कांदा अन्नपदार्थ शिजवताना मसाल्याचे काम करतो. पोह्याला कांद्याशी हातमिळवणी करावीच लागते. भेळ कांद्याशिवाय चवदार होत नाही. कोशिंबिरीत तो कच्चा खाल्ला जातो. मटण करण्यापूर्वी कांदा तळून घेतात व त्याच्या पेस्टमध्ये मटण शिजवले जाते. एखाद्याला फिट-चक्कर आल्यास कांदा फोडून नाकाला लावतात. कांदा सर्दी पातळ करतो. कांदा सूज कमी करतो. कांद्याचा रस व मध खोकलयावर गुणकारी औषध आहे. ताप डोक्यात गेला तर कांदा किसून मस्तकावर बांधतात. कांदा औषधी गुणाचा आहे. ग्रामीण भागात कच्चा कांदा व भाकरी खातात. उन्हात काम करणार्याने कांदा खावा असा सल्ला दिला जातो. कांदा स्वयंपाकघराचा महाराजा आहे.
कांदा तीक्ष्ण/ तिखट
कांदा तीक्ष्ण व तिखट आहे. त्याचा तिखटपणा हा त्याच्या जातीनुसार असतो. कांदा लाल व पांढरा अशा दोन प्रकारात मिळतो. कांद्याला तिखटपणा 1) जात, 2) परिपक्वता, 3) जमिनीचे गुण, 4 ग शेतातील ओलावा, 5) कांद्याचे वय, 6) कांद्याचे टरफल, 7) कांद्याचा तिखटपणा एलिल प्रोपिल डाय सल्फाइड या त्याच्यातील तेलामुळे असतो. हे तेल लगेच बाष्प बनून उडते आणि कांदा कापणार्याला रडवतो.
कांदा उत्पादन अधिक ः-
कांदा भत्तरतात सर्वत्र पिकवला जातो. कांद्याचे व्यावसायिकदृष्ट्या मोइे उत्पादन आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, आसाम, तामिळनाडू या राज्यात घेतले जाते. कांदा आपण निर्यातही करतो आणि गरज पडली तर परदेशातून खरेदीही करतो. पाकिस्तानचा लाल कांदा विशेष प्रसिद्ध आहे. आपण श्रीलंका, पूर्व आफ्रिका, ब्रह्मदेश, मलाया, जपान, इराण या देशांना कांदा पाठवतो.
कांद्यासाठी शेतजमीनः-
दलदलीची किंवा चिकणमाती सोडून इतर सर्वप्रकारच्या जमिनीत कांदा उगवतो. रेताड, भुरभुरीत , साधारण दमट ओलसर जमीन कांदा पिकासाठी उत्तम मानली जाते. जमिनीत जीवांश असता पीक अधिक येते. कांद्याला भारी माती चालत नाही.
कांदा लागवडीसाठी 3-4 वेळा शेत नांगरून घ्यावे. माती ढेकळे फुटून बारीक झाली पाहिजे. जमीन सपाट करून कांद्याची रोपटी लावावीत.
कांदा पेरणी ः-
कांद्याचे बी एका ठिकाणी पेरून त्याची रोपटी (नर्सरीत) तयार करतात. जेव्हा कांद्याची रोपटी उगवतात तेव्हा ती उपटून शेतात पुन्हा प्रतिरोपित करतात. या दोन कार्यांसाठी देशातील विविध प्रांतांत वेगवेगळा काळ ( हंगाम) असतो.
याची माहिती पुढीलप्रमाणे –
1) डोंबरी क्षेत्रात फेबु्रवारी अखेर ते मे अखेर नर्सरीत बी पेरून रोपटी तयार करतात. ही रोपटी मे-जून या दोन महिन्यांत इतर शेतात प्रतिरोपित करतात.
2) आंध्र प्रदेशात कांद्याची नर्सरी ऑक्टोबरात तयार केली जाते आणि 15 नोव्हेंबरपर्यंत लागवड (प्रतिरोपण) केले जाते.
3) उत्तर भारतात नर्सरीमध्ये ऑक्टोबार ते नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत बी परेणी केली जाते. आणि 15 डिसेंबर ते पूर्ण जानेवारीत प्रतिरोपण केले जाते.
4) पश्चिम बंगालमध्ये सप्टेंबर अखेर ते नोव्हेंबरपर्यंत कांद्याचे बी पेरतात. आणि त्याचे प्रतिरोपण इतर शेतात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दोन महिन्यांत केले जाते.
5) महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतात डिसेंबरच्या मध्यकाळी नर्सरीत कांदा बी पेरतात व रोपटी उगवल्यानंतर त्याचे प्रतिरोपण जानेवारी अखेर करतात.
6) मध्यप्रदेशचे हवामान विदर्भासारखेच असते त्यामुळे विदर्भाप्रमाणेच बी पेरणी व प्रतिरोपण केले जाते.
7) पश्चिम महाराष्ट्र पुणे-निफाड भागात ऑक्टोबरमध्ये कांदा बी नर्सरीत पेरतात व प्रतिरोपण नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत करतात.
काद्यांच्या जाती ः-
भारत आणि भारताच्या बाहेरही कांद्याच्या अनेक जाती-प्रजाती आहेत. स्थानिक शेतकरी आपल्या आवडीनुसार आणि हवामानाप्रमाणे कांद्याचे बी खरेदी करत असतात व त्यांची पेरणी करतात. भारतातील लोकप्रिय कांद्याच्याजाती पुसा रतनार, पुसा माधवी, पुसा व्हाईट फ्लॅट, पुसा व्हाईट राऊंड, पुसा रेड, पाटणा रेड, पंजाब सिलेक्शन, हिसार-2, अर्ली ग्रॅनो, बी.एल-67, एस-48, एन-53, उदयपूर-102, अॅग्रिफाऊंड लाईटरेड, अर्का प्रगती, अर्का निकेतन, अर्का कल्याण इत्यादी.
जल/वाय ः-
भारतात बहुतेक सर्व प्रांतांत अनेकविध हवामानात कांद्याची पेरणी केली जाते. समुद्रसपाटीपासून 1400 ते 1900 मीटर उंचीवरही कांदा शेती केली जाते. कांदा हे नगदी पीक असल्याने शेतकरी हे काळीपूर्वक जोपासतात. कांद्याची गाठ तयार होत असताना हवामान थंड असावे. कांद्याला 14 ते 22 अंश सेल्सिअस तापमान असावे. तसेच जिथे 70 ते 105 सें.मी. पाऊस पडतो त्या प्रांतात कांदा पिकवू नये असे जाणकार सांगतात.
कांदा उत्पादन
कांद्याचे पीक बर्याच प्रांतांत वर्षातून एकदाच घेतात. परंतु आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये वर्षातून दोनवेळा कांद्याचे पीक घेतले जाते. पहिली पेरणी जून ते ऑक्टोबर व दुसरी पेरणी ऑक्टोबर ते जानेवारी असे दोन वेळा कांद्याचे पीक घेतात. काही अति उत्साही शेतकरी जानेवारी ते जूनमध्येही तिसर्यांदा कांदा पेरणी करून पाहताहेत. हे कांद्याशिवाय इतर पीक न घेता व्यावसायिक दृष्टीने कांदा पिकवतात. नर्सरीत कांद्याचे बी पेरून त्यासंची रोपटी विकण्याचा धंदाही अनेक जण करतात.
नर्सरी ते शेतातील प्रतिरोपण ः-
बी पेरून रोपटी तयार करण्याचे पहिले कार्य नसरीत केले जाते. नर्सरी म्हणजे रोपवाटिका, म्हणजेच रोपट्यांचे बालगृह. नर्सरीत रोपटी तयार झाल्यावर ती काढून (उपटून) कांदा पिकासाठी तयार केलेल्या शेतात नेऊन रोपली/रोवली जातात. यालाच प्रतिरोपण म्हणतात.
यासंबंधी काही माहिती –
1) 0.05 हेक्टर जमिनीतील ओलसर वाफ्यात कांदा-बी पेरुन रोपटी दाटीवाटीने तयार करतात, नंतर ती उपटून एक हेक्टर क्षेत्रात प्रतिरोपित करतात.
2) कांदा बी पेरणीचा नर्सरीतील वाफा 10 ते 12 सें.मी. उंचीचा तयार करतात. वाफ्याचा आकार 1 3 मीटर असतो. वाफ्यात वावरणे सोपे व्हावे असा उद्देश असतो.
3) नर्सरीतील वाफ्यात बी टाकण्यापूर्वी 10-12 दिवस आधी खत टाकले जाते.
4) नर्सरीसाठी कुजलेले खत 0.5 मेट्रिक टन घ्यावे. तसेच एक किलोग्रॅम अमोनियम सल्फेट. हे खत 1/200 हेक्टर जमिनीला पुरेसे होते.
5) वाफ्यांमध्ये चालणे, काम करणे, भांगलण व जलसिंचन सोपे व्हावे यासाठी अंतर ( पायवाट ) ठेवावे. पायवाट 30 ते 35 सें.मी. असावी. वाफ्यातील या छोट्या पायवाटेला शेतकरी मेढ म्हणतात.
6) वाफे समतल असावेत. बी विखरून टाकावे . काही शेतकरी बी विस्कटून टाकल्यानंतर राख टाकतात.
7) दर 4-5 दिवसांनी गादी वाफा पाण्याने भरपूर भिजवावा. असे भिजवण 6-7 वेळा व्हावे.
8) रोपटी 6 ते 8 इंच उंचीची होताच ती नर्सरीतून काढून शेतात प्रतिरोपित करावीत. रोपटी अडीच सें.मी. लोख रोपावीत.
9) काही शेतकरी कांद्याची पात (पाने) लहान लहान कांद्यासह बाजारात विक्रीला आणतात. याची भाजी केली जाते.
बी पेरून कांद्याची शेती ः-
नर्सरीत म्हणजेच रोपवाटिकेत कांद्याची रोपटी तयार करून ती शेतात प्रतिरेापित करतात. तसेच बी पेरून कांदा पिकवला जातो, हे शेतकरी नर्सरी करत नाहीत.
त्याबद्दलची माहिती –
1) 25 ते 30 सें.मी. अंतर ठेवून सर्या तयार कराव्यात. प्रत्येक सरीमध्ये 10 सें.मी. अंतरावर कांद्याचे बी दोन सें.मी. खोलीवर दाबावे.
2) डोंगरी प्रदेशात फेब्रुवारी ते जूनमध्ये बी पेरतात.
3) पठारी प्रदेशात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये कांदा बी पेरतात.
4) माती रेताड, भुसभुशीत असेल, तर बी अडीच ते तीन सें.मी. खोल पेरावे.
5) बी पेरल्यानंतर आठवड्यात अंकुरण होते.
6) दाटीवाटीने रेापटी उगवल्यास त्यांची विरळणी करावी.
7 ) दर 10 दिवसांनी भांगलण करून गवत, काडभकचरा काढून टाकावा.
खते व रासायनिक खते ः-
1) पेरणी करण्यापूर्वी 400 क्विंटल कुजलेले शेणखत शेतात प्रति हेक्टर टाकावे. मातीत मिसळून घ्यावे.
2) शेणखत न मिळाल्यास 750 क्विंटल नाइट साइल, कम्पोस्ट 240 क्विंटल पिग मेन्योर शेतात टाकावे.
3) एक महिन्यानंतर 450 किलोग्रॅम अमोनियम सल्फेट प्रति हेक्टर टाकावे.
4) वेळोवेळी भांगलण करून गवत, अनावश्यक रोपटी, कचरा काढून टाकावा म्हणजे कांद्याला खताची मात्रा चांगली मिळेल.
5) प्रत्येकी 4-5 दिवसानंतर जलसिंचनकरावे. म्हणजे उत्पन्न चांगले मिळेल.
लसूण
जेवण शाकाहारी असो वा मांसाहारी, मसाल्याच्या पदार्थात लसूण हमखास वापरला जातो. लसूण औषधी आहे. डोगेदुखीवर लसणाच्या पाकळ्या ठेचून कपाळावर चोळतात. सर्दी-खोकलला झाल्यास लसणाच्या पाकळ्यांची माळ गड्यात बांधली जाते. लसणयातही औषधीयुक्त तेल असल्याने उग्र दर्प येतो. या औशधी तत्त्वाला प्रोबिल डायसल्फाइड असे म्हणतात. लसूण रोगमुक्त करते, अन्न पचवते व वातावरणातील जंतू नष्ट करते.
जल-वायू ः-
लसणाला अधिक थंडी किंवा अधिक उष्णता मानवत नाही. उत्पादन कमी होते. समशीतोष्ण मध्यम हवामान असेल तर लसूण चांगला पिकतो.
शेत जमीन ः-
भारतात सर्वत्रच थोड्याफार प्रमाणात लसूण पिकवला जातो, परंतु आंध्रप्रदेश, तामिळनाडू, गुजरातचा राजकोट भाग, उत्तर प्रदेश हे लसणाच्या उत्पादनाविषयी विशेष प्रसिद्ध आहेत. समुद्रसपाटीपासून ते 950 ते 1250 मीटरपर्यंतच्या उंचीवरील क्षेत्रातही लसूण पिकवला जातो. तसेच जिथे कांदा पिकवतात तेथे लसूणसही पिकवतात. कांदा व लसूण ही जोडगोळी मसाल्याचे महाराजा आहेत.
लसणाच्या जाती-प्रजाती ः-
कृषी वेज्ञानिक म्हणतात की, बहुगुणी लसणावर अजूनही वेगवेगळे प्रयोग होत आहेत. लसणाची अशी जात शोधली जाते आहे की, देशभरातील कोठेही समप्रमाणात चांगले उत्पन्न देऊ शकेल. सध्या प्रचलित सणाच्या जाती- 1 ) फवारी, 2) एकनाळी, 3) जामनगर लोकल, 4) मुद्रासी, 5) राजले गडी, 6) जबलपूर लोकल, 7 ) पांढर्या सालीचा लसूण, 8) जांभळट सालीचा लसूण.
ऑग्रिफाउंड व्हाइट ही लसणाची सर्वोत्तम जात असून ही पर्पल ब्लाचरोधी आहे. ही जात साडेपाच ते सहा महिन्यांत तयार होते. प्रति हेक्टर 125 क्विंटल ते 140 क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळते. याच्या एका गाठीत वीस किंवा अधिक पाकळ्या असतात. ही जात व्यावसायिकदृष्ट्या शेतकर्यांना नफा मिळवून देणारी आहे.
खते व रासायनिक खते
वेगवेगळ्या प्रांतांतील कृषितज्ज्ञांनी प्रति हेक्टरी किती खते व रासायनिक खते शेतात टाकावीत याबद्दल मार्गदर्शन केले आहे.
1) लसणाच्या दोन सर्यांत 9 ते 10 सें.मी. अंतर असावे. तसेच दोन रोपट्यांत 12.5 सें.मी. अंतर ठेवावे. नायट्रोजन, फॉस्फर, पोटॅश 18 ः2 ः3 या प्रमाणात घ्यावेत व शेतात मिसळून टाकावेत. तसेच बोरॉन, झिंक व मॅग्नेशियम यांचे मिश्रणही 10 किलोग्रॅम प्रति हेक्टर टाकावे.
2) लुधियाना (पंजाब) प्रांतात लसणाच्या प्रति हेक्टरी शेतात नायट्रोजन 200 किलोग्रॅम, फॉस्फरस 50 किलोग्रॅम तसेच पोटॅश 50 किलोग्रॅम मिसळून टाकले असता उत्पादन भरपूर मिळाले.
3) पश्चिम बंगाल प्रांतात नायट्रोजन 60 किलोग्रॅम, फॉस्फरस 60 किलोग्रॅम व पोटॅश 120 किलोग्रॅम शेतात टाकले असता, फार चांगले उत्पन्न हाताशी आले.
4) शेत तयार करतानाच कुजलेले शेणखत 50 मेट्रिक टन प्रति हेक्टर वापरावे. त्यानंतर 2 वेळा 500 किलोग्रॅम अमोनियम सल्फेट टाकावे. एकदा पेरणीनंतर व दुसर्यांदा रोपटी उगवल्यानंतर. याचे उत्तम परिणाम निघाले.
लसणाची पेरणी ः –
1) डोंगरी क्षेत्रात लसणाची पेरणी मार्च महिन्याच्या मध्य ते एप्रिल मध्यापर्यंत करतात.
2) काही ठिकाणी वर्षातून 2 वेहा लसणाचे पीक घेतात. पहिले पीक मे महिन्याच्या सुरुवातीला व दुसरी पेरणी ऑक्टोबर महिन्यात करतात.
3) मैदानी प्रदेशात सप्टेंबर मध्य ते ऑक्टोबर मध्य या काळत्तत पेरणी करतात.
4) दक्षिण भारतात लसणाची शेती ऑगस्ट मध्य ते नोव्हेंबर मध्ये करतात. हा येथील पेरणीसाठी योग्य काळ समजला जातो.
5) एक हेक्टर लागवडीसाठी लसणाच्या 400 किलोग्रॅमपर्यंत कुड्या (पाकळ्या) लावतात. कुड्यांच्या आकारानुसार वजन कमी जास्त होऊ शकते. लसणाचे रोपए असो की कुड्या, त्या सशक्त असल्या पाहिजेत तरच उत्पन्न चांगले येईल.
6) मातीचे लहान लहान गादी वाफे बनवून त्यात लसणाच्या कुड्या दाबून पेरायच्या असतात.
7) लसणाच्या पेरणीच्या पाकळ्या 6 ते 7 सें.मी. खोल जमिनीत दाबाव्यात / पुराव्यात.
8 ) देान पेरणीतील पाकळ्यांमध्ये 6 ते 7 सें.मी. अंतर असावे. तसेच दोन सर्यांमध्ये (वाफे) 12 ते 15 सें.मी. अंतर असावे.
9) पाकळी मातीत दाबल्यानंतर त्यावर माती झाकावी व पेरणी पूर्ण झाल्यानंतर जलसिंचन करावे.
10 ) जलसिंचन करून चार दिवस शेत तसेच राहू द्यावे. नंतर एक फेरी मारून ज्या पाकळ्या उघड्या पडल्याअसतील त्यावर माती ढकलावी आणि जलसिंचन करावे.
भांगलण ः-
अ) पेरणीनंतर एक महिन्याने काळजीपूर्वक भांगलण करावी. रोपांना धक्का न लावता, अनावश्यक गवत, पालापाचोळा काढावा.
ब) दुसरी भांगलण दुसर्या महिन्यात करावी. रोपांच्या उघड्या मुळांवर माती चढवावी. कचरा-गवत काढावे.
जलसिंचन ः-
1) पहिले जलसिंचन पेरणीनंतर त्वरित करावे.
2) चार-पाच दिवसांनी उघड्या पाकळ्या मातीने झाकून पुन्हा जलसिंचन करावे.
3) कडक उन्हाळा असेल तर 3-4 दिवसांनीव हिवाळ्यात 10-12 दिवसांनी जलसिंचन करावे.
4) लसणाचे गाठी (कांदे) तयार होऊ लागताच जलसिंचन कमी करावे.
5) रोपट्यांची पाने (पाती) वाळू लागली की पीक तयार झाले असे समजावे.
6) लसूण काढण्यापूर्वी तीन दिवस आधी जलसिंचन करावे म्हणजे लसूण खोदून काढणे सोपे होईल.
उत्पन्न ः-
लसणाचे उत्पन्न आपल्या मेहनतीवर अवलंबून असते. माती, जलसिंचन, खत, भांगलण याकडे लक्ष द्यावे लागते. यात हेळसांड झाली की उत्पन्न घटते. साधारणतः दर हेक्टरी 50 ते 90 क्विंटलपर्यंत लसणाचे उत्पन्न मिळते.
थोडक्यात महत्त्वाचे ः-
लसूण काढल्यानंतर ते सर्व पीक चांगले सुकवावे. हे पीक ओलाव्याच्या जागेत ठेवू नये. या पिकाला लाकडी भुसा, काटक्या, कोळसा यांचा धूर/धग दिल्यास एक वर्षभर लसूण चांगला राहतो. काहीजण लसणाचा पाला न कापताच लसूण वाळवतात. त्यांच्या मोह्या बांधतात. कृषिमालाच्या वखारीत कोल्ड स्टोरेज (शीतगृह) उपलब्ध असते.तेथेही लसूण साठवला जातो.