खनिजे ही जनावरांसाठी फार महत्वाची असतात पण ही जनावरांच्या शरीरात तयार होत नसल्यामुळे खनिजे जनावरांना मिश्रणाद्वारेच पुरविणे गरजेचे असते. खनिज मिश्रणाच्या अभावाचा परिणाम दुग्धोत्पादन आणि प्रजोत्पादनावर दिसून येतो. तसेच जनावरांमध्ये आढळणाऱ्या विविध प्रकारच्या आजाराला खनिज मिश्रणाचा अभाव कारणीभूत ठरतो.
खनिजाचे कार्य
1) कॅल्शियम
हाडाच्या वाढीसाठी तसेच दुध उत्पादनवाढीसाठी आहारात कॅल्शियम असणे अत्यंत आवश्यक आहे.
२) पोटॅशियम
दुधाळ जनावरांनासाठी शरीरातील पाण्याच्या संतुलनासाठी तसेच स्नायूंच्या कार्यासाठी या मिश्रणाची आवश्यकता असते.
3) फॉस्फरस
जनावरांचे दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी तसेच स्नायूच्या बळकटीसाठी फॉस्फरसची आवश्यकता असते. हाडाच्या वाढीसाठीदेखील याचा वापर होतो.
४) सोडियम
दुग्धोत्पादनासाठी जे स्नायू मदत करतात, त्यांच्या कार्यासाठी, मज्जातंतुच्या कार्यासाठी या मिश्रणाची आवश्यकता असते.
५) मॅग्नीज
माजाचा कालावधी जास्त राहावा, गर्भाच्या चांगल्या वाढीसाठी आणि दुध उत्पादनवाढीसाठी या मिश्रणाची आवश्यकता असते.
६) कॉपर
दुधाळ जनावरांच्या पोटाचे विकार सुरळीत होण्यासाठी तसेच रक्तातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीमध्येदेखील या खनिजाचा वापर होतो.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!