रोग्याच्या दृष्टीने जनजागृती देशभर मोठ्या प्रमाणात होत आहे. सेंद्रिय शेती करणा-या शेतक-यांची संख्या वाढत आहे व ही काळाची गरज आहे. सेंद्रिय पध्दतीने उत्पादन घेतलेल्या शेत मालाला (फळेभाज्यांना) ग्रामीण भागात शहरात मागणी वाढत आहे. महाराष्ट्रात कृषी विभागसेंद्रिय शेतीची संकल्पना रुजविण्यासाठी प्रयत्न करत आहे. सेंद्रीय पध्दतीने पिकविलेल्या मालाला गुणवत्ता ही रासायनिक पध्दतीने पिकविलेल्या मालापेक्षा चांगला भाव मिळत आहे. शिवाय जमिनीचा पोत, आरोग्य अणि सुपीकता टिकविण्यासाठी सेंद्रिय शेती हा एकमेव पर्याय आहे. जमिनी नापिक रासायनिक खताचा बेसुमार वापर यामुळे होत आहेत. जीवामृत, गांडूळखत, हिरवळीचे खत, नॉडेप कंपोस्ट, दशपर्णी अर्क इत्यादीचा वापरसेंद्रिय शेती मध्ये करतात. १) जीवामृत : १० किलो देशी गाईचे शेण + देशी गाईचे गोमुत्र १० लिटर + १ किलो जुना काळा गुळ + बेसन १ किलो व मुठभर झाडाखालची माती २०० लीटर पाणी. वरील सर्व घटक बॅरलमध्ये घेऊन, काठीने ढवळावे, व दिवसात एकदा दोनदा ढवळावे. दोन दिवसात जीवामृत तयार होते. जिवामृत रावे, ओले गोणपापंधरा दिवसाकरिता वापरता येते. एक एकर शेवग्यासाठी दोनशे लिटर जीवामृत महिन्यातून एकदा दिले पाहिजे. प्रति झाड एक तांबा ओतावे आणि जीवामृत साडीतून गाळून घेऊन ठिबकद्वारे सोडता येते. २) ब्रम्हास्त्र : देशी गाईचे २० लिटर गोमुत्र त्यामध्ये कडूनिंबाचा पाला ३ किलो + पपईचे पाने २ किलो + सिताफळाची पाने २ किलो + करंजाचे पाने २ किलो + एरंडीचे पाने २ किलो + धोत्र्याची पान किलो.
वरील सर्व घटक एकत्र चांगले ढवळून घ्यावे. चुलीवर उकळा. चार पाच उकळ्या येईपर्यंत ठेवून नंतर ते द्रावण ४८ तास थड होऊ द्यावे. हे तयार झाले ब्रम्हास, मग तयार झालेले ब्रम्हास साठवून ठेवावे. १०० लिटर पाण्यामध्ये ३ लिटर ५० लिटर पाण्यामध्ये १.५ लिटरवर आपल्याला फवारण्यासाठी किती पाणी लागत त्यावर प्रमाण ठरवावे. ब्रम्हास पिकांवर फवारण्यास रस शोषणारी अळी, फळे व शेंगा पोखरणारी अळी यांचे नियंत्रण होते.
३) निमास्त्र : एका बॅरलमध्ये १०० लिटर पाणी + ५ लिटर देशी गाईचेगोमत्र + देशी गाईचे शेण १ किलो + कडूनिंबाचा पाला ४ किलो हे सर्व पदार्थ एकत्र करुन चांगले ढवळून घ्यावे. या निमस्त्राचा उपयोग रसशोषक किडी, अळी मावा यासाठी वापरतात.
४) दशपर्णी अर्क : २०० लिटर पाणी + २ किलो देशी गाईचे शेण + पाण्यात देशी गाईचे गोमुत्र १० लिटर = २०० ग्रॅम हळद पावडर + २०० ग्रॅम सुंठ पावडर + ५०० ग्रॅम अद्रकाची चटणी टाकावी व १ किलो तंबाखु + १ किलो तिखट हिरवी मिरचीची चटणी टाकून काठीने ढवळावे.
दुस-या दिवशी त्यामध्ये 3 किलो कडनिंबाचा पाला + २ किलो करजीची पाने + २ किलो धोत्र्याची पाने + २ किलो चिंचेच्या झाडाच २ किलो शेवग्याची पाने + २ किलो निरगुडीची पाने + २ किलो पेरूची + २ किलो आंब्याची पाने + २ किलो आघाडीची पाने + २ किलो बाभुळीच्या झाडांच्या फांद्या लहान लहान तुकडे करुन + २ किलो पपईची पाने + २ किलो बेलाची पाने
यापैकी कोणत्याही १० झाडांची पाने घ्यावीत. वरील पाच वनस्पतींच्या झाडांची पाने आवश्यक आहेत हे सर्व मिसळलेले द्रावण दिवसातून एकदा व दोनदा ढवळावे. एक महिनाभर चांगले आंबू द्यावे. ३० दिवसानंतर हे द्रावण कापडामधून गाळून घ्यावे. दशपर्ण अर्क सावलीत झाकून ठेवावा. दशपर्णी अर्काचा उपयोग सर्व किडीच्या नियंत्रणासाठी होतो. दशपर्णी अर्क आपणास ६ महिन्यापर्यंत वापरता येतो.
५) अग्नीअस्त्र : २० लिटर देशी गाईचे गोमुत्र + ५०० ग्रॅम तिखट, हिरव्या मिरचीचा ठेचा + १ किलो बारीक तंबाखू + ५०० ग्रॅम लसणाचा खरडा, हे सर्व पदार्थ एकत्र करुन ढवळून घ्यावे. ४ उकळ्या येईपर्यंत हे उकळावे. उकळल्यानंतर ४८ तास हे द्रावण थंड होऊ द्यावे. हे द्रावण कापडाने गाळून घ्यावे. अग्नीअस्त्र अळी, फळमाशीसाठी नियंत्रणाकरता फवारावे. अग्नीअस्त्र ३ महिन्यापर्यंत वापरता येते.
६) सप्त धान्यांकूर अर्क : १०० ग्रॅम तीळ , एक लहान भांड्यात घ्यावे ते पाण्यात भिजत ठेवावेत. दुस-या दिवशी एका भांड्यामध्ये १०० ग्रॅम मटकी + १०० ग्रॅम मूग + १०० ग्रॅम हरभरा + १०० ग्रॅम उडीद + १०० ग्रॅम चवळी + १०० ग्रॅम गहू घेऊन पाण्यात रात्रभर भिजत ठेवावे. या सर्व धान्यांना मोड आल्यावर ही धान्ये भांड्यातून एका कापडात बांधून ठेवावी. मोड आलेल्या या झाडधान्यांची एकत्र मिसळून चटणी करावी.
२०० लिटर पाणी + १० लिटर देशी गाईचे गोमुत्र वरील पैकी पाने + सहा मोड आलेल्या धान्याची चटणी एकत्र मिसळून घ्यावी. मिश्रण काठीने ढवळावे. परत एकदा हे मिश्रण तीन तासाने ढवळावे व स्थिर होऊ द्यावे. हे द्रावण कपड्याने गाळून पिकांवर, फळांवर फवारावे.
सप्त धान्यांकुर अर्क पिकांच्या वाढीसाठी चांगले पोषक आहे.
७ ) गोमत्र फवारणी : ५० लिटर पाण्यामध्ये ७ लिटर देशी गाईचे गोमूत्र पिकांवर कीडनाशक म्हणून फवारावे.
५० लिटर पाण्यामध्ये ५० मिली कडूनिंब तेल मिसळून पिक ग्रामीण कीडनाशक म्हणून फवारावे.