निंबोळी अर्क

0

मागील भागात आपण पहिले कडूनिब एक मौल्यवान औषधी वनस्पती आहे. पुरातन काळापासून आयुर्वेद औषधांमध्ये तसेच शेती क्षेत्रात  याचा उपयोग होत आला आहे. कडुनिंब या झाडाची मुळे, खोड, खोडाची साल, डिंक, पान, फुले, फळे, कडूनिंब तेल , निंबोळी अर्क व तेल काढून राहिलेली पेंड अशी प्रत्येक गोष्ट अनमोल आहे. कडुनिंब दीर्घायुषी आहे. आज आपण निंबोळी अर्क कसा बनवावा आणि निंबोळी अर्कचे फायदे बघूया.

निंबोळी अर्क म्हणजे कडुलिंब या झाडाच्या बियांपासून(निंबोळ्या) काढलेला अर्क होय. कडुलिंबाच्या झाडाला फेब्रुवारी ते मार्च महिन्यांत मोहोर येतो आणि मे महिन्याच्या शेवटी निंबोळ्या पक्व होऊन त्यांचा सडा झाडाखाली पडतो. या निंबोळ्या गोळा करून त्यातील दगड-धोंडे आणि खडे वेगळे करून पोत्यामध्ये वर्षभर साठविता येतात. साठविलेल्या निंबोळीपासून वर्षभरात गरजेप्रमाणे निंबोळीचा अर्क तयार करण्यासाठी, तसेच निंबोळी पेंड तयार करण्यासाठी वापर करता येतो.कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेले ‘ॲझाडिराक्टीन’ कीटकनाशकाचे काम करते. या घटकाचे प्रमाण याच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात असते, तर ते पानांमध्ये कमी  प्रमाणात असते. शेतीमध्ये निंबोळी ला खुप महत्व आहे. निंबोळी चा किटकनाशक बणविण्यासाठी उपयोग होतो. निम्बोडीत असणारा  अॅझाडीरेक्टीन हा घटक किटक, सुत्रकृमी विषाणु आणि बुरशी यांचे नियंत्रण करण्यासाठी उपयोग होतो. हे फक्त चाऊन खाणारे व रस शोषणाय्रा किडींवर परिणाम करते.

निंबोळी अर्क बनविण्यासाठी लागणारे साहित्य –

 • कडुनिंबाच्या पूर्णपणे सुकलेल्या निंबोण्या – ५ किलो
 • चांगले व स्वच्छ पाणी– १०० लिटर
 • धुण्याची पावडर -१०० ग्रॅम
 • गाळण्यासाठी कापड

निंबोळी अर्क बनाविण्याची पद्धत –

 • निंबोण्या ५ किग्रॅ  घ्या त्या दळून त्यांची पावडर बनवा
 • १० लिटर पाण्यात ही पावडर रात्रभर भिजवा.
 • दुसरया  दिवशी सकाळी लाकडी काठीने हे पाणी दुधासारखे पांढरे दिसेपर्यंत ढवळा
 • दुहेरी कापडातून गाळून एकंदर १०० लिटर बनवा
 • धुण्याची पावडर चांगले ढवळून वापरा

फवारणीची वेळ

निंबोळीच्या अर्काची फवारणी संध्याकाळचे वेळेस म्हणजे दुपारी ४ वाजता नंतर करणे योग्य असते. हा तयार केलेला फवारा झाडावर कुठेही पडला तरी तो आंतरप्रवाही असल्यामुळे पूर्ण झाडात पोहोचतो.

निंबोळी अर्काचे फायदे

 • कडुनिंब अर्कामुळे पिकावरील विविध किडीच्या मादी अंडी घालण्यापासून परावृत्त होतात.
 • निंबोळी अर्क पिकांवर फवारणीसाठी वापरला असता विविध प्रकारच्या किडीस खाद्यप्रतिबंध करतो. उदा. पांढरी माशी, घरमाशी, मिलीबग, लष्करी अळी, तुडतुडे, फुलकिडे, उंटअळी इत्यादी. 
 • कडुनिंबातील अझाडिराक्‍टीन हा घटक किडीची वाढ थांबवतो, तसेच कात टाकण्यास प्रतिबंध करतो. त्यामुळे कीड गुदमरून मरण पावते. 
 • निंबोळी अर्क  कीटकांवर बहुआयामी आंतरप्रवाही किटकनाशकाप्रमाणे कार्य करतात.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.