• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 25, 2021
  • Login
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result
Home यशोगाथा

बागायती कापसाची आधुनिक लागवड

Team Krushi Samrat by Team Krushi Samrat
December 5, 2018
in यशोगाथा
1
बागायती कापसाची आधुनिक लागवड
Share on FacebookShare on WhatsApp

कापसाचे पीक हे जास्त कालावधीचे पीक आहे. कापसासाठी स्वच्छ, उबदार व कोरडे हवामान अनुकूल असते. कपाशीच्या बियाण्याची उगवण होण्यासाठी १८ ते २० अंश सेल्सिअस, अधिक वाढ होण्यासाठी २० ते २७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची आवश्यकता असते. कापसासाठी किमान व कमाल तापमान १५ ते ३५ अंश सेल्सीअस व हवेतील आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा कमी असावी लागते. उष्ण दिवस आणि थंड रात्र याप्रकारचे हवामान बोंडे चांगली भरण्यास व उमलण्यास उपयुक्त असते.

कापसाचे पीक सुमारे सहा महिने शेतात राहत असल्यामुळे योग्य जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची असते. कपाशी लागवडीसाठी काळी, मध्यम ते खोल (९० सें.मी) व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन निवडावी. उथळ, हलक्या क्षारयुक्त आणि पानथळ जमिनीत कापसाची लागवड करण्याचे टाळावे. अन्नद्रव्याची उपलब्धता व जमिनीचा सामू याचा परस्पर संबंध असल्याने जमिनीचा सामू साधारणत: ६ ते ८.५ पर्यत असावा.

कापसाच्या झाडांची मुळे जमिनीत ७० ते ९० दिवसात ६० ते ९० सें.मी पर्यंत खोल वाढतात. कापसाच्या मुळांची वाढ चांगली व्हावी यासाठी, एक खोल नांगरट व २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडावीत. आधीच्या पिकांची धसकटे, पळकाट्या, पाला व इतर कचरा गोळा करुन तो जाळावा व शेत स्वच्छ ठेवावे. त्यामुळे कीड व रोग यांच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होते. शेणखत वा कंपोस्ट खत हेक्टरी २५ गाड्या या प्रमाणात मिसळावे. ९० सें.मी. अंतरावर उथळ स-या पाडाव्यात, उथळ स-यांमुळे कपाशीला आवश्यक तेवढे पाणी देता येते व त्यामुळे पाण्याची बचत होते. खोल व रुंद स-यांमुळे झाडाची मुळे वर राहतात व जादा पाण्यामुळे पिकांची कायिक, शाकीय वाढ जास्त होऊन उत्पादनात घट येते. शिवाय पाणीही जरुरीपेक्षा जास्त दिले जाते. स-यांची लांबी जमिनीच्या प्रकारानुसार ६ ते ८ मीटर ठेवावी.

 कापूस लागवडीचे महत्त्व :

कापूस हे हुकमी पीक असल्याने, बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असल्याने कापसाच्या लागवडीकडे शेतकरी वळू लागले. परंतु खतांच्या भरमसाठ वाढलेल्या किंमती, अनावश्यक होत चाललेले रोगट झाड, कापसाला दोन महिने पडणारा ताण ह्यासारख्या समस्या आहेत. यावर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने मात करता येते.

खानदेश, मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये कापूस हे पारंपारिक पीक असल्यामुळे कापसास कमी अधिक भाव मिळाला तरी हे पीक शेतकरी करीत असतात.

जाती : सुधारित जातीमध्ये -२, राशी -११, सावित्री, ब्रम्हा तसेच अलीकडे नांदेड -४४, अजित व महिको कंपनीच्या जाती प्रचलित आहेत.
लांब धाग्याच्या सीओ -२ जाती प्रसिद्ध असून वरलक्ष्मी, सावित्री, एच -४,५,६ ह्या जातीही हल्लीच्या काळात प्रसिद्ध असून अशा जातींची पाने तांबुस पडत असली तरी उत्पन्नास त्या चांगल्या असल्या कारणाने वेगाने प्रचलित होत गेल्या.

जमीन : सर्वसाधारणपणे या विकास काळी, भारी जमीन मानवते असे आजपर्यंतच्या अनुभवावरून सिद्ध आहे. म्हणून जी जमीन कापसास मानवते त्या जानिनीस भारी काळी कापसाची जमीन ( Black Cotton Soil) असे म्हटले जाते. अशा जमिनीत एकदा बी पेरले की, पावसाच्या पाण्यावर हे पीक हमखास येते. परंतु जसजशा कापसाच्या लवकर येणार्‍या, भरपूर उत्पन्नाच्या संकरित जाती विकसित झाल्या, तसतसे हे पीक मध्यम, करड्या, हलक्या जमिनीमध्ये देखील अनेक राज्यांच्या विविध भागात घेतले जाऊ लागले आणि सध्या हे पीक बागायती झाल्याने चांगले उत्पन्नही येते.

हवामान : उष्ण व दमट हवामान कापूस पिकास मानवते. थंडीचे हवामान या पिकास मानवत नाही. ढगाळ हवामानामध्ये, झिमझिम पावसामध्ये, फुलपगडी, पात्यांची गळ होत असल्यामुळे तसेच फुलपगडी, पात्यांचे पक्क्या बोंडामध्ये रूपांतर होतात कापसाची कवडी होते यामुळे प्रचंड नुकसान होते.

पेरणी

बागायती कपासाची पेरणी वेळेवर करणे अत्यंत आवश्यक आहे. पेरणी उशिरा झाल्यास वेचणीच्या वेळी पाऊस येऊन नुकसान संभवते किंवा त्यावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट येते. पेरणी झाल्यानंतर लगेचच ४ ते ६ इंच आकाराच्या सच्छिद्र पॉलिथिन पिशव्यांमध्ये माती आणि कंपोस्ट अथवा शेणखत भरावे व भरपूर पाणी द्यावे. नंतर प्रत्येक पिशवीवर २ ते ३ बिया लाव्याव्यात. या पिशव्यांचा उपयोग नांगे भरण्यासाठी करावा. तोपर्यंत पिशव्या झाडाच्या सावलीत ठेऊन त्यांचे किडीपासून सरंक्षण करावे व वरचेवर पाणी द्यावे. साधारणपणे एका एकराच्या नांग्या भरण्यासाठी २५० ते ३०० पिशव्या पुरतात.

वेगवेगळ्या भागासाठी, उदा. १) सोलापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांसाठी मार्चचा पहिला पंधरवडा, २) अहमदनगर जिल्हयासाठी एप्रिलचा पहिला पंधरवडा आणि ३) खानदेश, विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी मे चा दुसरा पंधरवडा, याप्रमाणे पेरणीच्या वेळीची शिफारस केलेली आहे. पेरणी करताना सरीच्या मध्यावर २-३ इंच खोल खड्डा करावा व त्यात शिफारस केल्याप्रमाणे रासायनिक खते, बिया टाकून पूर्णपणे मातीने झाकावे व लगेच पाणी द्यावे. तसेच सरी पाडण्यापूर्वी शेणखत दिले नसल्यास प्रत्येक खड्ड्यात रासायनिक खतांबरोबर शेणखत द्यावे.

बीटी कपाशी वाणांची लागवड वातावरणाचे तापमान ३५ डि.से. पेक्षा कमी झाल्यावरच (२५ मे नंतर) करावी. तसेच कपाशीची लागवड जमीन ओलावून वापशावर करावी.

आंतरमशागत :

  • नांग्या भरणे

सर्वसाधारणपणे १० दिवसांत सर्व बिया उगवतात, ज्या ठिकाणी बी उगवले नसेल त्या ठिकाणी राखून ठेवलेल्या बियाण्यापासूनच, त्याच सुधारित अगर संकर वाणाचे नांग्या भरण्यासाठी वापरावे व लगेच पाणी द्यावे, किंवा वर उल्लेख केल्याप्रमाणे पॉलिथिन पिशव्यांतील रोपे २० ते २५ दिवसांच्या आतच लावावीत.

  • विरळणी

पंधरा दिवसांनंतर प्रत्येक फुलीवर दोनच जोमदार रोपे ठेऊन बाकीची उपटून टाकावीत. विरळणी जमीन ओली असताना करावी.

  • खुरपणी

पेरणीनंतर जरुरीप्रमाणे दोन खुरपण्या व कोळपणी करुन ६० दिवसांपर्यंत पीक तणविरहीत ठेवावे. यासाठी जेथे शक्य असेल तेथे जरुरीप्रमाणे रासायनिक तणनाशकांचा वापर करावा. त्यासाठी खालीलप्रमाणे एक रासायनिक तणनाशक वापरावे व आवश्यकतेप्रमाणे पिकाच्या खुरपण्या कराव्यात. तणनाशकामुळे खुरपणीच्या खर्चात बचत होते.

 

Heera-Inline

 

बागायती कपाशीसाठी रासायनिक खते

बागायती कापूस ही रासायनिक खतांच्या मात्रांना योग्य प्रतिसाद देते म्हणून खतांचा पुरवठा ही एक महत्त्वाची बाब आहे. संकरित कापसासाठी प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश, तर सुधारित वाणांसाठी ८० किलो गाड्या शेणखत शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर द्यावे किंवा खते कमी असल्यास लागवडीच्या वेळी प्रत्येक फुलीवर छोटा खड्डा घेऊन त्यात ओंजळभर शेणखत टाकावे व मातीत चांगले मिसळावे. वीस टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेले नत्र समान दोन हप्त्यांत पेरणीनंतर ३० व ६० दिवसांनी द्यावे. बीटी वाणासाठी शिफारशीत खतमात्रेपेक्षा २५ टक्के रासायनिक खतमात्रा (१२५:६५:६५ किलो प्रति हे.) जास्त घ्याव्यात.

द्रवरुप खतांचा वापर करताना माती परिक्षण अहवालाचा अभ्यास करुन खतांच्या मात्रा देणे योग्य ठरते. नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख घटकांव्यतिरिक्त कापूस पिकास मॅग्नेशियम, गंधक, लोह, जस्त, मॅगनीज आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुध्दा गरज असते. ही अन्नद्रव्ये विद्राव्य खतांमध्ये उपलब्ध असतात. सूक्ष्म अन्नद्रव्यांमुळे बोंडाची पूर्णपणे वाढ होऊन बोंडे लवकर फुटतात. द्रवरुप खते संचाद्वारे देण्यासाठी व्हेंचुरी किंवा खत टाकी इंजेक्टर पंप या साधनांचा वापर करावा.

पाणी : बागायती पिकांस दर ८ दिवसांनी पाणी द्यावे. पाणी चूळ भरून, ठिबकने किंवा दांडाने द्यावे. या कापसामध्ये आंतरपीक म्हणून धना ( कोथिंबीर ) पुंजक्याने करता येईल. उगवणीस जर्मिनेटरचा वापर करावा. धना उगवून आल्यानंतर २ -३ दिवसांनी पाणी द्यावे. म्हणजे पाणी देताना पाणी साचणार नाही व साचलेले पाणी तापणार नाही.

वेचणी : साधारणत: पहिली वेचणी दसरा ते दिवाळीच्या दरम्यान सुरू होऊन शेवटची वेचणी डिसेंबरपर्यंत पूर्ण होते. वेचणी पुर्ण झाल्यानंतर राहिलेल्या कैर्‍या काढून सुकवाव्यात. कॉटन थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर ही औषधे वापरल्यास बोंडांची वाढ झपाट्याने होते. बोंडामध्ये कापूस भरगच्च व वजनदार भरतो. त्यामुळे कापसाच्या वजनात वाढ होऊन उत्पादन अधिक प्रमाणात मिळते. तसेच कापसाची कवडीही होत नाही. माल लवकर तयार होतोच, तसेचे ती वेचण्यांमध्येच पीक मोकळे होऊन पुढील पिकास रान लवकर वापरता येते व तीनही वेचानीचा कापूस एकसारखा व चांगल्या प्रतीची मिळतो. तीन ते चार वेचण्या साधारण डिसेंबरपर्यंत पूर्ण होतात. तथापि शेतकरी पुढे तीन ते चार महिने (मार्च / एप्रिलपर्यंत) पळखाट्या शेतात विनाकारण उभ्या ठेऊन शेतीचा कस, पाणी वाया घालवितात, हे चुकीचे असून न परवडणाने आहे. तरी वेचणी पूर्ण झाल्यावर डिसेंबरमध्ये थंडीतच पाळखाट्या उपटून, शेताची नांगरट करून दुबार पिकासाठी अथवा पुढील खरीप हंगामासाठी जमीन तयार करून ठेवावी.

उत्पादन : बागायती कापसाचे एकरी १२ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते.

व्यवस्थित काळजी आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वेळेवर, योग्य वापर केल्यास बागायती कापसाचे एकरी २२ क्विंटलपर्यंत उत्पादन घेत येते.

प्रक्रिया उद्योग : कापसाच्या संपूर्ण वेचण्या झाल्यानंतर ज्या पळखाट्या तयार जमिनीत उभ्या असतात. त्यांचा उपयोग बरेचशे शेतकरी जळण म्हणून करतात. त्याऐवजी अशा काड्या, कागद, ब्लॅक बोर्ड ( प्लायवूडकरीता) तयार करण्यासाठी केल्यास निश्चितच प्रचंड फायदा होऊ शकतो. मात्र यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे “कुटीरोद्योगामध्ये या काड्याचा उपयोग संत्री – मोसंबीसारख्या फळांसाठी करंड्या, टोपल्या तयार करण्यासाठीदेखील केला जातो. तसेच कापसाच्या नफ्टीचा ( कापूस वेचल्यानंतर) उपयोग एअर कुलर्समध्ये करतात.”

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादीं ची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

 

https://whatsapp.heeraagro.com

 

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.
Tags: Modern cultivation of horticultural cottonबागायती कापसाची आधुनिक लागवड
Team Krushi Samrat

Team Krushi Samrat

Related Posts

खाऱ्या पाण्यावर घेणार वेली टोमॅटोचे उत्पादन
बातम्या

खाऱ्या पाण्यावर घेणार वेली टोमॅटोचे उत्पादन

July 2, 2019
अर्थव्यवस्थेसमोरचा यक्ष प्रश्‍न
यशोगाथा

अर्थव्यवस्थेसमोरचा यक्ष प्रश्‍न

December 18, 2018
हरभरा लागवड तंत्रज्ञान
यशोगाथा

हरभरा लागवड तंत्रज्ञान

December 8, 2018

ताज्या बातम्या

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

by Team Krushi Samrat
October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

by Team Krushi Samrat
October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

by Team Krushi Samrat
October 16, 2020
परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास
शेती

परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास

by Team Krushi Samrat
October 16, 2020
खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव
शेती

खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव

by Team Krushi Samrat
October 15, 2020
कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक
शेती

कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक

by Team Krushi Samrat
October 15, 2020
२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित
शासकीय योजना

२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित

by Team Krushi Samrat
October 10, 2020
अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान
शेती

अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान

by Team Krushi Samrat
October 10, 2020
करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न
शेती

करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न

by Team Krushi Samrat
October 10, 2020
Prev Next

About us

Krushi Samrat

कृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अवजारे
  • आयुर्वेदिक नुस्खे
  • कायदा
  • कृषीसम्राट सल्ला
  • तंत्रज्ञान
  • प्रेरणा
  • प्रेरणादायक गोष्टी
  • बातम्या
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासकीय योजना
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • हवामान
  • हिन्दी

Recent News

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In