बहुपिकभक्षी स्पोडोप्टेरा
स्पोडोप्टेरा – पाने खाणाऱ्या अळींचे व्यवस्थापन
सोयाबीन पिकाखालील क्षेत्र वाढल्याने स्पोडोप्टेरा लिटूरा या बहुपीकभक्षी पाने खाणाऱ्या अळींचा उद्रेक होऊन बरेच नुकसान होते. ती कोबी, फ्लाँवर, भेंडी, कपाशी, एरंडी, बटाटा, झेंडू, शर्कराकंद इ. पिकांवर उपजीविका करते.
जीवनक्रम –
मादी पतंग शेतात मोजक्या झाडांच्या पानाखाली पुंजक्यात २५०-३०० अंडी घालतात. अंड्यातून ३-४ दिवसात अळ्या बाहेर पडतात व त्याच पानावर ४-७ दिवस झुंडीत पानांचे हरितद्रव्य खातांना आढळतात. त्यामुळे पाने जाळीदार दिसतात. नंतर ३-४ दिवसाच्या अंतराने या अळ्या छोटे छोटे गट करून सर्व शेतात पसरतात व मोठ्या झाल्यावर अतिशय खादाड होऊन अतिशय नुकसान करतात. २५ टक्केपेक्षा जास्त पाने खाल्याने पिकाची वाढ व उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. अळ्या दिवसा झाडांच्या फांद्या, पालापाचोळा व गवतात लपतात व रात्री अधाशासारखी पाने खातात. २-३ आठवड्यात जमिनीत शिरून कोषावस्थेत जातात. कोशातून ७-१० दिवसात नर मादी-पतंग बाहेर पडून त्याचे मिलन झाल्यावर मादी अंडी घालण्यासाठी ३०-५० दिवसाचे उपलब्ध पिक शोधते आणि उद्रेकाचे काळात अळ्या एका शेतातून दुसऱ्या शेतात पसरतात. किडीत पोषक हवामान म्हणजे कमी ते मध्यम पावसानंतरचा कोरडा काळ, तापमान ३०® सें.ग्रे. च्या आसपास, रासायनिक कीडनाशकांचा सतत वापर, सुरुवातीच्या अवस्थेत शेतात कीड उपद्रवाचे निरीक्षणांचा अभाव, कीड रात्री सक्रीय असल्याबद्दल व तिच्या जीवनक्रमाबद्दल अज्ञान, सतत यजमान पिकाची उपलब्धता, खाद्य ही कीड उद्रेकाची कारणे आहेत.
कीड व्यवस्थापनाचे उपाय –
- पिकाचे नियमित निरीक्षण करणे, शेतातील आठवड्यातून दोनदा जाळीदार पाने शोधून ती अळ्यासहित केरोसीन युक्त पाण्यात ( ५० मि.ली. एक लीटर पाणी ) बुडवावीत किंवा जाळावीत, त्यामुळे अळ्या छोट्या व झुंडीत असतांनाच मेल्यामुळे पिकाचे फारसे नुकसान होत नाही.
- शेतात ५-१० एरंडीची झाडे (सापळा पिक) बांधाजवळ लावल्याने त्यावरील किडग्रस्त जाळीदार मोठी पाने लांबूनच ओळखता येतात. ती अळ्यासहित नष्ट करावीत तसेच मुख्य पिकांवरील अशी पाने अळ्यासहित नष्ट करावीत.
- पिकांची पाने खाल्लेली आढळल्यास झाडाच्या फांदीवर, पालापाचोळा, गवतात अळ्या शोधाव्यात. सुमारे १५% मि.ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे अळ्यांना ३-४ दिवसात रोगाची साथ होऊन मरतात.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर
जाऊन फॉर्म भरा. https://whatsapp.heeraagro.com
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!