचे 8 ते 12 खोके होतात.
वर्षाला 250 ते 300 अंडी देतात.
अंडी उत्पादन 9 ते 10 आठवड्यात 80 टक्क्यापर्यंत पोहोचते.
16 ते 18 दिवसात अंडी उबवणी केली जाऊ शकते.
बाजारात विकण्याचे वय 4 ते 5 आठवडे असून एका पक्षाचे वजन 150 ते 160 ग्रॅम असते.
एका कोंबडीला लागणा-या जागेत 8 ते 10 पक्षी ठेवले जाऊ शकतात.
एक किलो मांस उत्पादनाकरीता 2 ते 2.50 किलो खाद्य लागते.
सहा आठवड्यात एक पक्षी 500 ते 550 ग्रँम खाद्य खातो.
पूर्ण विकसीत पक्षी 10 ते 12 ग्रँम दिवसाला खाद्य खातो.
अंडी देणा-या पक्षाला 20 ते 22 ग्रँम खाद्य लागते.
मृत्युचे प्रमाण फार कमी असते. कारण ह्या पक्षात इतर पक्ष्यांच्या मानाने रोगप्रतिकारक क्षमता जास्त असते. त्यामुळे या पक्षांना लसीकरणाची आवश्यकता नसते.
बटेर पालनासाठी विकसित केलेल्या जपानी जाती पुढीलप्रमाणे :–
1) फराओ
2) इंग्लीश सफेद
3) ब्रिटीश रेन
4) मन्चुरीयन गोल्ड
बटेर व्यवस्थापन :–
तापमान नियंत्रित ब्रुडरची पहिल्या दोन आठवड्यापर्यंत आवश्यकता असते.
बटेर पक्षांचे वर्गीकरण पहिल्या तीन आठवड्यात.
ब्रुडर 4 ते 5 आठवड्यात. व 5 आठवड्यापासून फिनिशर
बाहेरची पिल्ले आणण्याच्या 10 दिवस आधी ब्रुडर, गादी, खाद्य-पाण्याची भांडी निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असते.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!