चेअरमनवर फौजदारी गुन्हा दाखल करा
सात दिवसानंतर पुन्हा आंदोलन
पैठण /प्रतिनीधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनाने दि 12 नोव्हेंबर रोजी कारखान्यावर आंदोलन केले होते,त्या वेळी लेखी दिलेल्या आश्वासनानुसार अद्याप एकही आश्वासन पुर्ण न केल्यामुळे सचिन घायाळ शुगर इंडस्ट्रीज व संत एकनाथ स.सा.कारखाना चे चेअरमन यांच्यावर शेतकर्यांची फसवणूक केल्या बाबत गुन्हा दाखल करुन शेतकर्यांचे देयक मिळणे व सातबार्यावरील बोजे कमी करण्याच्या मागणीसाठी आज पुन्हा दि.1 जानेवारी रोजी संत एकनाथ कारखान्याचे सर्व ऊस उत्पादक शेतकरी ,ऊसतोड कामगार,ऊस वाहतूक ठेकेदार यांचेसह सह संत एकनाथ कारखान्याचे गेटवर सामुहिक अग्नीआत्मदहन आंदोलन करण्याचे ठरविले होते पंरुतु मागील वर्षी भिमा कोरेगाव येथे झालेले प्रकरण व त्या अनुषंगाने राज्यात झालेल्या त्याचे पडसाद मुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.त्यामुळे सदरील आंदोलन कारखान्याच्या गेटवर करण्यात आले मात्र त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन स्थगीत करत. येणार्या 7 दिवसानंतर संत एकनाथ सहकारी कारखान्यावर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा आंदोलन करत्यांनी दिला.
आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत तीव्र आंदोलन या पुढे ही सुरू ठेवले जाईल,आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाल्यास त्यानंतर संत एकनाथ कारखान्याचे सर्व ऊस उत्पादक शेतकरी ,ऊसतोड कामगार ,ऊस वाहतूक ठेकेदार आत्मदहन आंदोलन कोणत्याही वेळी करुन ज्याची जबाबदारी कारखान्याचे चेअरमन, सचिन घायाळ शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन सचिन घायाळ यांचेवर व साखर सहसंचालक औंरगाबाद यांची राहील असे यावेळी आंदोलनकर्त्या शेतकर्यांनी सांगितले.
सदरील निवेदनाची प्रत शेतकर्यांनी विशेष लेखापरिक्षक साखर आयुक्त कार्यालय औंरगाबाद व्ही.पी.सोनटक्के, एच.व्ही धनवई लेखापरिकक्षक,अशोक जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांना दिले.या वेळी स.पो.नि. ज्ञानेश्वर पायघण व एमआयडीसी,पोलिसांकडुन मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी पैठण तालुक्यातील शेकडो शेतकर्यांची उपस्थीती होती.