मोगऱ्याची शेती

0

मोग-याची शेती हा फुलशेतीत शेतक-यांना चांगला पर्याय ठरू शकेल. ही बाग एक वेळ केली की सलग १० वष्रे उत्पादन घेता येते. या शेतीला पाणी कमी प्रमाणात लागते. जनावरांकडून मोग-याला धास्ती नसते. यात शाश्वत उत्पन्न मिळत असून बाजारपेठेतील वाढत्या मागणीमुळे हमीभावही चांगला मिळतो. ठिबक सिंचनाने पाणी दिल्यास शेतक-यांसाठी अधिक किफायतशीर ठरते. विशेष म्हणजे एकदा लागवड केलेली बाग सलग १० वष्रे फुले देत असल्याने ठिबक सिंचनाचा खर्च पहिल्याच वर्षी वसूल होतो. तसेच रोपे लागवडीसाठी जमीन मशागत व रोपांचा खर्चही पहिल्याच वर्षी करावा लागतो. त्यामुळे वर्षाला सुमारे लाखभर रुपयांचा खर्च वाढतो. व्यावहारिक भाषेमध्ये बोलायचे झाल्यास १० वर्षाला २७ लाख रुपये गुंतवा आणि ९० लाख रुपये कमवा, असे म्हणावे लागेल.

मोगरा माहिती –

मोगरा हे एक प्रकारचे सुवासिक फुल आहे ज्याच्या सुगंधाने कोणाचेही मन मोहून जाऊ शकते. मोगऱ्याचे फुल पांढऱ्या रंगाचे असते व त्याची प्रकृती उष्ण असते.
मोग्याला संस्कृतमध्ये मालती किंवा मल्लिका म्हणतात व त्याचे लॅटिन नाव जेसमिनम सेमलेक आहे.
मोगरा हे खरेतर भारतीय झाड आहे व इथूनच त्याचा विस्तार इतर देशांमध्ये झाला.
मोगराचे झाड हे खर तर वेलीसारखे असते पण नंतर त्याचा झुडपासारखा विस्तार होतो.
मोगऱ्यापासून सुवासिक अत्तर तयार केले जाते. हे फुल २.५cm चे असते. मोगऱ्याचे फुल शक्यता पहाटेच तोडतात.
बेला, मोतिया, मदनमान, पालमपूर ह्या काही मोगऱ्याच्या प्रजाती आहेत ज्यामधील मोतिया सर्वात जास्त प्रसिद्ध आहे.
मोगऱ्याचे झाड वसंत ऋतुत चांगले बहरते त्यासाठी त्याला सुरुवातीला शेणखत घालावे लागते. मोठया मोगऱ्याला आधार दिल्यास वाढीस मदत होते. व फुल झडल्यावर त्या भागाची छाटनी केली जाते.
मोगऱ्याला बिया नसतात. लांब वाढलेली मोगऱ्याची फांदी वाकवून ती दुसऱ्या ठिकाणी पुरतात व नवीन रोप तयार करतात. तसेच जिथे नवीन पाने येतात तो भाग तोडून मातीत पुरल्यावर नोडपासून खाली मुळे फुटतात. ही माती ओलसर ठेवावी लागते. अशा प्रकारे मोगऱ्याचे रोप तयार केले जाते.
मोगऱ्याच्या फुलाचे तेलही बनवले जाते ज्याचा उपयोग क्रीम, शाम्पू आणि साबणात केला जातो. तसेच अरोमाथेरपीमध्ये मोगऱ्याच्या तेलाचा उपयोग तणाव पासून मुक्तता देण्यासाठी आणि आरामदायक म्हणून वापरला जातो.
स्त्रिया मोगऱ्याचा गजरा बनवुन तो श्रुंगार प्रसाधनासाठी केसात लावतात. खास करून दक्षिण भारतीय स्त्रिया याचा जास्त उपयोग करतात.
भगवान शिव आणि विष्णुसाठी जास्त करून मोगऱ्याची फुले वाहिली जातात.
या फुलांच्या कळ्यांचा उपयोग अल्सर, त्वचारोग आणि डोळ्यांच्या उपचारासाठी केला जातो. त्या अतिशय गुणकारक आहेत.
मोगऱ्याच्या झाडाची उंची १०-१५ फूट असते. दरवर्षी हे झाड १२-२४ इंचाने वाढते.
मोगरा हिवाळ्यात बहरतो व जिकडेतिकडे आपला सुंदर सुगंध पसरवतो. मोगऱ्याची फुले बराच काळ टवटवीत रहातात अगदी उष्ण तापमानात सुद्धा.
मोगऱ्याची चहा दररोज पिल्याने कॅन्सर दूर होण्यास मदत होते. तसेच ताप, इन्फेक्शन आणि मुत्ररोगामध्येही मोगऱ्याच्या चहामुळे आराम मिळतो. चीनमध्ये चहाचा स्वाद वाढविण्यासाठी या फुलांचा वापर होतो.
मोगऱ्याच्या पानांचा लेप जखम, खरुज किंवा फोडांवर केल्याने त्वरित आराम मिळतो.
मोगरा हे भारतातील अनेक सुंदर आणि सुवासिक फुलांपैकी एक आहे आणि त्याचा उपयोग अत्तर बनविण्यासाठी सुद्धा होतो.
मोगरा फिलिपिन्स देशाचे राष्ट्रीय फुल आहे.

 

जमीन : मोगरा सर्व प्रकारच्या जमिनीत येत असला तरी मोगऱ्याला मध्यम खोलीची व भुरकट रंगाची, चुनखडी नसलेली जमीन योग्य ठरते. जमिन चांगली निचरा होणारी असावी. निचरा न झाल्यास मोगऱ्याची पाने पावसाळ्यात पिवळी पडतात.

या शेतीसाठी मुरमाड व पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. नोव्हेंबर-डिसेंबर किंवा जून-जुलै महिन्यामध्ये या फुलशेतीची लागवड केली जाते. आपल्याजवळ बेंगलोर जातीची मोगरा रोपे चांगले उत्पादन देतात. एक एकर जागेमध्ये ही शेती करावयाची झाल्यास ४ हजार ५०० रोपे लागतात. दोन रोपांतील अंतर २ फूट ठेवावे लागते. २ वाफ्यांतील अंतर ५ फुटांचे असते. मोग-याच्या शेतीसाठी जमीन मशागत करताना एक एकरसाठी ८ टन शेणखत, २०० किलो एसएसपी खत, २०० किलो निम पेंडल व १२५ किलो करंज पेंडल खत घालावे लागते. तसेच ३०० किलो सुफला खताची आवश्यकता असते. पहिल्या वर्षी उत्पादन मिळत नाही. दीड वर्षापासून उत्पादनाला सुरुवात होते. फुलांची तोडणी सकाळी ७.३० ते १०.३० पर्यंत करायची असते. त्यानंतर फुलांचे पॅकिंग करून बाजारात पाठवावी लागतात. सध्या मोगरा फुलाला किलोमागे २०० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत आहे. एका एकरमागे दररोज मोगरा फुलाच्या किमान २५ किलो कळय़ा मिळतात. लागवड केल्यानंतर जानेवारीमध्ये छाटणी करावी लागते. आठ महिन्यांत सरासरी सहा टन उत्पादन मिळते. अशा प्रकारे फुलांची लागवड सुरू झाल्यानंतर प्रत्येक वर्षी किमान ९ लाख रुपये उत्पादन घेता येते.

पुर्वमशागत :

जमीन डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये 25 ते 30 सेंमी खोल नांगरून घ्यावी. 2-3 फुळवाच्या पाळ्या घालून सपाट करावी. नंतर 5 x 5 फुट अंतरावर 1 x 1 x 1 फुट आकारचे खड्डे खोदावेत.

खड्डा कसा भरावा :

खड्डा भरताना प्रथम तळाशी वाळलेले गवत. काडी कचरा सहा इंच उंचीपर्यंत भरावा व नंतर एक घमेले पुर्ण कुजलेले शेणखत किंवा एक ओंजळभर गांडूळ खत व कल्पतरू 100 ग्रॅम टाकून मातीने खड्डा भरून घ्यावा.

हवामान :

मोगरा साधारणत: स्वच्छ हवामानात चांगल्या प्रकारे येतो. अतिशय थंडी चालत नाही. मोगऱ्याची चांगली वाढ होण्यास 25 ते 35 डिग्री से. तापमान योग्य ठरते. अशा हवामानात कळ्या भरपूर लागून उत्पन्न वाढते.

मोगरा लागवडीचा काळ :

मोगऱ्याची लागवड जूनचा पहिला पाऊस पडून गेल्यानंतर करावी. मोगऱ्याची लागवड शक्यतो पिशवीतील रोपे लावून करावी. त्यामुळे दीड ते दोन महिने रोपे नर्सरीत वाढतात व मर टळली जाते.

पहिल्या वर्षी खते व कीटकनाशके ४५ हजार रुपये, रोपे ३५ हजार रुपये, बेड खर्च १० हजार रुपये, ठिबक सिंचन खर्च ३५ हजार रुपये, वाहतूक खर्च ५ हजार रुपये, तर कामगार मजुरी २ लाख ४० हजार रुपये अशाप्रकारे एकूण ३ लाख ७० हजार रुपये खर्च येतो. मात्र या बदल्यात ९ लाख रुपये हमखास मिळत असल्याने ४ लाख ३० हजार रुपये आर्थिक फायदा होतो. पहिल्या वर्षातील एकूण खर्चामधील किमान १ लाख रुपये खर्च दुस-या वर्षापासून करावा लागत नसल्याने ५ लाख १० हजार रुपये तिस-या वर्षापासून निव्वळ नफा मिळू शकतो. एकदा केलेली बाग सलग दहा वर्षे राहत असल्याने या दहा वर्षामध्ये २७ लाख रुपये खर्च येतो. मात्र यातून ९० लाख रुपयाचे आर्थिक उत्पन्न मिळते. त्यामुळे तब्बल ६३ लाख रुपयांचा आर्थिक फायदा होऊ शकतो.

मोगऱ्याच्या जाती :

मोतीचा बेला : कळी गोलाकार असते आणि फुलात दुहेरी पाकळ्या गोलाकार असतात.
बेला : या मोगऱ्याच्या जातीला तामिळ भोषेत ‘गुडूमल्ली’ म्हणतात. फुलाला दुहेरी पाकळ्या असतात पण लांब नसतात.
हजरा बेला : कानडी भाषेत ‘सुजीमल्लीरो’ म्हणतात. फुलात एकेरी पाकळ्या असतात.
मुंग्ना : तामिळ भाषेत ‘अड्डुकुमल्ली’ व कानडीत ‘एलुसूत्ते मल्लरी’ म्हणतात. कळ्या आकाराने मोठ्या असतात. फुलात अनेक गोलाकार पाकळ्या असतात.
शेतकरी मोगरा : ह्या मोगऱ्याला चांगल्या प्रतीच्या कळ्या येत असून हार व गजरे याकरीता वापरला जातो.
बट मोगरा : ह्या मोगऱ्याच्या कळ्या आखुड असून कळ्या चांगल्या टणक फुगतात.

लिलीची लागवड : भाग – १

Leave A Reply

Your email address will not be published.