रेनगन सिंचन-पिकांना पाणी देण्यासाठी आधुनिक व फायदेशिर पद्धत

0

पारंपरिक सिंचन पद्धतीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करतानाच पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत सिंचनाच्या आधुनिक पद्धतींचा वापर शेतीमध्ये वाढणे आवश्‍यक आहे. ऊस, कापूस यासारखी सर्व नगदी पिके, केळी, द्राक्षे, डाळिंब यासारखी सर्व फळपिके, सर्व कडधान्य, तृणधान्य, गळीतधान्य पिके तसेच हळद, भाजीपाला रेनगन सिस्टिमचा उपयोग करून याच्या अर्धगोलाकार आकारामुळे जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाचा उपयोग करून घेता येतो. हिरा अॅग्रो इंडस्ट्रीजच्या रेनगनचे सुध्दा असेच वैशिष्ट्ये आहे.

रेनगन सिंचन पद्धती :

रेनगन सिंचन संच नेहमीच्या तुषार सिंचन संचापेक्षा मोठा असून, एकाच वेळेस जास्त क्षेत्र भिजविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तसेच पिंकाच्या पानावरिल धुळ साफ करण्यासाठी होतो.
या संचामध्ये उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या मॉडेलच्या साह्याने एक स्प्रिंकलर साधारणपणे 160 ते 170 फूट इतक्‍या व्यासावर 211 लिटर प्रति मिनिट या प्रवाहाने एका जागेवरून पाणी फवारू शकतो.

वैशिष्ट्ये :

हा संच 2.5 ते 4 कि. ग्रॅम या दाबावर कार्यरत होतो. हा दाब निर्माण करण्यासाठी 3 ते 5 (HP) अश्‍वशक्तीचा पंप वापरावा लागतो.

नोझलमधून पडणाऱ्या पाण्याचा वेग नियंत्रित करून सर्व ठिकाणी समप्रमाणात पाणी देता येते. तसेच पृष्ठभागावरून पाणी वाहण्याचा प्रकार थांबविता येतो.

पूर्ण वर्तुळाकार किंवा विविध अंशांत फिरणारी तुषार तोटी वापरून वेगवेगळ्या मॉडेलच्या साह्याने परिस्थितीनुसार पाणी देता येते.

संच वजनाने हलका असल्याने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेऊन सिंचन करता येते.

पी.व्ही.सी. अथवा लोखंडी पाइपला रेनगन सहजपणे जोडता येते.

तुषार सिंचन संच देखभालीच्या दृष्टिकोनातून अतिशय सुलभ आहे.

 

https://www.heeraagro.com/product/heera-raingun-penguin/

 

रेनगन सिंचन पद्धतीचे फायदे :                          

लहान तुषार सिंचन संचापेक्षा सिंचनासाठी लागणारे मनुष्यबळ व कालावधी यामध्ये बचत होते.

एक किंवा दोन रेनगनमध्ये संपूर्ण शेत भिजविता येते.

पाण्याचा प्रवाह नियंत्रित करून पिकाच्या गरजेइतकेच पाणी देता येते. त्यामुळे पाण्याचा होणारा अनावश्‍यक अपव्यय टाळता येतो.

जमिनीच्या पाणी शोषण क्षमतेनुसारच पाणी दिल्यास थोड्याशा उंच-सखल जमिनीतही पाणी देता येते.

रानबांधणीचा खर्च वाचतो.

तुषार सिंचनाखाली शेतातील पाचटाचे कंपोस्ट खत लवकर तयार होण्यास मदत होते.

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.