मिनी स्प्रिंकलर

1

शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देणारे, नगदी व नफ्याचे, सुख समृद्धीचे पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. मागच्या दोन वर्षामध्ये कांदा पिकाने शेतकऱ्याला भरपूर अडचणीत आणले आहे. पण एकंदरीत बाजाराची परिस्थिती बघता कांदा शेतकऱ्याला परत वैभव प्राप्त करून देईल, हे नक्कीच.

बहुतेक शेतकरी कांद्यासाठी पारंपारिक पद्धतीने किंवा ठिबक तंत्रज्ञानाने पाणी देतात. पण पारंपारिक पद्धतीने पाणी देत असतना पाण्याचा जास्त वापर व पर्यायाने विजेच्या खर्चात, तणाच्या प्रादुर्भावात, मजुरीच्या खर्चात वाढ होते. तसेच ह्या पारंपारिक पद्धतीमध्ये कांदा अनियमित आकाराचा पोसला गेल्यामुळे उत्पादनाचा दर्जा घसरतो. परिणामतः चांगला बाजारभाव भेटत नाही व शेतकऱ्याचे अर्थशास्त्र चुकते. तसेच ठिबक सिंचन पद्धतीमध्ये दोन सऱ्यामधींल अंतर कमी असल्यामुळे खर्चात दुपटीने वाढ होते. म्हणूनच ह्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी हिरा अग्रो इंडस्ट्रीजने नवीन तंत्रशुद्ध “मिनी स्प्रिंकलर पद्धत” कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे.

 

 • हिरा मिनी स्प्रिंकलरची वैशिष्टये:
  १. अत्यल्प खर्चात कायम स्वरुपाची सिंचन व्यवस्था.
  २. वजनास हलका असल्यामुळे हाताळण्यास सोपा.
  ३. उत्पादनात ४० ते ५० टक्के भरघोस वाढ.
  ४. पाण्याची ६५% बचत.
  ५. उपलब्ध विजेच्या काळात इतर सिंचनापेक्षा जास्तीचे क्षेत्र भिजवण्याची
  क्षमता.
  ६. रात्रीला सिंचन सुकर होते.
  ७. मर्यादित क्षेत्र भिजत असल्याने तण कमी उगवते. जमीन भुसभुशीत
  राहत असल्याने तणांची निंदणी सोपी होते.
  ८. हिरा मिनी स्प्रिंकलरद्वारा जमिनित लागवडीसाठी आवश्यक वाफसा
  टिकल्याने मुळांना पाण्याचा ताण पडत नाही. यामुळे जमिनीची भूजैव
  संरचनेत सुधारणा होऊन उत्पादनात भरघोस वाढ तर होतेच; परंतु
  कांदा काढणीला १०-१५ दिवस आधी येतो. रोप उत्तमप्रकारे रुजते व
  त्याची नांगी पडत नाही.
  ९. हिवाळ्यात पडणारे आम्लाधर्मी दव/धुके स्प्रिंकलरद्वारा धुतले जाते.
  परीणामी त्यामुळे उद्भवणारे रोग होत नाहीत.
  १०. हिरा मिनी स्प्रिंकलरद्वारा केलेल्या सिंचनामुळे मुकाजोड, डेंगळा व
  लहान कांदा यांचे प्रमाण अत्यल्प राहते.
  ११. २.५ ते ४ फूट ऊंची असणाऱ्या भुईमुग, अद्रक, लसूण, बटाटा, गहू,
  हरभरा, मुळा, कोबी, गाजर अथवा घासगवत इ. साठी हिरा मिनी
  स्प्रिंकलर एक आदर्श सिंचन प्रणाली आहे.
  १२. लाल, पांढरा, पिवळा सर्व प्रकारच्या कांद्यासाठीच्या सिंचनासाठी हिरा
  मिनी स्प्रिंकलर उत्तम आहे.

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

1 Comment
 1. […] मिनी स्प्रिंकलर […]

Leave A Reply

Your email address will not be published.