ऊस लागणीच्या आधुनिक पद्धती :

0

महाराष्ट्रात ऊसाची लागण सुरु, पुर्वहंगाम आणि आडसाली या तीन हंगामात केली जाते. या तिन्ही हंगामासाठी जमिनीचा प्रकार, ओळीतील अंतर व ऊस बेणेप्रकार यानुसार करावी . येणाऱ्या हंगामामध्ये ऊस तोडणी यंत्राच्या सह्याने वेळेत ऊसाची तोड होण्याच्या दृष्टीने कोणती लागवड पद्धत वापरावी यासारखे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत अध्यावत माहिती करून घेणे आवश्यक आहे.

अ) जमिनीची प्रकारानुसार ऊस लागण:

१) ओली लागण :

या लागण पद्धतीमध्ये पाणी सरींमध्ये सोडून त्यामध्ये टिपरी पायाने किंवा हाताने दाबली जातात. हलक्या जमिनीत ओली लागण केल्यास बेणे खोलवर जात नाही व उगवण समधानकारक होते. त्यामुळे हलक्या जमिनीत ओली लागण करावी.

मध्यम ते भारी जमिनीत ओली लागण केल्यास बेणे खोलवर दाबले जाते. उगवण उशिरा होते व उगवण एकसारखी होत नाही.

२)  कोरडी लागवण :

या लागण पद्धतीमध्ये सरीमध्ये कुदळीने २ ते ३ इंच खोलीवर चळी घेऊन योग्य अंतरावर ऊस बेणे मांडून ते मातीने बुजविले जाते व त्यानंतर पाणी दिले जाते. यामुळे टिपरी जास्त खोलवर जात नाही आणि उगवण लवकर व एकसारखी होते. कोरडी लागण मध्यम ते भारी जमीनीत फायदेशीर ठरते.

ब) सरी अंतरानुसार ऊस लागण :

१) पारंपारिक पद्धत:

पारंपरिक पद्धतीमध्ये तीन फुट अंतरावर सऱ्या काढून सवाई/दिडकीने लागण केली जाते. यामुळे फुटव्यांची संख्या जास्त होऊन मर जास्त प्रमाणात होते. ऊसाची जाडी कमी राहते. ऊसाला योग्य सूर्यप्रकाश व हवा न मिळाल्याने उत्पादनात घट येते.

२) लांब सरी पद्धत:

या लागण पद्धतीमध्ये जमिनीच्या उतारानुसार ४० ते ६० मीटरपर्यंत सरीची लाबी ठेवतात. जमिनीचा उतार ०.३ ते ०.४ टक्यांपर्यंत असेल तर उताराच्या दिशेने सरी काढावी व उतार ०.४ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास उताराला आडव्या सऱ्या पाडून ऊस लागण करावी. या लागवड पद्धतीमध्ये सरीतील अंतर हलक्या जमिनीत तीन फुट व भारी जमिनीमध्ये ३.२५ ते ४ फुट अंतरावर ठेवले जाते.

३) ऊस पट्टा पद्धत (२.५ द ५फुट किंवा ३ द ६ फुट) :

जमिनीच्या प्रकारानुसार पट्टा पद्धतीने लागण करावी. हलक्या जमिनीत २.५ फुट अंतरावर रीझरच्या सहाय्याने सलग सऱ्या पाडून दोन सऱ्यामध्ये ऊसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी. म्हणजे दोन जोड ओळीत ५ फुट अंतरावर सऱ्या पाडून पहिल्या दोन सऱ्या ऊसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी म्हणजे दोन जोड ओळीत अंतर ६ पट्टा तयार होतो.

पट्टा पद्धतीने ऊस लागण करण्याचे फायदे :

१. भरपूर सूर्यप्रकाश व हवा मिळाल्यामुळे ऊसाची वाढ जोमदार होते व उत्पादनात वाढ होते.

२. ऊस पिकावर अनिष्ठ परिणाम न होता आंतरपिकाचे उत्पादन मिळते व तणांचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो.

३. आधुनिक ठिबक सिचन पद्धतीसाठी पट्टा पद्धत अतिशय योग्य आहे.

४. ऊस शेतातील यांत्रिकीकरणासाठी ही पद्धत योग्य आहे.

५. पट्ट्यामुळे पिक संरक्षण चांगल्या पद्धतीने करता येते.

६. ऊस बांधणीनंतर दोन ओळींमध्ये एक सरी तयार होते. त्या एका सरीला पाणी देऊन ऊसाच्या दोन्ही ओळी भिजविता येतात. त्यामुळे पाण्याची ३०-३५ टक्के बचत होते.

४) रुंद सरी पद्धत : या लागण पद्धतीमध्ये दोन सरीतील अंतर ४ फुट, ४.५ फुट किंवा ५ फुट ठेवले जाते. जमिनीच्या उतारानुसार ४० ते ६० मीटरपर्यंत सरीची लांबी ठेवावी. जमिनीचा उतार ०.३ ते०.४ टक्यांपर्यंत असेल तर उताराच्या दिशेनेसरी काढावी व उतार ०.०४ टक्के पेक्षा जास्त असल्यास उताराला आडव्या सऱ्या पाडून ऊस लागण करावी. या लागण पद्धतीमध्ये जमिनीच्या उतारानुसार सरींची लांबी ठेवतात.

फायदे :

१. भरपूर सूर्यप्रकाश व हवा मिळाल्यामुळे फुटव्यांची संख्या वाढते. ऊसाची वाढ जोमदार होते व उत्पादनात वाढ होते.

२. ऊसपिकावर अनिष्ठ परिणाम न होता पिकाचे उत्पादन मिळते व तणांचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो.

३. ऊस शेतातील यांत्रिकीकरणासाठी ही पद्धत योग्य आहे. कारण यात यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडणी करता येते.

४. सरीतील अंतरामुळे पिक संरक्षण चांगल्या पद्धतीने करता येते.

५. अंतरमशागत सुलभतेने करता येते.

६. रुंद सरीमुळे ऊस पिकामध्ये आंतरपीक घेणे शक्य होते.

७. खोडवा ठेवल्यानंतर पाचट सऱ्यांमध्ये पूर्णपणे बसते.

क) बेणे प्रकारानुसार ऊस लागण :

१) एक डोळा पद्धत:

ही पद्धत आडसाली शिफारस केली असून या पद्धतीमध्ये ऊस लागणीसाठी एक डोळा टिपरीचा वापर केला जातो. बेणे तयार करताना डोळ्यांचा वरच्या बाजूला साधारण १/३ भाग व खालच्या बाजूस २/३ भाग ठेवून धारदार कोयत्याने छाटावे. यामुळे काडीमधील अन्नाश उस उगवणीपर्यंत मिळतो व कोंब जोमदार वाढतो. एक डोळा लागण करताना दोन डोळ्यातील अंतर३० सें.मी. ठेवावे. यामध्ये बेणेखर्चात ६६% बचत होते.

२) दोन डोळा पद्धत: ही लागवड पद्धत आडसाली, पूर्वहंगामी आणि सूरु हंगामासाठी उस लागणीसाठी शिफारशीत केली असून या पद्धतीमध्ये ऊस लागणीसाठी दोन डोळ्याची टिपरी वापरतात. दोन डोळ्यांच्या टिपरीची लागण करताना टिपऱ्यामधील अंतर १५-२० सें. मी. ठेवावे. उस लागवण साधारण २० ते २५ दिवसात होते. या पद्धतीने लागण केल्यास हेक्टरी २५,००० ऊस बेणे लागते.

एक डोळा ऊस रोपे निर्मिती

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.