पुणे :मे महिन्याच्या सुरवातीलाच उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने अनेक ठिकाणी पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे. तसेच उर्वरित राज्यातही तापमानाची चाळीशीकडे वाटचाल सुरू आहे. राज्यात उष्ण व अंशत: ढगाळ हवामानाचा अंदाज असून, विदर्भात उष्ण लाटेचा इशारा आहे. तर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
‘फणी’ चक्रीवादळ निवळून जाताच, राज्याच्या तापमानात वाढ होऊ लागली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमान अद्यापही सरासरीपेक्षा कमी आहे. मात्र राज्याच्या तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. सकाळपर्यंतच्या २४ तासांत ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे ४३ अंशांच्या पुढे गेले आहे. कोकणात, तर गुरुवारपासून (ता. ९) मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.