मुहूर्त आणखी लांबणीवर : पाऊस जूनमध्ये कमीच, पेरणीची घाई नको

1

सर्वांचे डोळे मान्सूनच्या आगमनाकडे लागलेअसले तरी यंदाही मान्सूनहुलकावणी देण्याचे चित्र आहे. राज्यात१७ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार नाही. तसेच जूनमध्ये सरासरीपेक्षा २० ते ३० टक्के पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामानतज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे धरणसाठे जपून वापरण्याबरोबरचशेतकऱ्यांनी पेरणीची घाई देखील करू नये असे आवाहनहवामानतज्ञांनी केले आहे.

सर्वांचे डोळे मान्सूनच्या आगमनाकडे लागले असले तरी यंदाही मान्सूनहुलकावणी देण्याचे चित्र आहे. राज्यात१७ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार नाही. तसेच जूनमध्ये सरासरीपेक्षा २० ते ३० टक्के पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामानतज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे धरणसाठे जपून वापरण्याबरोबरच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई देखील करू नये असे आवाहन हवामानतज्ञांनी केले आहे.

पावसाला उशीर होण्याची कारणे काय ?

एल निनोची स्थिती सामान्य आहे. मान्सून सक्रिय राहण्यासाठी समुद्राचे तापमान, हवेचा वेग असे विविध घटक कारणीभूत असतात. समुद्राच्या पृष्ठ्भागाचे तापमान सरासरी २८ ते ३० डिग्री सेल्सियस असते, हिंद महासागराच्या पूर्व भागाचे तापमान १ अंशाने कमी आणि पश्चिम भागाचे तापमान १ अंशाने जास्त असावे लागते. मान्सून पुढे जाण्यासाठी वाऱ्याचा वेगही योग्य असावा लागतो. आत्ता तशी स्थिती नाही. त्यामुळे जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. असे हवामान तज्ञांचे म्हणणे आहे.

अंदमानमध्ये २० मे च्या सुमारास मान्सून दाखल झाला. त्यामुळे ३० मे अखेरीस केरळात आणि पुढेराज्यात मान्सून दाखल होण्याची अपेक्षा होती. मात्र कोकण किनारपट्टी भागात यंदा मान्सून ची हजेरी लांबणार आहे. दरवर्षी साधारण ५ ते ७ जूनला हेरी लावणारा पाऊस यंदा १२ जूननंतर कोकण किनारपट्टीवर दाखल होईल. यावेळी पावसाच जोर असणार नाही. गेल्यावर्षीकिनारपट्टी भागत २९ मे रोजीच मान्सून दाखल झाला होता. मात्र त्यापुढील वाटचाल झाली नव्हती.मान्सून दाखल होऊन त्याची पुढील वाटचाल कशी होते , हे महत्वाचे आहे. यंदा किनारपट्टी भागातच  मान्सून ५ ते ६ दिवस उशिरा दाखल होत असल्याचे हवामानतज्ञांनी वर्तविले आहे. त्यामुळे त्याचे राज्यातील आगमन आणखी लांबेल असे दिसते .

दोन वर्ष राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होत आहे. यंदा राज्यात टँकरद्वारे मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करावा लागत आहे. याशिवाय चारा छावण्या उभारण्याची वेळी आली. हवामान तज्ञांचेम्हणणे आहेकी, मान्सूनची प्रगती अत्यंत धीम्या गतीने होत आहे. पाऊस झाल्यास तो १ सेंटीमीटरच्या आसपास राहील. हा पाऊस शेतीच्या मशागतीसाठी देखील उपयुक्त नाही. जूनमध्ये तुरळकच पाऊस होणार असल्याने धरणसाठ्यांचे नियोजन केले पाहिजे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

 

1 Comment
  1. Pankaj Vijay khadse says

    Details

Leave A Reply

Your email address will not be published.