• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 3, 2021
  • Login
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result
Home शेतीपुरक उद्योग

शेवगा लागवडीची पद्धत

Team Krushi Samrat by Team Krushi Samrat
November 14, 2018
in शेतीपुरक उद्योग
2
शेवगा लागवडीची पद्धत
Share on FacebookShare on WhatsApp

शेवगा लागवडीसाठी प्रथम मशागत करणे जरुरीचे आहे. शेवग्याची मुळे जमिनीत खोल जात असल्यामुळे खोल नांगरणी करून वरवरच्या पाळ्यांनी जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या वरवरच्या पाळीच्या अगोदर एकरी 4 ते 5 ट्रॉली चांगले कुजलेले कंपोस्ट खत / शेणखत जमिनीत चांगले मिसळावे.  पिकांच्या चांगल्या जोमदार वाढीसाठी चांगली पूर्वमशागत आवश्‍यक असते. अन्यथा पिकाच्या किंवा रोपांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.जमिनीची खोल नांगरट केल्यास जमीन उन्हाळ्यात तापून मर रोगास कारणीभूत ठरणाऱ्या व इतर हानिकारक बुरशी,  जीवाणु व कीटकांचा काही अंशी नाश होण्यास मदत होते. तसेच शेवगा  लागवडीचे तीन प्रकार पडतात.  ते पुढील प्रमाणे-

1)   छाट कलमापासून लागवड

2)   बिया पासून शेवगा लागवड

3)   तयार रोपे वापरून लागवड

 

  • शेवग्याच्या सुधारित जाती

किफायतशीर शेवगा बाग लागवड तंत्रज्ञानात इतर सर्व घटक जसे जमीन व्यवस्थापन, पीक संरक्षण, विक्री व्यवस्था या बाबी महत्त्वाच्या असून शेवग्याच्या बागेच्या अर्थशास्त्राची निगडित आहेत. त्यापेक्षा जास्त महत्त्व शेवग्याच्या चांगल्या जातींना दिले पाहिजे. भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या जातीची लागवड करण्यात येत असली. तरी महाराष्ट्रासाठी काही विशिष्ट जातीची शिफारस करण्यात आली आहे. चांगल्या जातीची निवड करून  त्याचा अभ्यास करून अशाच चांगल्या उत्तम जातीची लागवड करावयास पाहिजे.

शेवग्याच्या काही जाती कडू असतात. चुकून त्यांची लागवड केली तर शेवगा बाग तोट्यात जातो. काही जाती गोड असतात. भाजीमध्ये गोडपणा येण्यासाठी आंध्रात गुळ वापरतात. अशी भाजी आवडणाऱ्या आंध्रातील लोकांसाठी अश्या जाती चालतात. काही जणांना गोड आंबट वरण आवडते. वरणात शेवग्याच्या शेंगा वापरतात. अशा प्रकारच्या विशिष्ट चव आवडणाऱ्यांना गोड शेवगा शेवगा जात चालते. काही जातीच्या शेंगा लांब तर काहीच्या आखूड असतात व जाती परत्वे  त्यांची चवही बदलते.

  • महाराष्ट्रात :-

कोईमतुर – 1,

कोईमतूर – 2,

कोकण रुचिरा,

जाफना व पी के एम – 1,

पी के एम -2, प्रकाश – 1 या  जाती आढळतात.

 

  • शेवगा पिकाचे खत व पाणी व्यवस्थापन

शेवगा पीक कोरडवाहू असले तरी त्याला थोडेफार पाणी लागतेच शेवगा हे पीक  कशाही जमिनीत,  कुठेही आणि कसेही येते. त्याला खत पाणी नसले तरी चालते हा समज मात्र चुकीचा आहे.  शेवग्याची बाग म्हटले की ती फायदेशीर ठरली पाहिजे यासाठी इतर घटका बरोबर खते देणे आणि ती समतोल असणे अत्यंत आवश्यक आहे. लागवडीच्या सुरुवातीस एक वर्षापर्यंत पाण्याचे व्यवस्थापन नियमित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे शेवगा पिकाचे खत आणि पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे  असते.

शेवग्याची वाढ आणि उत्पादन हे केवळ जमिनीत उपलब्ध असलेल्या अंना घटकावर अवलंबून असले तरी शेवग्याची बाग कशा प्रकारच्या जमिनीप्रमाणात आणि कोणत्या वेळी दिली. यावरच शेवगा बागेचे आयुष्य अवलंबून आहे. अपुऱ्या  प्रमाणातील खतामुळे शेवग्याचे उत्पादन कमी येते. मध्यम व सकस जमिनीतील व समतोल अन्नद्रव्य दिलेल्या जमिनी शेवग्याचे पीक चांगले येते. वर खते देतांना नत्र, स्फुरद व पालाश प्रमाणात दिलीत लावलेली आहे.  आणि त्यानंतर त्या भागांना सेंद्रिय व असेंद्रिय खते किती  पाहिजे. आपल्याकडे स्फुरद व पालाश भरपूर  प्रमाणात जमिनीत असली तरी शेवगा  पिकाच्या गरजेच्या वेडी ती प्रमाणात उपलब्ध होत नाही. म्हणून खते देतेवेळी नत्र, स्फुरद व पालाश यांचे 3:1:4: हे प्रमाण राखले गेले पाहिजे.

  • खत व्यवस्थापन

जमिनीमध्ये शेवग्याच्या झाडाला प्रतिवर्षी 10 ते 15 किलो शेणखत प्रति झाड द्यावे 75 ग्रॅम नत्र (165 ग्राम युरिया) + 50 ग्राम  स्फुरद (132 सिंगल सुपर फॉस्फेट) + 75 ग्रॅम पालाश(120 ग्राम म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. खते देण्यासाठी प्रत्येक झाडाला त्याच्या विस्तारा प्रमाणे 15 ते 20 से. मी. खोलीचे गोलाकार आळे करावे व संपूर्ण शेणखत रोप  लावताना द्यावे व पुढे प्रतिवर्षी छाटणी केल्यानंतर द्यावे. तसेच सर्व खते वर्षातून 4 वेळा विभागून द्यावी. त्यामुळे सुक्ष्म अन्नद्रव्य प्रत्येक वेळेस 5 किलो सर्व खतात मिसळून द्यावे. तसेच खते देतांना गोलाकार आळे पद्धत किंवा झाडाजवळ 15 ते 20 से. मी. अंतरावर पहारीने खते दिली तर ते जास्त परिणामकारक ठरतात.

  • तण नियंत्रण

शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी तणांचा नायनाट आवश्यक आहे. तण व्यवस्थापन हे उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वाची बाब आहे. पिकांच्या सुरवातीच्या वाढीच्या अवस्थेत  तणनियंत्रण याची विशेष काळजी व तणाचा नायनाट केल्यास नुकसान कमी होऊन उत्पादन वाढ होते.

  • तणांचा बंदोबस्त

हर्डी, धानोरा, कुंदा यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी उन्हाळ्यात  जमीन खोल नांगरट करावी. नंतर ट्रॅक्टरने फनपाळी करून वर आलेल्या गाठी, हराळीच्या  काश्या वेचून जाळून टाकाव्यात. या तणांच्या नियंत्रणासाठी कितने लहान व कोवळी असताना चार ते पाच पानांच्या अवस्थेत ग्लायफोसेट तणनाशक फवारावे. तणनाशक फवारल्यानंतर पंचवीस ते तीस दिवस जमिनीत मशागत करू नये.

गाजर गवत, अनेक भाज्या पद्धतीचे गवत, शेवगा उभ्या पिकातील गवत निंदणी करून काढावे. कोळपणी किंवा कोळप्याची पास वापरून मुळासकट काढणे. कोणतेही तण बी येण्या अगोदर फुलोऱ्यात असताना फवारावे.

शेवगाचे फायदे ..

  • शेवगा (शास्त्रीय नाव: मॉरिंगा ओलेफेरा) भारतातील वनस्पती असून उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा हा वृक्ष १० मी. उंचीपर्यंत वाढतो.
  • शेवगा ही खाद्य भाजी आहे.
  • शेवग्याच्या बियांपासून तेल काढले जाते.
  • शेवगयाची पानं, फुलं, फळं, बिया साल आणि मूळ अशा सर्वच गोष्टींचा उपयोग आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी होतो.
  • शेवग्यामध्ये दुधापेक्षा चार पट अधिक कॅल्शिअम आणि दोन पट अधिक प्रथिने हे पोषकद्रव्य असतात.
  • उन्हाळ्याचे शेवटचे १५ दिवस आणि पावसाळ्याचे पहिले १५ दिवस असा १ महिन्याचा जो काळ असतो त्याला ‘ऋतुसंधीकाळ’ असे म्हणतात. हा कालावधी स्वास्थ्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो. या काळात शेवगा भाजी खाणे खूप चांगले असते.
  • कोवळ्या पानांची भाजी आतड्यांना उतेज्जना देवून पोट साफ करते. त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी फायदा होतो.
  • हाडे ठिसूळ होणे, वजन जास्त वाढणे, आळस, शारीरिक, मानसिक थकवा असणाऱ्यांनी ही भाजी मुबलक खावी.
  • सर्व प्रकारच्या नेत्र रोगांमध्ये ही भाजी खावी.
  • फुलांची भाजी संधिवात व स्नायूंचे कमजोरीचे आजार साठी उपयोगी आहे तसेच उत्तम कृमिनाशक आहे .
  • अलीकडे असे ऐकले की शेवगा खाण्याने कावीळ होते पण ही चुकीची समजूत आहे. शेवगा हा उष्ण आहे हे खरेच पण त्याचा उपयोग विशेष करून वात किंवा कफ विकारावर होतो. याच्या कोवळ्या पानांची व फुलांची आणि शेंगांची भाजी करतात. याच्या शेंगा आमटीत वापरतात.

अशा प्रकारे शेवगा लागवड केली जाते.

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

 

http://whatsapp.heeraagro.com

 

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल
Tags: Method of cultivation of shavgaशेवगा लागवडीची पद्धत
Team Krushi Samrat

Team Krushi Samrat

Related Posts

कालावधी लॉकडाऊनचा, मासळी उत्पादनाचा!
शेतीपुरक उद्योग

कालावधी लॉकडाऊनचा, मासळी उत्पादनाचा!

May 4, 2020
flower-farming
बातम्या

करोनामुळे फूलशेती अडचणीत

April 4, 2020
ठंड के मौसम में पशुपालन कैसे करें ?
शेतीपुरक उद्योग

ठंड के मौसम में पशुपालन कैसे करें ?

December 24, 2019

About us

Krushi Samrat

कृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अवजारे
  • आयुर्वेदिक नुस्खे
  • कायदा
  • कृषीसम्राट सल्ला
  • तंत्रज्ञान
  • प्रेरणा
  • प्रेरणादायक गोष्टी
  • बातम्या
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासकीय योजना
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • हवामान
  • हिन्दी

Recent News

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In