खरीप हंगामासाठी पंतप्रधान पिक विमा योजना

0

योजनेचे उद्दिष्ट:-

नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थतीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. कृषि क्षेत्रासाठी पात पुरवठ्यात सातत्य राखणे.

पिकांचा समावेश :-

भात( धान), खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, तीळ, सुर्यफुल, कारळे, कापूस, कांदा, नाचणी( रागी) या पिकांसाठी, अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत भाग घेता येईल.

शेतकऱ्यांचा सहभाग:-

अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे ( कुळ अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना योजना बंधनकारक आहे तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील. बिगर कर्जदारास संबंधित बँकेमध्ये किंवा ऑनलाइन विमा प्रस्ताव दाखल करून, विमा हप्ता भरून योजनेत सहभागी होता येईल.

योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत :-

२४ जुलै २०१९ जोखीम स्तर सर्व पिकांसाठी.

विमा योजनेत सहभागी होण्याकरिता :-

अधिसूचित क्षेत्रातीलअधिसूचितपिकांसाठी पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास विमा योजनेत सहभाग बंधनकारक आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला ७/१२ उतारा, बँक पासबुक, आधारकार्ड, व पिक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देऊन व भरलेली पोच पावती त्याने जपून ठेवावी किंवा ऑनलाईन भरावा. बोगसपीकविमा प्रस्ताव प्रकरणी फौजदारी करणेबाबत, बोगस ७/१२, बोगस पीकपेरा नोंदीच्या आधारे पीकविमा प्रकरणे निदर्शनास आल्यास संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याबाबत सूचना आहेत.

नुकसान भरपाई मिळण्यासाठी :-

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे अकस्मात नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत याबाबत संबंधित विमा कंपनी, बँक, कृषि / महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक याद्वारे कळवावे. संपूर्ण हंगामात विविध कारणांमुळे अधिसूचित क्षेत्रातील पिकाच्या सरासरी उत्पादनात उंबरठा उत्पादनापेक्षा घट आल्यास वरील नुकसान भरपाईची रक्कम अंतिम केली जाते.

सदर अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांकरिता विमा योजनेत भाग घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना त्याप्रमाणे नुकसानभरपाईत्यांचे बँक खात्यात जमा केली जाते.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.