“ हिरा ठिबक सिंचन म्हणजे पिकाला हवे तेवढे, हवे तेव्हा नियंत्रित पाणी देण्याची व्यवस्था.”

2

यात जमिनीचा व पिकाचा प्रकार, पिकाचे वय, जमिनीतील हवा, पाणी, मूलद्रव्ये व लाभदायक सूक्ष्म जीवाणू इ. मुलभूत घटक लक्षात घेऊन पिकाच्या मुळाच्या कार्यक्षेत्रात पिकाच्या पाण्याच्या गरजेनुसार दररोज अथवा ठराविक दिवसांच्या अंतराने पाणी प्लास्टिक किंवा पॉलिथिनच्या लहान नळीच्या आधारे तोटीद्वारे, कमी दाबाने, थेंबथेंबाने देणे यास ठिबक सिंचन पद्धत असे म्हणतात.

ठिबक सिंचनाचे फायदे :-

१) पिकाला आवश्यक तेवढेच पाणी प्रवाहावर नियंत्रण ठेवून देता येते.

२) पिकाला पाणी सारख्या प्रमाणात दिले जाते.

३) पाणी पिकालाच दिले जात असल्यामुळे तणाचा प्रादुर्भाव कमी होतो. पाण्याची ५० ते ६० टक्क्यांपर्यंत बचत होते.

४) प्रवाही सिंचनाने लागणाऱ्या पाण्यात या पद्धतीने २ ते २.५ पट क्षेत्र भिजविता येते.

५) पिकांच्या मुळांना हवा, पाणी व अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात मिळत असल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.

६) ऊर्जा व मजुरी खर्चात बचत होते.

७) पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

८) सर्व प्रकारच्या जमिनीत या पद्धतीचा वापर करता येतो व जमिनीची धूप होत नाही. अथवा पाणी साचत नाही.

ठिबक उभारणी संच :-

१)  मोटर :- ज्या प्रकारची मोटर आहे त्याप्रमाणे पाण्याचे नियोजन करावे.

२)  मेन पाईप लाईन :– मेनपाईपलाईनचा उपयोग पंपापासून सबपाईपलाईन पर्यंत पाणी नेण्यासाठी होतो. ही मेनपाईपलाईन ६० ते ९० से.मी. गाडलेली असावी. याकरिता पीव्हीसी किंवा एचडीपीई पाईपचा वापर करावा.

३)  सब पाईप लाईन :- मेनपाईपलाईन मधील पाणी सबपाईपलाईनद्वारे लॅटरल पर्यंत पोहोचविले जाते. सबपाईपलाईनसाठी पीव्हीसी किंवा एचडीपीई पाईपचा उपयोग केला जातो. सबपाईपलाईन २ किंवा २.५ इंची असते. सबपाईपलाईनला दोन्ही किंवा एक बाजूस ग्रोमेट टेक ऑफच्या सहाय्याने लॅटरल जोडलेल्या असतात.

४)  फिल्टर :-  फिल्टर हे पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतात.हे फिल्टर लोखंडी आणि प्लास्टिकचे सुद्धा उपलब्ध आहेत. फिल्टरचे दोन प्रकार पडतात.

५) शंकू फिल्टर :- हे फिल्टर पाण्यामध्ये जर रेताळ येत असेल तर त्यावेळी बसविण्यात येते. व हे मेनपाईपलाईनवर बसविण्यात येते.

६) सँड फिल्टर :- हे फिल्टर पाण्यात शेवाळ येत असल्यास बसविण्यात येते. व हे मेनपाईपलाईनवर बसविण्यात येते.

७) लॅटरल :-  सबलापाईपलाईन मधील पाणी लॅटरलद्वारे संपूर्ण शेतात पोहचविले जाते. या नळ्यांवर ड्रीपर अथवा तोट्या बसविलेल्या असतात.

८) ड्रीपर्स / तोट्या :

लॅटरलला ठराविक अंतरावर ड्रीपर्स बसविले जाते. या ड्रीपर्समार्फत पाणी कमी दाबाने थेंबाथेंबाच्या रूपाने बाहेर पडते.

९) व्हेंचुरी :-  ही एक खत देण्याची संयंत्रणा असून याद्वारे पिकांना पाण्यातून खते दिले जातात.

१०) नॉन रिटर्न वॉल्व्ह :-  हा वॉल्व्ह मुख्य नियंत्रकामध्ये सर्वात प्रथम बसवलेला असतो. हा वॉल्व्ह पाण्याचा उलट प्रवाह धरतो व पंपाचे संरक्षण करतो. तसेच या वॉल्व्हमुळे खते किंवा औषधी पाण्याच्या source मध्ये return जात नाहीत.

११) फ्लश व्हॉल्व्ह :- मेनपाईपलाईन व सबपाईपलाईनच्या शेवटच्या टोकावर बसविलेला असतो. मेन व सबपाईपलाईन साफ करण्याकरिता याचा उपयोग होतो.

१२) ड्रीपर्स / तोट्या :- लॅटरलला ठराविक अंतरावर तोट्या बसवल्या जातात. या तोट्यांद्वारे पाणी कमी दाबाने थेंबा थेंबाच्या रूपाने बाहेर पडते.

१३)  एंड कॅप :- लॅटरलचे शेवटचे तोंड बंद करण्याकरिता एंड कॅपचा वापर करतात. लॅटरल साफ करण्याकरिता एंड कॅप काढून लॅटरल मधून पाणी बाहेर सोडावे.

१४) ड्रीपर्स / तोट्या :- लॅटरलला ठराविक अंतरावर तोट्या बसवल्या जातात. या तोट्यांद्वारे पाणी कमी दाबाने थेंबा थेंबाच्या रूपाने बाहेर पडते.

https://krushisamrat.com/use-of-filter-in-drip-irrigation/

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

2 Comments
  1. Anonymous says

    5

  2. […] “ हिरा ठिबक सिंचन म्हणजे पिकाला हवे ते… […]

Leave A Reply

Your email address will not be published.