फुलशेतीतून साधला उन्नतीचा मार्ग

1
अल्पावधीत लाखोंचे उत्पन्न
सेलू /बाबासाहेब मुजमुले
पारंपारिक शेतीतून उत्पन्न होत नाही, मात्र हताश न होता पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन आपल्या शेतात फुलांची लागवड करत फुलशेतीतून आर्थिक उन्नतीचा मार्ग साकारणारे काष्टे कुंटुब सेलू तालुक्यात अनेक शेतकर्‍यांना प्रेरणा देत आहेत.
 सेलू शहरापासून 6 कि. मीच्या अंतरावर असलेल्या राजवाडी येथील विठ्ठलराव काष्टे यांना दोन मुले बाळासाहेब व उद्धव यामध्ये बाळासाहेब मोठा मुलगा शिक्षणासोबत वडिलांना शेतीमध्ये हातभार लावत असे.घरामध्ये जेमतेम शेती असल्याने ही शेती पारंपारिक पद्धतीने काष्टे कुटुंबीय करत असे. यातून हवे तसे समाधान मिळत नसल्याने बाळासाहेब यांनी विचार केला की, पारंपरिक पद्धतीने शेतीमध्ये लावलेला खर्च निघणेही कठिण होत आहे. त्यांनी आपल्या कुटुंबियासोबत चर्चा करुन शेतामध्ये नवीन तांत्रिक पद्धतीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. यात त्यांच्या कुटुंबियांनी विरोध न करता त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करत मदत करण्याचे ठरकविले. सन 2000 साली त्यांनी सुरवातीला शेतामध्ये विविध फुलांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्या पद्धतीने शेतामध्ये फुलांच्या रोपांची लागवड केली. सुरवातीला एकरभर गुलाब, मोगरा, झेंडू, निशिगंध अशी रोपांची लागवड केली. यासाठी रात्रंदिवस मेहनत घेऊन त्यांनी फुलांच्या बागा जोपसल्या. काही महिन्यानंतर फुले निघण्यास सुरूवात झाली. ती फुले सेलू येथे नेऊन फुलांच्या व्यापार्‍यांना विक्री करण्यात येत होती. त्यानंतर मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी होत चालले असल्याने त्याचा फटका फुल उत्पादक शेतकर्‍यांना बसत होता. यानंतर काष्टे कुंटुबियांनी सन 2004 साली स्वत: च फुलाचे दुकान टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी क्रांती चौकात फुलांचे दुकान थाटले. सुरवातीस प्रतिसाद मिळत नसल्याने ते हताश झाले नाहीत. फुलांपासून हार, इतर साहित्य बनविण्यास त्यांनी सुरूवात केली. या कामास त्यांनी खंड पडू दिला नाही. शेतातील निघणारी फुले दुकानासह बाजारपेठत विक्री करण्यात येत, असे हळूहळू फुल बाजारात काष्टे कुटुंबियांनी पकड निर्माण केली. त्यांचा हा व्यवसाय वाढत चालला असल्याने व फुले कमी पडत असल्याने त्यांनी पुन्हा पाच एकर क्षेत्रात फुलांची लागवड केली.
यामध्ये निशिगंध 2 एकर, 20 गुठ्ठे, गुलाब अर्धा एकर, मोगरा अर्धा एकर, झंडू 1 एकर व इतर फुलांची अर्धा एकरवर लागवड केली. फुलांचे उत्पन्न हे बारमाही असल्याने त्यांची ही फुले बाहेरील राज्यात हैद्राबाद तसेच मुंबई, दादर व कल्याण या ठिकाणी विक्रीसाठी रेल्वेने पाठविण्यात येत आहेत. निशिगंध या फुल पिकातून दररोज एकरी 50 ते 60 क्विंटल फुले निघतात. त्यांना प्रति किलो 100 ते 120 रुपये पावसाळा व हिवाळा या सिझनमध्ये भाव मिळतो. तर एकरी 10 ते 15 क्विंटल उत्पन्न महिन्याला मिळते. गुलाब, मोगरा व झंडूच्या फुलांची स्वत: च्या फुलाच्या दुकानावर विक्री करण्यात येते. शेतीसह फुल दुकानाचे वार्षीक उत्पन्न 10 ते 12 लाख रुपयापर्यंत मिळत असल्याने पारंपारिक शेतीमधून शेतीला लावलेला खर्चही निघत नव्हता, मात्र फुलशेतीसह फुलाच्या दुकानाने आर्थिक वृद्धीत वाढ होवून काष्टे कुटंब स्थायिक झाले आहे.
यामुळे बाळासाहेब काष्टे यांनी तरुण शेतकर्‍यांनी फुल शेतीकडे वळण्याचे आवाहन करत जिल्ह्यात 25 एकर शेतकर्‍यांना फुलशेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे सांगितले. येणार्‍या काळात फुल लागवड करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

http://whatsapp.heeraagro.com/

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

1 Comment
  1. Dnyaneshwar Ingle says

    Join mi

Leave A Reply

Your email address will not be published.