पूर्णेत पोलीसाकडून फळ व भाजीपाला विक्रेत्यावर गंडातर
पोलीस गाडीच्या सायरनने नागरीकात घबराहाट पूर्णा / प्रतिनिधि रहदरीस अडथळा येत असल्याचे कारण पुढे करुन फळ विक्रेते व भाजीपाला विक्रेत्यावर पोलीसांच्या दंडेल शाही मुळे हातगाडेवाले व रस्त्याच्या कडेला किरकोळ फळांचा व भाजीपाला विक्री करणाऱ्यावर उपास मारीची वेळ आली आहे.पूर्णा तालुक्यात सध्या दुष्काळसदृष्ट स्थिती असल्याने अनेक तरुण बेकार झाले आहेत.शहरातील महात्मा बस्वेश्वर चौकात हात गाड्यावाल्या कडून ट्राफीक जाम असल्याचे सांगीतले जाते मात्र हा रस्ता फळ व भाजीपाला विक्रेत्यामुळे नव्हे तर दुचाकी व आटो चालकांच्या बेशिस्त पार्किंग मुळे व वाटेल तिथे गाड्या उभे करत असल्याने ट्राफीक जाम होत असे.ही वस्तूस्थिती खरी असली तरी ट्राफीक जामचे खापर गरीब व्यवसायीकावर थोपविले जात आहे.
भाजीपाला व फळ विक्रेत्यांकडून नगरपालिका रस्त्याच्या कडेला बसलेल्या कडून ५ रुपये व ८ रुपये वसुल करते या किरकोळ व्यवसायीकांना शिस्तीने बसवण्याचे काम नगरपालिकेला असताना हेच काम पोलीसाकडून होत आहे. फळ व भाजीपाला विक्रेते या ठीकाणी अनेक वर्षापासून येथे व्यवसाय करतात. तसेच मस्जिद समोरील मोकळ्या जागेत रहदारीस कसल्याच प्रकारच्या अडथळा व तक्रारी नसताना त्यांना देखील बसु दिले जात नाहीत.मात्र दुसरी कडे मेन रोडवर अनेक दुकानदारानी रस्त्यावरच साहित्य व हातगाडे ठेऊन रस्त्यावर अतिक्रमण करुन अरुंद केला आहे.एका रस्त्याला एक न्याय व दुसऱ्या रस्त्याला दुसरा न्याय पोलीसाच्या या दुपटी धोरणाला नागरीकडून तिव्र नाराजी पसरली आहे.मागील २५ सप्टेंबर रोजीच्या दोन गटातील उसळलेल्या दंगलीनंतर पूर्णा शहर व ग्रामिण भागातील नागरीक जास्त फिरकत नसल्यामुळे बाजार पेठ पूर्णतः कोलमडली आहे.पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांनी सर्व भाजीपाला व फळ विक्रेते व नगरपालिका प्रशासनाची सयुंक्त बैठक घेऊन शिस्तबद्ध पध्दतीत त्यांना त्यांच्या पूर्वीच्या जागी उपजिवीका भागविण्यासाठी बसु द्यावे अशी मांगणी त्याच्या कडून होत आहे.तसेच पोलीस गाडी बाजार पेठेत येताच पोलीस गाडीची सायरन कारण नसता वाजविली जाते यामुळे आपन कुठे जम्मू कश्मिर मध्ये आलो की काय व्यापारी,ग्रामिन भागातील नागरीक,महिला यांना वाटू लागले आहे. पोलीस गाडीच्या या सायरन मूळे नागरीकांनी चांगलीच धसकी घेतली असून सायरन वाजवून एक प्रकारे पोलीसाकडून दहशत माजविले जात आहे.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादीं ची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!