• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 1, 2021
  • Login
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result
Home बातम्या

नागपुरात वेस्ट मॅनेजमेंट पार्क

Team Krushi Samrat by Team Krushi Samrat
April 30, 2019
in बातम्या
0
नागपुरात वेस्ट मॅनेजमेंट पार्क
Share on FacebookShare on WhatsApp

पृथ्वीवरचा केर कचरा नष्ट करायचा म्हटलं तर आपल्याला किती न काय वर्ष लागतील त्यामध्ये ठळक रूपाने म्हटले तर काचेच्या बॉटल्स किंवा वस्तू निसर्गातून, प्लास्टिक बॉटल्स किंवा पिशव्या ,तीच अवस्था खाद्यपदार्थ किंवा गुटखा, तंबाखूच्या पाऊचची आहे. थर्माकोलच्या वस्तू ,रुग्णालयातून निघणारा कचराही तसाच धोकादायक आहे. हा सर्व कचरा एकाच प्रकारचा आहे असे गृहीत धरून एकाच कचरा कुंडीत जमा करताना आपण कधी या गोष्टीचा विचार केला आहे का? आतापर्यंत नसेल केला, पण यानंतर करावाच लागणार आहे. याबाबत अभ्यासपूर्ण व पर्यावरणाबाबत संवेदनशील मार्गदर्शन करणारा वेस्ट मॅनेजमेंट पार्क नीरी व स्वच्छ असोसिएशन या एनजीओने साकारला आहे.
नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांच्या मार्गदर्शनात हा पार्क राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी)च्या ६१ व्या स्थापना दिनानिमित्त नागरिक व विद्यार्थ्यांसाठी खुला करण्यात आला आहे. स्वच्छ असोसिएशनच्या सहकार्याने पार्क ची निर्मिती करण्यात आली असून आपल्या घरातून, रुग्णालये, उद्योग, कंपन्या किंवा संस्थांच्या कार्यालयातून निघणाऱ्या सर्व प्रकारच्या कचऱ्याचे वर्गीकरण, व्यवस्थापन व पुनर्वापराचे सविस्तर मार्गदर्शन या पार्कमध्ये येते. उपक्रमाच्या प्रमुख डॉ. अत्या कपले, स्वच्छच्या अनसूया काळे-छाबरानी व शेफाली दुधबडे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
तस बघायला गेले तर आज खरंतर प्लास्टिक किंवा तत्सम धोकादायक वस्तूंना नकारच देणे गरजेचे आहे. मात्र विविध वस्तूंचा पुरवठा प्लास्टिकच्या साहित्यामध्येच होत असल्याने ते गरजेचे ठरते. पण या साहित्याचा शक्यतो पुनर्वापर करणे शक्य असल्यास तो करावा. ते शक्य नसेल तर घरगुती कचऱ्यामध्ये मिक्स करू नये. प्लास्टिक, धातूचे व काचेचे साहित्य, सॅनिटरी नॅपकीन, इलेक्ट्रानिक्स उपकरणे, घरातील वैद्यकीय कचरा यासाठी स्वतंत्र डस्टबीन असणे नितांत गरजेचे आहे. कारण हा कचरा अत्यंत धोकादायक असून तो एकत्रितपणे गेल्यास त्याचे वर्गीकरण व नंतर रिसायकलिंग करणे गुंतागुंतीचे ठरते. टाकाऊ अन्नपदार्थ, भाजीपाला, पानेफुले या गोष्टींपासून कंपोस्ट करणे शक्य आहे व पर्यावरणास लाभदायक आहे. खर्डे, पेपर वेस्ट, फळांचे छिलके या गोष्टी लवकर नष्ट करता येतात. पण प्लास्टिक, काच, धातूंच्या वस्तू, तार, मुलांचे डायपर, सॅनिटरी नॅपकीन, केस, औषधांचा कचरा नष्ट करणे शक्य नाही.
यात इ-कचऱ्याच्या राक्षसाची आणखी भर पडली आहे. या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन देणारे मॉडेल्स पार्कमध्ये आहेत. पृथ्वी गिळंकृत केलेला प्लास्टिकचा कचरा, सोबत धातूंचा कचरा, इलेक्ट्रानिक्स साहित्याचा कचरा, वैद्यकीय कचरा पर्यावरणास किती भीषण हानी पोहचवू शकतो, याचे दर्शन मॉडेल्सच्या माध्यमातून घडविण्यात आले आहे. केवळ दुष्परिणामच नाही तर या कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन कसे करू शकतो, याचे मॉडेल्ससह मार्गदर्शन करवून देण्यात आले आहे.
ओला कचरा, सुका कचरा आणि धोकादायक कचरा याचे वर्गीकरण करून वेगवेगळ्या डस्टबीनमध्ये गोळा केल्यास आपण पर्यावरण व देशाचीही सेवा करू शकतो. केवळ शासकीय यंत्रणांवर अवलंबून न राहता आपलीही काही जबाबदारी आहे, याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करून देण्यात आला आहे. आपल्या छोट्या छोट्या चुका टाळल्या तर आपण पर्यावरण संवर्धनात हातभार लावू शकतो, हे समजून घेण्यासाठी विद्यार्थी व नागरिकांनीही नीरीच्या गेट नं. २ जवळील या वेस्ट मॅनेजमेंट पार्कला भेट द्यावी.
नाना मिसाळ यांची कलात्मकता
या पार्कमध्ये आणखी एक गोष्ट लक्ष वेधून घेते ती चित्रकार नाना मिसाळ यांची कलात्मकता. नीरी व स्वच्छच्या सहयोगाने त्यांनी निरुपयोगी व टाकाऊ असलेल्या साहित्यापासून सुंदर अशी कलाकृती साकार केली आहे. फुटलेले सीमेंटचे पाईप्स, लाकडाचे तुकडे, फरशा आणि फुटलेल्या टाईल्सना कलात्मक आकार देऊन सजविले आहे. लोकडांच्या ओंडक्यांना प्राण्यांचा सुबक आकार दिला आहे. शिवाय इलेक्ट्रानिक्स, मेडिकल वेस्ट, बांधकाम साहित्य, प्लास्टिक कचरा दर्शविणारे मॉडेल्स तयार करण्यात अनसूया काळे, शेफाली दुधबडे यांच्यासह त्यांनी योगदान दिले आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Tags: Krushi SamratNagpur West Management Parkकृषी सम्राटनागपुरात वेस्ट मॅनेजमेंट पार्क
Team Krushi Samrat

Team Krushi Samrat

Related Posts

sonia-gandhi
बातम्या

कृषी कायद्यासाठी पर्यायी कायदे तयार करा

September 30, 2020
राज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी
बातम्या

राज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी

July 26, 2020
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा
बातम्या

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा

May 10, 2020

ताज्या बातम्या

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

by Team Krushi Samrat
October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

by Team Krushi Samrat
October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

by Team Krushi Samrat
October 16, 2020
परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास
शेती

परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास

by Team Krushi Samrat
October 16, 2020
खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव
शेती

खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव

by Team Krushi Samrat
October 15, 2020
कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक
शेती

कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक

by Team Krushi Samrat
October 15, 2020
२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित
शासकीय योजना

२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित

by Team Krushi Samrat
October 10, 2020
अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान
शेती

अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान

by Team Krushi Samrat
October 10, 2020
करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न
शेती

करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न

by Team Krushi Samrat
October 10, 2020
Prev Next

About us

Krushi Samrat

कृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अवजारे
  • आयुर्वेदिक नुस्खे
  • कायदा
  • कृषीसम्राट सल्ला
  • तंत्रज्ञान
  • प्रेरणा
  • प्रेरणादायक गोष्टी
  • बातम्या
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासकीय योजना
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • हवामान
  • हिन्दी

Recent News

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In