गरज पाण्याची
पाण्याचा वाढता वापर म्हणजे जागतिकीकरणाच्या धोरणांसोबतच प्रचंड वेगाने झालेले शहरीकरण, शहरी जीवनशैलीमुळे मोठाले उद्योग, नव्याने उभी राहिलेली व्यापारी केंद्रं, बदललेले राहणीमान, करमणुकीची साधने, आरोग्याचा विचार या सर्वांमुळे पाण्याचा वापर कमालीचा वाढला आहे, इतकेच नव्हे शेतीसाठीही पाण्याची मागणी कित्तेक पटीने वाढली आहे. एकीकडे पाण्याची अशी मागणी वाढलेली असताना आपल्याला मिळणाऱ्या पाण्यात वाढ झाली आहे का? याचे उत्तर नकारार्थी आहे.
म्हणजे पावसामुळे पडणारे जास्तीत जास्त पाणी अडवणे, साठवणे. हा एकमात्र उपाय आपल्याकडे राहतो. पाण्याची उपलब्धता वाढवणे शक्य नसेल तर ही वाढलेली मागणी पूर्ण कशी करायची? हा अतिशय कळीचा मुद्दा आहे.
आपली पाण्याची गरज गेल्या २५ ते ३० वर्षांमध्ये त्यात वाढ झालेली आहे. महाराष्ट्रात दरवर्षी पावसामुळे उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे प्रमाण आहे, तब्बल १,६२,१७३ दशलक्ष घनमीटर (दलघमी). यापैकी १४ टक्के पाणी भूजलात जाते. उरलेले १,३९,५६१ दशलक्ष घनमीटर पृष्ठभागावरून म्हणजे जमिनीवरून पुढे नाले, ओढे, नद्यांमधून वाहते आणि अडवले तर धरणांमध्ये साठून राहते. या आकड्यांवरून नेमका अंदाज येणार नाही. या सर्वांचा एकत्रित विचार करता पाणी हा आता निकडीचा आणि संघर्षाचा मुद्दा बनला आहे.