१५ मे पूर्वी बीटी बियाणे विक्रीस मनाई

0

पुणे :बियाण्यांचा पुरवठा लवकर केल्यास बोंडअळीचा धोका उद्भवतो, असा दावा कृषी विभागाचा आहे यामुळे १५ मे पूर्वी बीटी बियाण्यांचा कोणत्याही तालुक्यात पुरवठा करू नये, असे आदेश राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी दिले आहेत.
मान्सूनपूर्व पाऊस येईल किंवा जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात पाऊस हमखास येईल, असे मानून काही भागांत शेतकरी धूळपेरणी करतात. .राज्यात ४० लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कपाशीचे पीक घेतले जाते. त्यातील १०-१५ टक्के लागवड ही अर्लीची असते. मात्र, हे गृहीतक चुकल्यास बोंडअळीचा धोका मोठया प्रमाणात उद्भवतो, असे कृषी विभागाने म्हटले आहे.
२०१७ च्या हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव झपाटयाने झाल्याचे आढळून आले होते. बोंडअळीचा धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी यंदा कोणत्याही भागात धूळपेरणी करू नये यासाठी आम्ही बियाण्यांचा पुरवठा नियंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
गुलाबी बोंडअळीच्या विरोधात बीटी बियाण्यांमधील जनुकांची असलेली प्रतिकाराची क्षमता कमी झालेली आहे. त्यात पुन्हा पावसाचा ताण बसल्यास बोंडअळीचा प्रसार झपाट्याने होतो. त्यासाठी कंपन्यांकडून वितरकांना १५ मे पर्यंत प्लेसमेंट अर्थात बियाण्यांचा पुरवठा केला जाणार नाही. गेल्या हंगामात देखील पुरवठा नियंत्रित केल्याने चांगला परिणाम दिसून आला,अशी माहिती सूत्रांनी दिली.
वितरकांनी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून विक्रेत्यांकडे बियाणे पोचविणे अपेक्षित आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना ३० मेच्या आधी बीटी बियाण्यांचे पाकीट विकत मिळणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले असून बियाणे कंपन्यांनी राज्यातील वितरकांना यंदा वळपास सव्वादोन कोटी बीटी पाकिटांचा पुरवठा करण्याची तयारी दाखविली आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.