ओट लागवड
हेल्थी फूड’ हे शब्द उच्चारले गेले की ओटस्, मुसली, ग्रीन टी, ऑलिव्ह ऑइल, प्रोबायोटिक ड्रिंक्स हे पदार्थ प्राधान्याने आठवतात. हे पदार्थ मूळचे आपल्याकडचे नाहीत. ते आरोग्याला चांगले आहेत खरे, पण काही प्रमाणात खर्चीकही आहेत.
आपल्याकडे जसं गहू, ज्वारी, बाजरी अशी धान्यं पिकतात, तसं ओट्स हे युरोप इथं पिकणारं एक धान्य आहे आणि ते कमी तापमान असलेल्या ठिकाणी वाढतं, तसंच जास्तीचा पाऊस सहन करू शकत नाही. ओट्स हे रोल किंवा बारीक केलेलं मिल बारीक केलेली पावडर अशा विविध स्वरुपात वापरता येऊ शकतं. म्युसेली किंवा विविध मिक्स ब्रेकफास्ट सीरिअलमध्ये यांचा वापर होतो. बिस्किटं आणि इतर बेकरी पदार्थांमध्येही हे वापरले जातात. याची खीर किंवा उपीट सकाळी नाश्त्याला खाता येतं.
1) ओट पिकाचा पाला हिरवागार, रसाळ, रुचकर व पौष्टिक असून, खोडदेखील रसाळ व लुसलुशीत असते. प्रथिने, शर्करायुक्त पदार्थ व विविध खनिजांचा पुरवठा करण्यासाठी हे सरस पीक आहे.
2) क्षारयुक्त अथवा पाणथळीच्या जमिनी वगळून इतर सर्व प्रकारच्या जमिनीत याची लागवड करावी. पाण्याचा उत्तम निचरा असणारी जमीन या पिकास चांगली मानवते. हे पीक थंड व उबदार हवामानात चांगले येते.
3) जमिनीची चांगली मशागत करून ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये याची लागवड करावी. लागवडीसाठी फुले हरिता, केंट या जातींची निवड करावी. लागवड पाभरीने 30 सें. मी. अंतरावर करावी. हेक्टरी 100 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
4) पेरणी करताना माती परीक्षणानुसार 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 30 किलो पालाश ही खतमात्रा द्यावी. नत्र खताचा दुसरा हप्ता हेक्टरी 50 किलो पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावा.
5) तणनियंत्रणासाठी 25 ते 30 दिवसांनी निंदणी अथवा खुरपणी करावी, त्यापुढील कालावधीत पिकांची उंची व वाढ जलद होत असल्यामुळे तणांचा जोर कमी होत जातो.
6) हिरव्या चाऱ्याचे उत्पादन अधिकाधिक प्रमाणात येण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार दहा ते बारा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाच ते सहा पाळ्या द्याव्यात.
7) पहिली कापणी 50 ते 55 दिवसांनी करावी. दुसरी कापणी 40 दिवसांनी करावी. जातीनुसार प्रति हेक्टरी सरासरी दोन कापण्यांमध्ये 600 क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. हिरव्या चाऱ्यात आठ ते नऊ टक्के प्रथिने असतात.
ओट्स खाण्याचे फायदे
ओट्स हे हेल्थी फूड या सदरात मोडत असलं, तरी ते आपल्या पारंपरिक पदार्थाचा भाग नाही. ते कुणी, किती आणि कसं वापरावं याचेही काही निकष आहेत. सध्या ओट्स खूप लोकप्रिय झाल्यानं कुणीही कसाही ओट्सचा वापर करत आहेत. कधी-कधी लहान मुलाना अशा पदार्थांची फारशी गरज नसतेही; पण केवळ हेल्थ फूड म्हणून त्यांनाही ओट्सचे पदार्थ बळेच दिले जातात.
ओट्स कितीही चांगले असले, तरी ते आपलं पारंपरिक फूड नाही. नाश्त्याला केवळ ओट्स खाण्यापेक्षा पोहे, उपीट, मोड आलेली कडधान्यं, थालीपीठ असे विविध पदार्थ आपल्या गरजेप्रमाणे ठेवले, तर त्यातून वेगवेगळे पौष्टिक घटक मिळू शकतात. ज्याप्रमाणे आपण गहू किंवा इतर धान्यं किलोवर दुकानातून घेत असतो, तसे ओट्स मिळत नाहीत. ते वेगवेगळ्या ब्रँडच्या नावाखाली मिळतात. विविध कंपन्या वेगवेगळ्या जसं, की तिखट, गोड, पुदिना, मसाला, केसर, करी अशा स्वरुपात ओट्स देतात. साधे ओट्सही मिळतात. ते आपण विविध रेसिपीत वापरू शकतो.
ओट्स इतके हेल्दी असण्यासारखं त्यात आहे तरी काय? तर यात तंतुमय पदार्थ जसं, की सोल्युबल फायबर किंवा विरघळणारे तंतुमय पदार्थ असतात. ते रक्तातील कोलेस्ट्रोलला कमी करण्यास मदत करत असतात. तंतुमय पदार्थ पोटात खूप वेळ राहत असल्यानं लवकर परत भूक लागत नाही, त्यामुळे वजन कमी करताना याचा उपयोग होतो. तसंच मधुमेहींना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला याचा उपयोग होतो.
‘ओट्स’चे फायदे नाकारता येण्यासारखे नक्कीच नाहीत. ओट्समध्ये तंतुमय पदार्थ भरपूर असतात. दुधाबरोबर शिजवलेले ओट्स थोडासा मध घालून न्याहरीत घेणे उत्तम. थकवा आणि मानसिक ताण कमी करणे, एकाग्रता वाढवणे, बद्धकोष्ठ होऊ न देणे, वजन कमी करण्यास मदत करणे या सगळ्या गोष्टींमध्ये ओट्स फायदेशीर असतात. रक्तदाबाशी संबंधित तक्रारी आणि हृदयरोगासाठीही ते चांगलेच आहेत.
ओट्सचा उपयोग उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह, आतड्यात जळजळीचे लक्षणे, दाहक आतडी रोग, अतिसार, बद्धकोष्टता यासारख्या रोग नियंत्रणासाठी होत आहे.
ओट हे एक रब्बी हंगामातील महत्त्वाचे चाऱ्याचे पीक आहे. यामध्ये ८ ते ९ टक्के प्रथिने असतात.
जमीन : मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन या पिकास मानवते.
पूर्वमशागत : एक नांगरट करावी. दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
पेरणी : पाभरीने ३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी. हेक्टकरी १०० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी ॲझोटोबॅक्टतर जीवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.
लागवडीचे तंत्र :
- थंड व दमट हवामान ओटच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. धुके व अतिथंड हवामान पिकाच्या वाढीस मारक आहे. त्यामुळे सध्याच्या काळात पेरणी पूर्ण करावी.
- पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते पोयट्याच्या जमिनीमध्ये चांगली वाढ होते. जमिनीचा सामू साधारणतः ७ ते ८ पर्यंत असावा. परंतु ८.५ च्या पुढे सामू असलेल्या जमिनीत ओट चांगले वाढत नाही.
- पेरणी दोन ओळीतील अंतर २५ सें.मी. ठेवून पाभरीने करावी.
- केंट, आर ओ -१९, जे एच ओ -८२२ या सुधारीत जातींची लागवड करावी. हेक्टरी १०० किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रतिदहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर आणि २५० ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
- जमीन नांगरटीनंतर आणि कुळवाच्या शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी १२ ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत समप्रमाणात पसरवून द्यावे. पेरणीच्या वेळेस हेक्टरी ४० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी हेक्टरी ४० किलो नत्र द्यावे.
- पेरणी करण्यापूर्वी जमीन ओलवून घेतल्यास बियाण्याची उगवण चांगली होते. त्यासाठी पेरणीपूर्वी पाच ते सात दिवस अगोदर जमिनीची ओलवणी करावी. जमिनीत वापसा येताच बियाण्यांची पेरणी करावी. बियाण्यांच्या उगवणीनंतर पाण्याची पहिली पाळी आठवड्याने द्यावी. नंतरच्या पाण्याच्या पाळ्या दर पंधरा दिवसांच्या अंतराने द्याव्यात. याप्रमाणे साधारणतः चार ते पाच पाण्याच्या पाळ्यांमध्ये पीक कापणीस तयार होते.
- या पिकात जंगली ओट व इतर रूंद पानांची तणे आढळून येतात. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते, उत्पादन कमी येते. खुरपणी करून तण नियंत्रण करावे.
सुधारित जाती : फुले हरिता, केंट, जे.एच.ओ.-८२२ या जातींचा वापर लागवडीसाठी करावा.
खते : पूर्वमशागतीच्या वेळेस प्रतिहेक्टकरी १०-१२ बैलगाड्या शेणखत जमिनीत मिसळावे. प्रतिहेक्टतरी ४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ४० किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. पेरणीनंतर २५ दिवसांनी ४० किलो नत्र, तसेच पहिल्या कापणीनंतर ४० किलो नत्र प्रतिहेक्टारी द्यावे.
आंतरमशागत : पेरणीनंतर पहिली खुरपणी ३० दिवसांनी करून तणाचा प्रार्दुभाव होणार याची काळजी घ्यावी.
पाणी व्यवस्थापन : या पिकास १० ते १२ दिवसांनी पाणी देण्याची व्यवस्था करावी.
उत्पादन : या पिकाचे दोन कापण्यांचे ५०० -६०० क्विंटल प्रतिहेक्टरी इतके उत्पादन मिळते.