औषधी गुणांची रोपटी-त्यांची शेती

0

वाचकांना शेतीकामे, शेती व्यवसाय, फळे, फुले, भाजीपाला पिकवणे, हौसेने परसबाग फुलवणे आणि व्यावसायिकदृष्ट्या शेती करणे याबद्दल मार्गदर्शन व्हावेहा या पुस्तकाचा उद्देश आहे. जो फळा-फुलांवर, रोपट्यांवर, झाडाझुडपांवर दया, ममत्व दाखवतो त्याला निसर्गदेवतेचे आशीर्वाद मिळत असतात. प्रत्येक वृक्षाची एक देवता असते. पंचांगातसुद्धा प्रत्येक राशीचे आराध्य वृक्ष नमूद केलेले असतात. त्या त्या राशीच्या जातकांनी आपल्या आराध्य वृक्षाला शरण जाऊन आरोग्य, धैर्य मिहवावे असा उपदेश/उद्देश आहे.
शेती करून आर्थिक लाभ मिळवता येतो, तर परसबाग लावून मानसिक आनंद घेता येतो. परसबागेच्या स्वकष्टाने पिकवलेली भाजी व फळे पाहून मन हरखते.
काही रोपटी अशी असतात की, त्यापासून मसाले मिळतात तर काही औषधी रोपट्यांमुळे रोगांवर उपचार करता येतो. तुळस लावली असता शुद्ध प्राणवायू मिळतोच जंतूंचा नायनाट होत रहातो. स्वास्थ्य लाभासाठी मसाले व औषधी वनस्पती आवश्यक असतात. त्याबद्दल मार्गदर्शन पुढे दिले आहे.

 

  • तुळस
    भारतीय आध्यात्मिक संस्कृतीत तुळशीला पवित्र रोपटे मानले गेले आहे. पंढरपूरच्या यात्रेत तुळशीचे वृंदावन डोक्यावर घेऊन अनेक भगिनी शेकडो मैल चालत येतात.वारकरी गळ्यात तुळशीच्या माळा घालून पांडुरंगाला शरण जातात व सद्धर्म स्वीकारतात. व्यसन, मोह यांचा त्याग करण्याची शपथ घेतात. तुळशीचे मूळ पाने, मंजिरा, खोड कोणत्या ना कोणत्या रुपात वापरता येते. तुळशीची पूजा केली जाते. तुळशीची पाने श्रीविष्णूला वाहिली जातात. तुळस औषधी गुणांची खाण मानली जाते.
    पेरणीसाठी जमीन व काळ ः-
    तुळस कोणत्याही प्रकारच्या जमिनीत लावता येते. काही जण रोपटी लावतात तर काहीजण तुळशीचे बी पेरतात. कोणत्याही हंगामात तुळस लावता येते.तुळशीच्या लहान रोपट्यांना कडक उन्हाळा त्रासदायक होतो व तुळस कोमेजते. तुळस उन्हात न ठवेता सावलीत ठेवावी.
    बी पेरणी करून तुळस उगवायची/ वाढवायची असेल तर, माती खणून ढेकळे फोडावीत. मातीत शेणखत मिसळावे व पाणी टाकावे. पाणी, खत, माती एकजीव झाल्यानंतर त्या खड्ड्यात तुळशीचे बी पेरावे. बी फार खोलवर पेरू नये. गरजेप्रमाणे वेळोवेळी जलसिंचन करावे. जमीन कोरडी पडू देऊ नये.
    दुर्लक्ष केल्यास रोपट्यांमध्ये अनावश्यक गवत वाढते व त्याचा तुळशी रोपट्याच्या वाढीवर परिणाम होतो. भांगलण करून गवत केरकचरा साफ करावा. वाफे व कुंड्या साफ ठेवाव्यात. परसबागेत वा शेतात तुळस लावून भोवतीचे वातावरण आरोग्यपूर्ण ठेवता येते. तसेच रोगावर उपचार करण्यासाठी तुळस हाताशी राहील.

 

  • हळद
    हळद जमिनीत वाढणारी म्हणजे भूअंतर्गत गाठ आहे. हळद आयुर्वेदात औषधी समजली जाते. तिचे अनेक उपयोग आहेत. स्वयंपाकात ती मसाला म्हणून उपयुक्‍त आहे. घरगुती उपचारात ती कफनाशक आहे. छाती कफाने भरल्यास कोमट दुधात हळद पावडर टाकून पितात.सूज आल्यास सारवणाची माती व हळदीचा लेप लावतात. हळद सौंदर्य प्रसाधन आहे. हळद सौभाग्याचे लेणे मानली जाते. लग्‍नात हळद लावली जाते.
    हळद वाळवल्यानंतर ती फोडून-दळून तिची पावडर बनवली जाते. हळद पावडर टत्तकून अन्नपदार्थ रुचकर बनवले जातात. आमटी, वरण, भत्तजी, मटण, मासे शिजवताना हळद लागते. हळदीचा सुवास, रंग हवाहवासा वाटतो. हळदीशिवाय आरोग्य, सौंदर्य व स्वयंपाक यांचा आपण विचारच करू शकत नाही.

 

  • शेत जमीन
    हळद कोणत्याही प्रकारच्या मातीत पिकवली जाते. परंतु रेताड, दमट मातीत हळद चांगली येते. पठारी प्रदेश व डोंगराळ प्रदेशात कमी जास्त प्रमाणात हळद पिकवली जाते. काही लोक जेवणात कांदा वा लसूण खाण्याचे टाळतात. पण हळद टाळूशकत नाहीत. हळदीशिवाय चव वा लज्जत नाही. अन्नपदार्थाला रंगत नाही.

 

  • पेरणीचा काळ
    हळदीचीपेरणी उन्हाळ्यात करतात. पावसाळ्यापूर्वी पेरणी उरकावी लागते. पावसाळ्यात हळदीला अंकुर येऊ लागतात. पाऊस किंवा पाणी जास्त झाल्यास हळद जमिनीतच कुजते. त्याकरिता पाण्याचा निचरा होईल अशी जमीन वा व्यवस्था करावी लागते.
    अ) बिहार, आसामचा दक्षिण भाग, पश्‍चिम भारत, मध्य भारत, बंगालयेथे मे महिन्याचा मध्य ते जुलै अखेर हळदीची पेरणी करतात.
    ब) दक्षिण भारतात जुलै-ऑगस्ट हे दोन महिने पेरणीस चांगले.
    क ) डोंगराळ प्रदेशात वसंत ऋतूच्या अखेर 20फेब्रुवारी ते 20 एप्रिलपर्यंत हळदीची पेरणी करतात.

 

  • हळद पेणी कशी ?
    जमीन टणक झाली असल्यास खोदून नांगरट करावी. ढेकळे फोडून माती बारीक करावी. त्यात खत टाकून माती व खत एकत्रित करावे. जमीन समतल सपाट करून घ्यावी. नंतर हळदीची बीवा गाठ एकमेकांपासून 20 ते 25 सें.मी. दूर पेरावी. खूप खोलवर पेरणी करू नये कारण अंकुर फुटून ते जमिनीवर येण्यास अडचण होईल वा वेळ लागेल. पेरणीच्या वेळी जमीन ओलसर भुसभुशीत असावी. त्यासाठी जलसिंचन करावे. पाणी साचून राहता कामा नये आणि जमीनही कोरडी पडता काम नये. गरजेप्रमाणे जलसिंचन करावे.

 

  • भांगलण
    जोपर्यंत जमिनीवर अंकुर दिसत नाही तोपर्यंत मातीला धक्‍का लावू नये. रोपटी चांगली वाढल्यानंतर भांगलण करून अनावश्यक गवत, केर कचरा, व पालापाचोळा काढून टाकावा. वेळोवेही भांगलण होणे अवश्यक असते.
    थोडक्यात महत्त्वाचे
    अ) पाणी वाहून जाईल व पाण्याबरोबर माती जाईल असे होता कामा नयेत.
    ब) हळदीचे पीक तयार होण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागतो.
    क) हळदीच्या गाठी काढताना त्या तुटता-फुटता कामा नये.

 

  • हळदीचे बी/गाठी
    हळदीच्या गाठी/बी जेवढे सशक्‍त व निरोगी, तेवढे पीक चांगले येते. पेरणीसाठी हळदीच्या चांगल्या गाठी निवडून ठेवाव्यात. त्यासाठी एक खड्डा तयार करावा. त्यात बियाण्यासाठी निवडलेल्या गाठी ठेवाव्यात. त्या झाकू नयेत. थोडे ऊन व मोकळी हवा त्यांना मिळू द्यावी आणि नंतर त्या पेरणीसाठी वापराव्यात.
    महाराष्ट्रातील सांगली-मिरज भागात हळदीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

 

  • ओवा
    ओवा मसाल्यातील एक घटक आहे. आजीबाईच्या बटव्यातील वैद्यराज आहे. प्रत्येक कुटुंबातील फडताळात ओवा बरणीत, डब्यात ठेवलेला असतो. याशिवाय स्वयंपाक पूर्ण होत नाही, अन्नपचन होत नाही. पोटात तक्रारीवर ओवा चघळून खाल्ला जातो. बाळाचे पोट दुखू लागल्यास बाळाची आई ओवा चावून त्याची फुंकर बाळाच्या पोटावर मारते. भजी व भाजी रूचकर होण्यासाठी ओवा लागतोच.

 

  • माती कशी असावी?
    ओवा शेतातील कशाही प्रकारच्या मातीत पेरता येतो. परंतु माती रेताड असेल तर ओव्याचे पीक चांगले येते. पठार व डोंगरी प्रदेशातही ओवा पिकवला जातो.
    पेरणीचा काळ ः-
    अ) हिवाळ्याच्या प्रारंभी ओवा पेरावा, म्हणजे पीक लवकर येते.
    ब) दक्षिण भारताचे हवामान उत्तर भारतापेक्षा वेगळे असते. दक्षिणेत डिसेंबरच्या मध्यवधीत पेरणी शक्य असते.
    ओव्याची पेरणी ः-
    1) ओव्यासाठी शेत फार खोलवर नांगरत नाहीत.
    2) नांगरटीनंतर शेणखत मिसळून वाफे तयार करावेत.
    3) ओव्याचे बी शेतात शिंपडावे. माती खालीवर करावी. मातीने ओव्याचे बी झाकले जावे. वरुन जलसिंचन करावे.
    4) बी अंकुरल्यानंतर रोपटी 6 सें.मी. इतकी वाढू द्यावीत. या दरम्यान जमीन कोरडी पडता कामा नये. ही रेापटी उपटून ती इतरत्र प्रतिरोपित करता येतात. एकाच जागी रोपटी वाढवल्यास पीक चांगले येते.
    थोडक्यात महत्त्वाचे ः-
    1) पिकातील गवत, केरकचरा, पालापाचोळा भांगलण करून काढावा.
    2) शेत कोरडे राहू देऊ नये तसेच पाणी साचू देऊ नये.
    3) रोपटी 12 ते 14 सें.मी. उंचीची झाल्यावर कम्पोस्ट खत द्यावे.
    4) माती पाण्याबरोबर वाहून जाता कामा नये.

 

  • उत्पन्न
    अ) साधारणपणे 4-5 महिन्यांत ओव्याचे दाणे (बी) मिळतात.
    ब) पेरणीसाठी हलके, पोकळ बी वापरू नये.
    क) सशक्त रोपट्यांचेच बी पेरणीस उपयुक्त असते.

 

  • लवंग
    गरम मसाल्यात लवंग असते. भाजी व पक्वान्न करताना लवंग वापरली जाते. दाढदुखीवर लवंगेचे तेल कापसाच्या बोळ्यावर घेऊन दाढेखाली धरतात. टूथपेस्टमध्ये व दंतमंजनात लवंग तेल वापरतात. लवंग औषधीची गुणधर्माची आहे.
    लवंग अनेक नावांची ः-
    लवंगेला अनेक नावांनी ओळखले जाते. लौंग, कलिका, कर्णफूल, श्रीसंज्ञ, श्रीप्रसुनक आणि देवकुसुम इत्यादी.
    लवंग कोठे पिकते?
    लवंग सर्वत्र उगवत नाही आणि कोणाही बागायतदाराला ते शक्य नाही. कारण लवंगेला विशेष प्रकारची निगराणी लागते. लवंग मलाक्का द्वीप व झांजिबार येथे मोठ्या प्रमाणावर पिकवली जाते. इतर देशात फार थोड्या प्रमाणात लवंग पिकवली जाते.
    लवंगेच्या झाडाची माहिती ः-
    1) लवंग म्हणजे लवंगेच्या झाडाला येणार्या कळ्या आहेत.
    2) लवंगेचे झाड हिरवेगार असते. पानगळ झाली तरी ते हिरवे राहते.
    3) लवंगेच्या डोक्यावर गोलाई असते. वास्तविवक या चार पाकळ्या असतात. पण त्या संकुचित होऊन गोलाकार घेतात.
    4) लवंगेत कित्येक पुंकेसर असतात. फक्त एकाच गर्भतंतू असतो.
    5) लवंगेच्या फूल वा कळीत नर-मादी असा भेद असतो. त्यातून लवंगेचे उत्पादन होते.
    6) सदाबहार हिरव्यागार लवंगेच्या झाडाला लाल रंगाच्या कळ्या येतात तेव्हा त्या तोडतात व मोठ्या चटईवर पसरुन त्या उन्हात वाळवल्या जातात.
    उपयुक्तता ः-
    लवंग औषधी गुणांचा खजिना आहे. लवंगेची उपयुक्तता खालीलप्रमाणे
    1) खोकला, दमा, श्वासातील दुर्गंधी यासाठी लवंगेचे चूर्ण घ्यावे.
    2) डोकेदुखीवर लवंगेचा लेप कपाळावर लावला जातो किंवा लवंगेचे तेल कपाळावर चोळतात.
    3) घशाला कोरड पडणे, अन्नपचनाची तक्रार, पोटदुखी उलटी यावर लवंग व वेलदोड चावून खातात.
    4) पोटातील गॅस, अपचन यावर लवंग गुणकारी आहे.
    5) लवंग त्वचारोगावरही उपयुक्त असून सौंदर्य प्रसाधनातही वापरली जाते.
    6) लवंग वात-पित्त-कफ या त्रिदोषांवर गुणकारी असून जुलाब काही प्रमाणाउत कमी करते. पोटातील वायू सरकतो.

 

  • पुदिना
    पुदिन मूळचा आखाती देशातील असून तो पुढे चीनमध्ये गेला आणि तेथून भारतात आला. आता तो भारतीय अन्नपदार्थांची चव वाढवतो आहे. पुदिन्याची चटणी, डोसा, उत्तप्पा, वडा, भजी यांबरोबर आवडीने खातात. पुदिना आता सर्वच घरात कोथिंबीर-कढीपत्यासह विराजमान झालेला दिसतो.
    पूर्वी फक्त ताजा पुदिनाच वापरत होते; परंतु आता पुदिना वाळवून तो साठवला जातो व अन्नपदार्थात वापरला जातो. याचे सत्त्वही बाटलीबंद किवत मिळते. गेल्या 35 ते 40 वर्षापासून पुदिन्याची शेती केली जात आहे. कारण पुदिना औषघी आहे. सर्दी-खोकला, घशाची खवखव यावर पुदिना गुणकारी आहे. पुदिना म्हणजे पेपरमिंट अशी सर्वसाधारण ओळख आहे.
    पुदिन्याच्या जाती ः-
    जगभरात पुदिन्याच्या चार जाती आढळतात. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे
    1) पेरमिंट – पुदिन्याच्या या रोपट्याला अपनेक फांद्या फुटतात. रोपटे 50 ते 90 सें.मी. उंचीपर्यंत वाढते. त्याला भरपूर पालवी असते. पाने लांबट व चमकदार, किंचित खरबरीत असतात. याच्या पानात 12 ते 15 टक्के मिथाइल व 45 ते 55 टक्के मेंथॉल असते.
    2) स्पीयर मिंट – स्पीयर मिंट रोपट्याचे खोड अतिशय नाजूक असते. हा रोपटी 35 ते 65 सें.मी. पर्यंत पसरतात. यात कारबोन द्रव 60 ते 65 टक्के असतो. याला पाने कमी लांबीची व पानांच्या कडा कातरल्यासारख्या असतात.
    3) जपानी पुदिना – मेंथॉल मिळवण्यासाठी जपानी पुदिना मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. हा पुदिना जमिनीबरोबर पसरतो. याची पाने मोठी व अंडाकार असतात. आधार दिल्यास जपानी पुदिन्याचे रोपटे सरळ उभे वाढू शकते.
    4) बरगामोट मिंट – या रोेपट्याची पाने अंडकार असतात. रोपटे 35 ते 65 सें.मी. पर्यंत वाढते. याला खोड व फांद्या भरपूर फुटतात; पण पाने गुळगुळीत असतात. केसाळ खरखरीत नसतात. बरगामोट मिंट या पुदिन्याची व्यावसायिकरित्या लागवड करणारे म्हणतात की यात 20 टक्के लिनालील अ‍ॅसिटेट असते.
    लागवड कधी? पुदिन्याच्या मुळ्या, खोड लावून याचे पीक जोपासले व पिकवले जाते.

 

  • शेतजमीन
    पुदिना कोणत्याही प्रकारच्या जमिनीत उगवता/ लावता येतो, तसेच परसबागेतील कुंड्या व डब्यातही पुदिना रोपता व वाढवता येतो. याला रेताड वा चिकणमातीही चांगली असते.
    जल/वायः-
    पुदिनाल्याला थंड हवामान मानवते. जमीन ओली असावी, परंतु पाणी साचून राहता कामा नये.

 

  • बाजारात मिळणारा पुदिना ः-
    मंडईत मिळणारा पुदिना खालील चार प्रकारचा असतो.
    अ) कोसी- यामध्ये मेंथॉलचे प्रमाण जास्त असते.
    ब) कुकरेल- पेपरमिंट असणारी ही जात विशेष लोकप्रिय आहे.
    क) हिमालय- मेंथॉल-मिंट असणारी एक चांगली जात.
    ड) आर.आर. एल. 11813- या जातीत 80 टक्के मेंथॉन असते. एवढ्या प्रमाणावर मेंथॉन इतर जातीत आढळत नाही. त्यामुळे पुदिन्याच्या या जातीला जास्त मागणी असते.
    खते व रासायनिक खते ः-
    जर माती कसदार असेल तर पुदिन्याचे पीक चांगले येते. मातीत कस नसेल तर खत टाकून उगवणशक्‍ती वाढवता येते. प्रति हेक्टर 225 किलोग्रॅम कम्पोस्ट खत शेतात टत्तकावे किंवा साधारण प्रतीच्या मातीत 130 किलोग्रॅम नायट्रोजन, 55 किलोग्रॅम फॉस्फरस व पोटॅश शेताच्या मातीत एकत्र करून टाकावे. घराभोवतीच्या परसबागेत नर्सरीतून कम्पोस्ट खत विकत आणून गरजेप्रमाणे पुदिन्याच्या रोपांना टाकावे.

 

  • जलसिंचन
    पुदिना रोवल्यावर त्वरित जलसिंचन करावे. जमीन कोरी पडू देऊ नये. पाणी आठवड्यातून एकदा द्या, पण पाणी रोपांच्या मुळांशी साचून राहता कामा नये. गरजेनुसार जेव्हा जेव्हा शेतातील/ परसबागेतील पुदिना काढाल, तेव्हा जलसिंचन करा.

 

  • भांगलण
    पुदिन्याची व्यावसायिकदृष्ट्या शेती केली असेल तर दर 20-25 दिवसांनी भांगलण करावी. अनावश्यक गवत, पाने, केरकचरा काढून टाकावा.किमान महिन्यातून एकदा भांगलण करावी किंवा तृणनाशक औषध फवारावे.

 

  • कीटक -किड्यांपासून बचाव
    पुदिन्याच्या पिकाला कीटकांचा उपद्रव होतो. त्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करावी.
    1) वाळवीपासून बचाव करण्यासाठी बी.एस.सी.ची 10 टक्के धुरळणी करावी.
    2)पानातील जीवनरस शोषणार्‍याकीटकांवर मॅटोसिस्टॉक 1 टक्‍का द्रावण शिंपडावे.
    3) पुदिन्याचे खोड-फांद्या तोडणार्‍या सोंडी किड्यांवर 5 टक्के एल्ड्रिनचे द्रावण शिंपडावे.
    4) मुळे सडू लागल्यास कॅप्टानचे 9.25 टक्के द्रावण तयार करून रोपट्यांवर शिंपडावे.
    5) मावा कीड लागल्यास मॅटासिस्टॉक 1 टक्के द्रावण तयार करून ते शिंपडावे.
    पीक केव्हा काढावे ?
    पुदिना पिकाची कटाई पेरणीनंत सव्वातीन महिन्यांनी करावी. परंतु दुसर्‍या महिन्यांपूर्वी कटाई/ काढणी करू नये.

 

  • पीक आवर्तन
    पुदिना सलग न लावता तो आवर्तन पद्धतीने पिकवावा. जसे 1) धान्य-पुदिना-धान्य, 2) मका-बटाटा-पुदिना-मका, 3) तूर-पुदिना-तूर.
    वरीलप्रमाणे पीक आवर्तन घेत राहिल्यास, तसेच वेळेवर खत-पाणी देत रहिल्यास पीक चांगले येते. प्रति हेक्टर पुदिना पिकातून 100 किलोग्रॅम पुदिन्यासचे तेल मिळू शकते. याकरिता कृषितज्ज्ञांचा सल्‍लाही घ्यावा आणि आजारपेठेतील मागणीही विचारात घ्यावी.

 

  • ब्राह्मी
    ब्राह्मी ही पाणथळाजवळ उगवणारी वनस्पती आहे. नदी, तलाव, कालवा, झरा यांच्या आसपास ब्राह्मी आढळते. ब्राह्मीमुळे स्मरणशक्‍ती वाढते. ब्राह्मी थंडीच्या दिवसात विपुल उगवते आणि पावसाळ्यात आपोआप नष्ट होते. याचे रोपटे लहान असते.
    ज्यांची लघवी अडते, मूत्राघात होतो किंवा अंडकोष वाढत जातो त्यांनी ब्राह्मीचे सेवन करावे असे आयुर्वेद सांगतो. खोबरेल तेलात ब्राह्मीचा रस मिसळून तो केसांना लावल्यास डोळ्यांची जळजळ कमी होते व डोके शांत होते.

 

  • आश्‍वगंधा
    अश्‍वगंधा वनस्पती जंगलात आढळते. ही एक सामान्य वनस्पती, परंतु आता ती बहुमोल म्हणून गणली जाते. संस्कृत भाषेत हिला अश्‍वगंध, हिंदीत असगंध, गुजराती भाषेत आसोंद किंवा घोडाअसोर, फारशी भाषेत बेहपत किंवा बहरी, मराठीत सासंध, इंग्रजीत बिटरचेरी, कानडी भाषेत हिरे मड्डिनेगिडा, मल्याळी भाषेत अम्मुकिरम, तामीळमध्ये पिल्‍ली, तेलगु भाषेत अश्‍वगंडी किंवा मवा, लॅटिन भाषेत विथानिया साम्नीफेरा असे म्हणतात.
    याशिवाय गोकर्ण, अवरोहक, वराहकर्णद्व वरदावल्यसा, वाजीकरी आणि वृषा यानांनीही अश्‍वगंधा ओळखली जाते. ही वनस्पती सोलेनसी कुळातील असून याचे रोपटे 3 फूट उंचीपर्यंत वाढते. अश्‍वगंधा हिरवीगार असते. हिच्या खोडावर फांद्यांवर बारीक पांएरी लव (रोम) असते. याची पाने लांब व टोकदार असतात. अश्‍वगंधाला लहान लहान हिरवटफुले येतात. ही फुले देठाजवळ असतात. पानांवरही लव असते. हिची फळे छोटी, फुगीर असतात.
    शुद्ध पक्षातील गुरुवारी शुभमुहूर्तावर अश्‍वगंधाचे मूळ काढून ते निळ्या रंगाच्या धाग्या गळ्यात बांधले असता केतु ग्रहाची पीडा नष्ट होते असे ज्योतिषशास्त्र सांगते. रविवारी पुष्य नक्षत्र आले आहे असे पाहून अश्‍वगंधाचे मूळ काढावे. आदल्या दिवशी (शनिवारी) अश्‍वगंधाच्या रोपट्याला देवता मानून विनंती करावी व मूळ रविवारी काढावे व अंघोळीच्या पाण्यात टत्तकून स्नान करावे. ग्रहपीडा कमी होते. आपल्या घराच्या आसपास अश्‍वगंधा आपोआप उगवल्यास तो शुभशकुन मानला जातो.
    अश्‍वगंधा वर्षभर सेवन केल्यास त्या व्यक्तीचा कायाकल्प होतो. पूर्वा फाल्गुनी, पूर्वाषाढा, पूर्वा भाद्रपदा नक्षत्रावर अश्‍वगंधाचे मूळ काढून ते जवळ ठेवल्यास शत्रुपीडा कमी होते. अश्‍वगंधा आयुर्वेदातील एक प्रमुख औषध आहे.

 

  • इसबगोल
    इसबगोलच्या बिया इंद्रायणाच्या बियांबरोबर मिसळून त्या थंड पाण्याबरोबर घेतल्यास जुलाब थाबतात. इसबगोलची साल 10-15 ग्रॅम, दोनशे ग्रॅम दह्याबरोबर खाल्ल्याससुद्धा उलट्या, जुलाब थांबतात. इसबगोलच्या बियांचा काढा तयार करून प्यायल्यास कंबरदुखी थांबते. नंतर या बिया संध्याकाळी चौकात नेऊन टाकाव्यात.
    हे एक दाट झाडीसारखे रोपटे असते. ते एक मीटर उंची इतके वाढते. याची पाने व फांद्या लहान असून, त्यांना गव्हाच्या लोंबीसारखे तुरे येतात. या तुर्‍यांतच इसबगोलचे बीज असते. तुर्‍याचे आवरण काढून बीज मिळवावे लागते.
    अपचन नष्ट करणार्‍या वनस्पतीत इसबगोलचे नाव घेतले जाते. आयुर्वेदात इसबगोलचे वर्णन आढळत नाही. परंतु युनानी ग्रंथामध्ये या वनस्पतीचा उल्‍लेख आढळतो. इसबगोल मूळची इजिप्तची वनस्पती. भारतात गुजरातमधील बनासकाठा व मेहसाणा या जिल्ह्यांत हिची शेती केली जाते. रंगभेदावरून इसबगोलची गुणवत्ता ठरते.
    1) पांढरी-चांगली, 2) लाल-मध्यम, 3) काळपट-अल्पगुणी.
    युनानी ग्रंथात इसबगोलचा उल्‍लेख आढळतो की, ही वनस्पती औषधी असून पोटाच्या तक्रारीवर गुणकारी आहे. मुसलमान भारतात आले आणि त्यांच्याबरोबर इसबगोलही भारतात आला व त्याचे प्रयोग भारतावर होऊ लागले.
    इसबगोलचे बी शीतल, शांतिदायक व पोटातील ममळाला दूर करणारे आहे. पोटातील मुरडा, जुलाब यावर ते गुणकारी असून आतड्यातील व्रण भरून काढते. मूठभर इसबगोल दररोज सकाळी घेत राहिल्यास पोटत्तची तक्रार, श्‍वसनाचा विकार व दम्यावरही इलाज होतो.

 

  • असगंध
    असगंध झाडझुडूप 1 ते 5 फुट उंच असते. याचे मूळ औषधी समजले जाते. याच्या कच्च्या मुळातून घोड्यासारखा गंध (वास) येत असतो.याचे नियमित सेवन करावेत्यामुळे प्रकृती निरेागी राहते.
    भारतात अनेक दुर्लभ औषधी वनस्पती आहेत. इतक्या औषधी वनस्पती इतर कोणत्याही देशात आढळत नाहीत. संजीवनीचा उल्‍लेख तर रामायणातही आढळतो.
    असगंधचे मूळ हलकेसे स्निग्ध, तिक्‍त, कडवट व मधुर रसयुक्‍त आहे. हे उष्णवीर्य व मधुर गुणाचे समजले जाते. हे शुक्रवर्धक, बलवर्धक, कटू, उष्ण व वात-कफ् यांचे शमन करणारे आहे. दमा, क्षय व पांढरे डाग (श्‍वेत कुष्ठ) यावर असगंध बहुगुणकारी आहे. शरीर पुष्ट करून ते सुडौल बनवते.
    असगंध ही जगन्मान्य जडीबुडी आहे. यांच्या मुळाचे तुकडे काष्ठौषधीच्या दुकानात विकत मिळतात. हिला रसायन म्हटले जाते. ही भूक वाढवते. शीघ्रपतन थांबवते व बल वाढवते. असगंध मधुमेहावर गुणकारी आहे, तसेच छातीतील धडधड, स्वप्नदोष, लघवीला वारंवार होणे यावर गुणकारी आहे. असगंध-नाागौरी कुटून चूर्ण करावे व चूर्णाइतकीच साखर मिसळून ठेवावी. चूर्ण रोज 6 ग्रॅम पाण्याबरोबर हे असे नियमित 42 दिवस घ्यावे. वरील चूर्ण दह्याबरोबर घेत राहिल्यास मुतखडा पडतो. हो मुतखडा स्मशानात नेऊन पुरावा म्हणजे पुन्हा उद्भवणार नाही.

 

  • गिलोय/अमृतवेल
    गिलोय ऊर्फ अमृतवेल ही वृक्षाच्या आधाराने वाढणारी वेल आहे. कडुलिंबाच्या झाडावर वाढलेली अमृतवेल आयुर्वेदात सर्वश्रेष्ठ मानली जाते. या वेलीचे खोड औषधी असते. ही वेल अनेक रोगांवर गुणकारी असल्याने लिा अमृता असेही म्हणतात.
    गिलोय / अमृतवेल कडू, पौष्टिक, पित्तासारक, संग्राहक आणि मूत्रविकारावर गुणकारी असून त्वचा विकार, खाज, कंड यांचे शमन करते. प्रमेह, बस्तिशोथ या विकारांवर गिलोयचा रस अथवा सत्त्व उपयोगी असते.
    याचा रस घेतल्याने भूक वाढते, अन्नपचन होते, रक्‍तवाढ होते, शारीरिक बल वाढते, जीर्ण अतिसार, आव पडणे व कावीळ या रोगांवरती अमृतवेल औषधी आहे.
    भारतात सर्वत्र गिलोय / अमृतवेल आढळते. ही सतत वाढत राहते आणि ज्या वृक्षाच्या आधाराने वाढते त्याला घेरते. या वेलीचे तुकडे पेरले, की त्याला अंकुर फुटतात. वेलीचा तुकडा कापून ठेवला तरी तो बरेच दिवस ताजातवाना राहतो. या वेलीला अनेक नावांनी ओळखले जाते. अमृता, अमृतवेल, कुंडली, चक्रलक्षणी, सोमवल्‍ली इत्यादी.
    मानवी शरीर कफ- वात-पित्त या त्रिदोषांनी बनलेले आहे. यांतील एकाचा जरी प्रकोप झाला तरी, शरीराचे ताळतंत्र बिघडते आणि रोग उद्भवू लागतात. अमृतवेल या दोषांचे मुळापासून शमन करते व शरीर निरेापी बरते. या औषधी गुण इतर वनस्पतीत दुर्मीळ आहे. शरीरावर कोठेही सूज आली असता गिलोय/अमृतवेल सत्त्व व मध एकत्र घ्यावा. ज्यांना वारंवार थांबून थांबून लघवी होते व लघवीचे प्रमाण कमी आहे अशा विकारपीडितांना आराम देणारी ही अमृतवेल आहे.

 

  • निर्गुंडी
    निर्गुंडी हे एक आपसूक उगवणारे जंगली रोपटे आहे. रस्त्याच्या कडेला, जंगलात, शेताच्या बांधावर, कुंपणाशेजारी निर्गुंडी आढळते. याची पाने तुरीच्या पानासारखी असतात. फांदीच्या एका डहाळीला पाच पाने असा समूह दिसतो. तुरीची पाने हिरवी तर निर्गुंडीची पाने पांढुरकी दिसतात. निर्गुंडीच्या पानांचा स्पर्श मखमली भासतो. पावसाळ्यात निर्गुंडी बेफाम वाढते. परंतु थंडीत हिची वाढ खुंटते. वसंत ऋतूनंतर निर्गुंडीची पाने गळून पडतात.
    निर्गुंडीला प्रदेशानुसार अनेक नावे आहेत. मैड्डी, सिंधुर, सिंदुवार, भूतकेषी, अर्थसिद्धक, इंद्राणी आणि इंद्रायण या दोन वेगळ्या वनस्पती आहेत. इंद्रायणची फळे दिसायला सुंदर असली तरी अतिशय कडू असतात. आयुर्वेदात या वनस्पतीचे औषधी उपयोग वर्णिले आहेत.
    ज्या दिवशी गुरुपुष्यामृतयोग असतो, त्याच्या आल्या दिवशी निर्गुंडीच्या झाडाजवळ जाऊन हात जोडावेत व तिला आमंत्रित करावे. गुरुपुष्य योगावर निर्गुंडीचे मूह घरी आणून ते स्वच्छ धुवून पुसावे व पांढर्‍या कपड्यात बांधून ठेवावे. त्यावर लाल चंदन लावून धूप-दीप दाखवावे व गरजुनुसार पावरावे. आयुर्वेद आपल्याला वनस्पतीचा उपयोग जसे सांगते, तसेच वृक्ष-वेली यांचा सन्मानही करण्यास शिकवते. सूर्य मावळल्यानंतर झाड-फुले तोडू नयेत असे जाणकारही सांगतात.
    निर्गुंडीचा पाल ठेचून गरम करून सांध्यावर धरतात. हा सांधेदुखीवरचा इलाज आहे.जनावरांच्या उवा, पिसवा किंवा कोंबड्यांच्या होपा झाल्या असल्यास गोठ्यात, खुराड्याच्या शेजारी व अंगणात निर्गुंडीच्या पाल्याचा धूर करतात. आयुर्वेदात तर निर्गुंडी कायाकल्प करणारी व शरीराला तेज देणारी आहे असे म्हटले आहे.

 

  • अपामार्ग / आघाडा
    गणेश चतुर्थीच्या पूजेत आघशाडा वनस्पतीला व दुर्वांना मान मिळतो. प्रत्येक देवतेची स्वतःची एक आवडती वनस्पती आहे, आणि या सर्व वनस्पती औषधी आहेत. आघाड्याला मर्ककटी, मयुरक, खरमरी अशी नावे आहेत.
    आघाड्याची पाने चवळीच्या भाजीसारखी असतात. याची फळे व फुले लांबट फांदाला येतात. आघाड्याचा औषधी रस जलोदर, कोरड व त्वचाविकारावर उपयुक्‍त समजला जातो. याचे तल कानात घातल्यास बहिरेपणा कमी होतो. आघाड्याचे मूळ जवळ बाळगल्यास जन्मपत्रिकेतील रविपीडा कमी होत.े तुरटी आणि आघाड्याचे मूळ घराच्या मध्य छताला बांधर्‍या कपड्यात बांधल्यास वास्तूदोष दूर होतो असे तंत्रशास्त्र सांगते. पूर्वी दमेकरी माणसे चिलीम पेटवून त्यात आघाड्याच्या फळाची फांदी घालून ओढत, त्यामुळे दम्याचा जोर कमी होतो असे म्हणत.
    आघाडी अमेरेंथेसी कुळातील वनस्पती असून श्रावणात भरपूर उगवते. तिचे पूजन करण्याची रीत पूर्वी होती. हिंदी भाषेत आघाड्याला चिरचिटा, चिचडा, लटजीरा, ओंगा किंवा आंधीझाडा म्हणतात.पंजाबी भाषेत पुठकंडा म्हणतात. गुजरातीत अघेडी तर बंगाली भाषेत अपांग म्हणतात. तंत्रशास्त्रात म्हटले आहे की, तापआल्यास कुमारिका मुलीच्या हाताने आघाड्याचे मूळ सूतधाग्याने मनगटावर बांधून घ्यावे , ताप उतरतो. समज-गैरसमज काहीही असो, पण पूर्वकाही असेच घरगुती उपचार केले जात होते आणि माणूस निसर्गदेवतेला शरण जात होता.
    आघाडा लाल व पांढरा अशा दोन प्रकारात आढळतो. पूर्वीच्याकाळी एखादी स्त्री प्रसव वेदनेने विव्हहत असेल तर कुटुंबातील जाणकार व्यक्‍ती आघाड्याचे रोपटे उपटत असे. रोपटे उपटताना जर त्याचे मूळ तुटले तर मुलगी होणार आणि मुळासह रोपटे हातात आले तर मुलगा होणार असे भाकीत मनाशी करत असे. तसेच प्रसव वेदना होत असलेल्या स्त्रीच्या केसांना कंबरेला आघाड्याचे मूळ बांधल्यास बाळंतपण सुखरुप व लवकर होते असे पूर्वज म्हणत, आणि असे घरगुती उपाय मनोभावे करत असत.
    घराच्या आसपास जर आघाडा उगवून आला तर तो शुभसूचक समजतात. तंत्रशास्त्रात याल अपामार्ग म्हणून संबोधले जाते. याच्या फांदीने दात घासत राहिल्यास वाक्सिद्धी प्राप्त होते. याच्या बिया स्वच्छ करून याच्याच मुळीबरोबर घरात ठेवल्यास धन प्राप्ती होते, बरकत येते असा समज आहे.
    पूर्वकाळी तंत्रशास्त्र व वनस्पतीशास्त्र यांचा एकत्रित अभ्यास होत असावा. वैद्य, हकीम, तांत्रिक, मांत्रिक यांनी आपले अनुभव अभ्यास म्हणून प्रसारित केले आणि उपचारही केले. त्यांचे अनुभव काहींनी लिहून ठेवले. परंतु आता पाश्‍चिमात्य विचारांचा पगउा जनमानसावर विराजमान झाला असल्याने हेपुरातन शास्त्र व विचार आता नकोसे वाटतात. परंतु आयुर्वेद, जडीबुटी व वनस्पती आजही मानवी आरोग्यासाठी कल्याणकारी आहेत हे नाकारता येणार नाही.

 

  • आले/अदरक
    भारतातल्या घराघरात आले असते. आले स्वयंपाकासाठी जसे गरजेचे आहे तसेच मानवी आरोग्यासाठी आले म्हणजे घरातला वैद्यराज म्हणता येईल. आले वाळवून सुंठ तयार केली जाते तीसुद्धा आल्याइतकीच बहुगुणी आहे. पेाटत्तच्या सर्व विकारांवर आले व सुंठ गुणकारी असून ते उष्ण मानले जातात.
    एक किलो आले पाण्यात उकळेपयृंत ठेवावे. ते थोउे शिजू द्यावे, पाणी थंड झाल्यानंतर आल्याची सालपटे काढून टाकावीत. नंतर हे आलेवाटून त्यात हळद दोन चमचे मिसळावी. पुन्हाा वाटून घ्यावे. हे आले-हळद मिश्रण पातेल्यात घेऊन त्याला उष्णता द्यावी. त्याचवेळी एक किलो गूह फोडून ठेचून या मिश्रणात घालावा व फेटून घ्यावे. मिश्रण कोमट होताच याच्या गोटीएवढ्या आकाराच्या गोळ्या तयार करून त्या बरणीत ठेवाव्यात. सर्दी-खोक्याने त्रस्त रोग्याला दररेाज एक गोळी खाण्यास द्यावी. आले छातीतील कफ मोकळा करते. सुंठ पाण्याबरोबर सहाणेवर घासून तो अर्क वाटीत गरम करावा व सर्दी-डोकेदुखीने त्रस्त झालेल्याच्या कपाळाला बोटोने लावून विश्रांती घेण्यास सांगावे. सर्दी-डोकेदुखी कमी होते.

 

  • अमलतास (बहावा)
    घराच्या पश्‍चिम दिशेला बहावाचा वृक्ष असणे शुभ मानले जाते. कारखान्याच्या आवारात बहावा लावा असा सल्‍ला वास्तूशास्त्री देतात. बहाव्याला पिवह्या रंगाची भरपूर फुले येतात, परंतु या फुलांना सुगंध नसतो.
    बहाव्याला अमलतास, धन बेहडा असेही म्हटले जाते. याचे झाड मोठे असते. यावर लांबट काही फळे लटकत असतात. बहाव्याची पाने शिशिर ऋतूत पूर्णपणे गळतात, पण फुलांचे गुच्छ बहरलेले असतात. बहावा औषधी आहे. याची पाने बारीक वाटून गजकर्ण या त्वचा विकारावर लावावीत. कितीही जुनाट गजकर्ण असो तो बरा होऊ लागतो.
    ज्या स्त्रियांची मासिकपाळी कष्टायी व अडचणीची असते, त्यांनी बहावाची साल, केशर व खडीसाखर एकत्र करून गुलाबपाण्यात वाटावी. हे वाटण छोट्या भांड्यात घेऊन त्यावर र्‍हीं र्‍हीं हुं हुं कुरू स्वाहा हा मंत्र 11 वेळा म्हणून फुंकावे व हे अभिमंत्रित वाटण प्यावे. मासिकपाळी विना त्रासाची होऊ लागते. संस्कृत भाषेत बहाव्याला आरग्वथ, हिंदीत सियारहंडा, अरबी व फारशी भाषेत ख्यार चम्बर म्हणतात. बहावा सर्वत्र आढळतो. याच्या काळ्या लांबअ शेंगा नजरेत भरतात. या शेंगा काठीसारख्या सरह असतात. बहाव्याची पाने लांबट व गुळगुळीत असतात. पिवळ्या फुलांनी बहरलेलाबहावा फारच सुंदर दिसतो.

 

  • आम्लवेत
    आम्लवेतच्या फहाला बगलीम थंकल म्हणतात. आम्लवेत अतिशय आंबट, मलभेदक, अग्निदीपक, हृदयरोग व खोकला यावर गुणकारी आहे. तूरडाळीच्या वरणात आम्लवेत मिसळून खाल्ल्यास खोकला कमी होतो व पोटदुखीच्या तक्रारी थांबतात. याचा आंबवण म्हणून वापर करतात.आम्लवेत उत्तर भारतात आढळतो.

 

  • आवळा
    हरडा व आवळ्याचे गुणधर्म बहुधा सारखचे असतात. त्रिफळा चूर्णात हरडा-आवळा यांचा वापर केला जातो. आवळ्याचे झाड भारतात सर्वत्र आढळते. च्यवनप्राश हे सर्वमान्य चाटणसुद्धा आवळ्यापासूनच तयार होते.
    शरीर निर्बल होणे, कथवा येणे, भूक मंदावणे, बौद्धिक कामाचा कंटाळा वाटणे, मरगळ येणे, पोटात गरम वाटणे, अन्न नकोसे होणे, जिभेला चव नसणे या विकारात मोरावळा सेवन करणे लाभदायक असते.
    केस गळत असल्यास आवळ्याच्या तेलाने डोक्याला मालिश करावे. केस मजबूत व काळे होतात. केसगळती कमी होते. आवळ्याची साल चोवीस तास पाण्यात भिजत घालावी. मग ते पाणी गाळून घ्यावे व त्या पाण्याने योनी धुवावी. म्हणजे फाकलेली (पसरलेली) योनी संकुचित होते. उपयोगात आणलेली साल गुपचूप चौकात (चार रस्त्यावर ) नेऊन टाकावी.
    वाळलेल्या आवळ्याचे चूर्ण दररोज एक तोळत्त गाईच्या दुधाबरोबर घेतल्यास पुरुषाचे वीर्य शक्‍तीशाली होते. पुरुषाच्या सर्व प्रकारच्या वीर्य विकारावर आवळा-चूर्ण बहुगणी आहे. आवळा, धात्री, आमलकी यांचे कुळ एरंड आहे. हे त्रिदोषशामक आहेत. अकाली वृद्धत्व , जळजळ, डोळ्यांचे विकार, उलटी, गळवे, रक्‍तपित्त, तहान, दमा या विकारावर गुणकारी आहेत.
    आवळ्याला संस्कृत भाषेत आमलकी, तेलगूमध्ये उसरकास, अरबी भाषेत आमलज, फारशीत आमलह, तामीळ भाषेत नेल्‍ली म्हणतात. आवळा वृक्ष घराभोवती असणे शुभ मानतात. आवळत्त वृक्षाखाली भोजन करून तेथे घास ठेवाव. आवळकाठी, आवळा सुपारी आपण प्रवासात उलट्या होऊ नयेत म्हणून खात असतो.

 

  • इंद्रायण
    जंगलात आढळणारी ही एक रानवेल आहे. या वेलीची पाने वाळवून इंद्रायणी चूर्ण तयार करतात. तपकिरीसारखे नाकाने ओढून शिंका काढल्या असलता डोके हलके होते. हे प्रकृतीने शीतल, डोळ्यांसाठी गुणकारी, मधुर आणि वीर्यवर्धक आहे.

 

  • अडुळसा
    सर्दी, ताप, खोलकला, कफ यावर गुणकारी घरगुती औषध म्हणजे अडुळसा होय. संस्कृतमध्ये याला वासिक, भिषडमाता, सिंहिका असे म्हणतात. अडुळसा दोन प्रकारचा आढळतो. 1) पांढर्‍या फुलांचा, 2) पिवळ्या फुलांचा.
    अडुळशाच्या पानांचा काढा तयार करून त्या चिमूटभर मीठ घालून पोात घेेतल्यास पोटत्ततील मुरडा थांबतो. परंतु काढा करून घेतल्यानंतर त्याची पाने स्मशानाच्या वाटेवर, दारात टाकावीत असे तंत्रशास्त्र सांगते.
    अडुळशाचे मूळ काएून त्याचे चूर्ण तयार करावे व ते पाण्याबरोबर पोटात घेतल्यास मलेरिया (हिवताप) वर इलाज होतो. तापामुळे वारंवार तहान लागते. त्यावेळी अडुळशाचा काढा द्यावा म्हणजे तहान कमी होते. वापरलेली पाने चौकात नेऊन टाकावीत.

 

  • कोरफड
    कोरफड अगेवेसी कुळातील आहे. कोरफड प्रकृतीने शीतल, विरेचक, धातुबलवर्धक, गोड, कडू, मज्जासंस्थेस चालना देणारी, कामोद्दीपक, कृमिनाशक आणि विष निवारक आहे. यकृत विकार, ताप, प्लीहा वृद्धी नेत्ररोग त्वचारोग, पित्त, श्वासरोग, कुष्ठ, कावीळ आणि मूतखडा या रोगांवर कोरफड गुणकारी सिद्ध होते.
    रेतांड, मुरमाड जमिनीत, नदीकिनारी, शेताच्या बांधावर कोरफड लावली जाते किंवा उगवत्ते, हल्ली कोरफडीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जापत आहे, कारण याची गुणवत्ता आयुर्वेदाने सिद्ध केली आहे व कोरफड बहुगुणी असल्याचे सर्वांनी समजून आले आहे. कोरफडीची पाने जाड, जिभेसारखी लांब असतात. पानाच्या दोन्ही बाजूला लहान लहान काटे असतात.
    शरीराच्या कोणत्याही भागाला सूज आल्यास कोरफडीचा गर व हळदपूड यांचे मिश्रण खलून ते थोडे गरम करुन सुजलेल्या भागावर लेपन करावे. हा लेप पडू लागला की तो गोळा करुन चौकात नेऊन टाकावा.
    कोरपडीच्या रसाचा एकेक थेंब झोपण्यापूर्वी डोळ्यात टाकावा. काही दिवसातच डोळ्यांच्या तक्रारी कमी होतील. कोरफडला संस्कृत भाषेत कुमारी गृहकन्या घृतकुमारी म्हणतात. हिंदी ग्वारपाठा धीकुंवर, घीग्वर म्हणतात. गुजराती भाषेत कुेंवारपाठ, तामीळमध्ये चिरूनी, मळ्याळमध्ये कुमारी, तेलगु भाषेत पिन्नगोरिष्ट कलवंद, पंजाबही भाषेत कुवार गुदल, अरबीत सब्बारत, फारशी भाषेत दरख्ते सीव्र म्हणतात. कोरफड भारतात सर्वत्र आढळते.
    कोरफडीची पाने जाड, लांब, काटेदार व गरयुक्त असतात. आरोग्य रक्षणासाठी कोरफडीचा रस पितात. कोरफडीचा गर चेहर्याला लावतात. कोरफड मुद्दाम घराभोवती लावू नये. स्वतः उगवून आल्यास मात्र दोष नाही.

 

  • गुंज
    गुंजेचा पाला गोड असतो. गुंजेचा पाला खाल्ल्याने स्वरमाधुर्य येते. मसाले पानात गुंजेचा पाला टाकतात. याचा वेल असतो. याची पाने चिंचेच्या पानासारखीच असतात. चित्रामल व पांढर्या गुंजपाल्याचा लगदा एकत्र खलून त्वचेवर लावला असता त्चचाविकार कमी होतो. नंतर हा लेप वाहत्या पाण्यात टाकावा.
    गुंजेची ताजी पाने, खडीसाखर व कंकोळ (फळ) एकत्र चावून खाल्ल्यास स्वरंभग दूर होतो व आवाजात गोडवा येतो. गायक, भजनी बुवांना हा वरदायी आहे.
    गुलाबपाणी व गुंजेच्या पानांचा रस एकेक थेंब रोज झोपण्यापूर्वी डोळ्यात सोडल्यास नजर/दृष्टी तीक्ष्ण होते. गुंजेच्या वेलीला शेंगा येतात. त्यात गुंजेचे बी असते. सर्व बी एकसमान, एका वजनाचे असल्यामुळे पूर्वी सराफ व्यावसायिक वजन म्हणून गुंजा (रत्ती) वापरत असत. याला हिंदीत रत्ती, घुघुंची, षचिरमिटी अशी नावे आहेत.
    गुंज हे दीर्घजीवी वेल असून, भूमिअंतर्गत हिची मुळे हिरवीगार असतात. या वेलीला गुलाबी रंगाची लहान फुले येतात. याच्या शेंगा पिकून जेव्हा फुटतात, तेव्हा आलीत गुजेच्या लालचुटुक बिया नजरेस पडीतात.
    गुंज लाल व पांडरी अशा दोन प्रकारात आढळते. उत्तर भारतात विवाहाच्या वेळी वधूला ज्या बांगगड्या शुभशकुन म्हणून दिल्या जातात, त्यात गुंजेचे दाणे जडवले जातात. ’सौभाग्य अखंड लाभू दे!’ असा सुविचार, शुभकामाना त्यामगे असते.
    गुंजेच्या मुळाला हिंदी भाषेत मुलेठी म्हणतात. हे मूळ खोकला, शक्तिपात, कफविकार यावर गुणकारी आहे. युनानी औषध ’रब्बेसूस’ हे खोकल्याचे औषध गुंजवेलीच्या मुळापासून तयार करतात.

 

  • गोखरु
    गोखरु ही वनस्पती शीतल, शक्तिवर्धक व वीर्यवर्धक आहे. शरीरावर सूज आली असल्यास गोरखरुची हिरवी पाने, काकडीचे बी, काळी मिरी एकत्र कुटून खलून ते पाण्याबरोबर घ्यावे. शरीराची आग/जळजळ कमी होते. हा लेप खलून सूज आलेल्या शरीराच्या भागावर लावावा. लेप वाळल्यावर तो गोळज्ञावकरुन स्मशानाच्या वाटेवर नेऊन टाकावा.
    कुटकी
    कुटकी, हरडा व गूळ एकत्र करुन कुटून खावा. यामुळे पोटाचे विकार कमी होतात. कुटकी कडू, तीक्ष्ण व तापनाशक आहे.
    गुग्गुळ
    गुग्गुळ विस्तवावर टाकून त्याची धुरी देतात. गुग्गुळ हे कीड-जंतुनाशक आहे. याचे वृक्ष भारत, अरब देश व आफ्रिकेत आढळतात. हिवाळ्यात या वृक्षाची साल काढून त्यातून निघणारा चिकट द्रव (गोंद) गोळा करतात. याला गुग्गुळ म्हणतात. मुस्लिम धर्मीयांच्या तंत्रविद्येत याचा बहुविध उपयोग होतो. आयुर्वेदात मात्र गुग्गुळ म्हणून जे औषघ वर्णन केले आहे ते सांधेदुखीवर गुणकारी आहे. याचा लेप सांध्यावर लावतात.
    कुचरला
    कुचला हा वृक्ष मोठा असतो. याचे फळ संत्र्यासारखे असते. कुचला फळात पांढर्या रंगाचे बी असते. कुचल्याच्या मुळाची साल कुटून व लिंबू रस मिसळून त्याच्या गोळ्या तयार करुन ठेवाव्यात. या गोळ्या पटकी रोगावर बहुगुणकारी असतात.
    कुचल्याची पाने व डहाळ्या वाळवून त्याचे चूर्ण तयार करावे. हे चूर्ण सिरक्यात मिसळून गजकर्णावर लावावे. गजकर्ण नष्ट होतो. वापरलेला लेप तीन रस्त्यांवर नेऊन गुपचूप टाकावा. याची वाच्यता करु नये असे तंत्रशास्त्र सांगते. (सिरका-विनेगर)
    हातजोडी
    मराठीत हातजोडी, तर हिंदी हाताजोडी म्हणून ओळखले जाणारे हे वनस्पतीचे मूळ नेमे कशाचे असते हे नक्की सांगता येत नसले तरी ते निर्गुंडीचे असते असेही कळते. याला उत्तर भारतात दुहथिया तसेच हाथजोरिया असे म्हणतात.
    ही दुर्लभ वनस्पती काष्ठौषधी दुकानात गारुडी, तांत्रिक मांत्रिक यांच्याकडे पहावयास मिळते. एकाएकी याची किंमत खूप वाढली, कारण हातजोडी घरात दुकानात , गल्ल्यात ठेवली की धनसंपदा वाढीस लागते आणि कशाचीच कमतरता पडत नाही असा प्रचार केला गेला.
    हे एका रोपट्याचे मूळ आहे. हे भारतात व भारताबाहेरही आढळते. ही वनस्पती असल्याने त्यात औषधी गुणही आहेत. परंतु तांत्रिक-मांत्रिकांनी याला मान्यता दिल्याने अनेक (गैर) समजही प्रचलित झाले. तंत्रशास्त्रात याचे अनेक प्रयोग वर्णित केले आहेत. हातजोडीला इराणमध्ये ’चुबकउश्शान’ म्हणतात. फारशी आणि उर्दू भाषेत हिला ’बखूर-ए-मरियम’ म्हणतात.
    तांत्रिक म्हणतात. ही एक विलक्षण जडीबुटी आहे. ही कोठूनही खरेदी करा पण हिचे विधिवत पूजन शुभमुहूर्तावर करा आणि जवळ/घरात/दुकानात ठेवा. ही जडीबुटी अनेक कार्यात यश व सिद्धी देणारी आहे.
    शुक्ल पक्षातील गुरु-पुष्य योगावर प्रातःस्नान करून शुद्ध-स्वच्छ जागेवर बसा. लाल रंगाच्या कपड्यावर हातजोडी ठेवा. तिच्यावर शेंदूर, कापूर, लवंग, वेलदोडा आणि अक्षता टाका. तसेच लाल रंगाचे फूल व लाल चंदन लावा. धूप व ऊद यांचा धूर करा आणि आरती करा व याला लाल कापडात हातजोडी व वरील वस्तू घरात बांधून ठेवा . याचा प्रभत्तव दिसू लागेल. हातजोडी सोब त घेऊन जाल, तिथे तुम्हाला विरोध होणार नाही. हातजोउी हे मूळ वशीकरण, धनवृद्धी व सुमरक्षा देणारे आहे . परंतु याचा कोणी दुरुपयोग करण्याचा विचार मनात आणू नये.
    एखाद्या स्त्रीचे बाळंतपण अडले असेल तर हातजोउी पाण्याबरोबर सहाणेवर घासून तिचा लेप स्ीच्या नाभीभोवती केल्यास बाळंतपण सुलभ होते. हातजोडीमध्ये कालीमाता व दुर्गामाता वास करते असे तांत्रिक-मांत्रिक म्हणतात.

 

  • पिंपळ/ अश्‍वत्थ
    पौराणिक कथेनुसार पार्वतीने दिलेल्या शापामुळे विष्णू पिंपळ वृक्षरुपात, शंकर वटवृक्षरुपात तर ब्रह्मदेव पळस वृक्षरुपात पृथ्वीवर अवतरले होते. श्रीविष्णू ब्राह्मणांचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे पिंपळाला ब्राह्मणवृक्ष असे नाव पडले. आहे. हा वृक्ष सुख, सौभाग्य व जीवन देणारा आहे. कारण या वृक्षातून प्राणवायू अधिक प्रमाणात मिळतो. ऋषि-मुनींनीही आपल्या आश्रमाभोवती पिंपळ वृक्ष जोपासले होते. पिंपळ वृक्ष तोडणे म्हणजे ब्रह्महत्येचा पातक मानले जाई.
    हिंदू धर्मात एखाद्या मृतकाचा दाह संस्कार केल्यानंतर त्याच्यानावानेपाण्याने भरलेले मकडे पिंपळास बांधण्याची प्रथा होती. त्या मडक्यातून थेंब थेंब पाणी गळत राहते. समज असा होता की त्या मृतकाचा आत्मा ते पाणी पिऊन आपली तहान भागवतो.
    भगवान श्रीकृष्णाने भगवद‍्गीतेत म्हटले आहे की, अश्‍वत्थ सर्ववृक्षाणां म्हणजे सर्व वृक्षात मी पिंपळ आहे. म्हणूनच यात श्रीकृष्ण अर्थात श्रीकृष्णाचा वास आहे. तसेच भगवान बुद्धांना याच वृक्षाखाली दिव्यज्ञान प्राप्त झाले. ध्यानधारणा करण्यास पिंपळ वृक्षाखाली आसनस्थ व्हावे.
    पिंपळ वृक्षाच्या मुळत्तजवळ बसून मंत्रजप, स्तोत्र पठण केल्यास त्याचे फलित कैक पटीने मिळते. पिंपळ वृक्षाला नमस्कार केल्याने गंगास्नानाचे पुण्य मिळते. आयुर्वेदात पिंपळाचे पंचाग (मूळ, साल, पाने फळे, लाकूड) महत्त्वाचे मानले गेले आहे. पिंपळाचे कोवळे कोंब खाल्ल्यास शरीर शांत होते. पिंपळ सर्वाधिक प्राणवायू देतो हे वैज्ञानिकांनी मान्य केले आहे. जगात उष्णतेचे प्रमाण वाढत आहे, वायू दूषित होत आहेत. पिण्याचे पाणी भूस्तराखालून नष्ट होऊ लागले आहेत. विहिरी, नद्या, नाले आटत आहेत. पाऊसमान बदलले आहे. या सर्वांवर उपाय म्हणजे वटवृक्ष, पिंपळ, पळस यासारखी वृक्षराई जोपासली पाहिजे.
    पिंपळाला संस्कृत भाषेत अश्‍वत्थ, चलपत्र, बोद्धिद्रुम म्हणतात. हिंदी भाषेत पिप्पर, पिपल. बंगालीत आशुदगाछ, नेपाळीत पिल्‍ली, गुजराती भाषेत पिपला, मल्याळममध्ये अपाल, तामिळ भाषेत अरसु, आसामीत शज्रतुल, फारशीत दरख्ते लरजा, इंग्रजीत पिपल ट्री आणि लॅटिन भाषेत फायकस सिलिजिओसा म्हणतात.
    घराच्या पूर्व दिशेला वटवृक्ष असावा असे वास्तूशास्त्र सांगते, तर दक्षिणेला उंबराचे झाड असावे. पश्‍चिमेला पिंपळ असावा . पिंपळ सहा महिने निद्रावस्थेत असतो. उन्हाळ्यात हे वृक्ष जागे होऊ लागतात. अशी जुनी जाणती माणसं म्हणत असते.
    जन्मपत्रिकेतील शापित योग, सर्वशाप, शनि-मंगळ-राहू-केतू या ग्रहांची शांती होते. पिंपळाच्या मुळाशी जल वहून नतमस्तक व्हावे. पत्रिकेत कडक मंगळ असणार्‍या कुमारिका मुलींनी पिंपळाला प्रदक्षिणा घालून त्याला मनोभावे हात जोडावेत त्यामुळे मंगळ दोष सौम्य होतो. दूध, नैवेद्य, धूप, दीप पिंपळाला दाखवून पूजावे. पिंपळाला प्रदक्षिणा घातल्याने आयुष्य वाढते, असे ज्योतिषशास्त्र सांगते.

 

  • कडूलिंब
    कडूलिंब भत्तरत देशाला लाभलेले वरदान आहे. कडूलिंब औषधी आहे. कडूलिंबाच्या फळांपासून (निंबोणी) खत तयार केले जाते. कडूलिंबाच्या रसाचा अर्क वापरून साबण बनवतात. कडूलिंबाचे पंजांग औषधी आहे. कडूलिंबाच्या रसाने अनेक रेाग बरे होतात. त्वचाविकारावर कडूलिंबाच्या पानांचा लगदा अंबावर लावतात/चोळतात. कडूलिंबाचा वृक्ष भोवतालची हवा शुद्ध ठेवतो. जंतूंचा नाश करतो.
    कडूलिंबाला संस्कृत भाषेत सर्वतोभद्रक, निम्ब, नेतर नियमन, अरष्टि, पतिसार, रविप्रिय अशी नांवे आहेत. हिंदीत नीम, बंगाली भाषेत नीमगाछ, गुजराती भाषेत धान्याला कीड लागू नये म्हणून धान्याच्या पेवात कडूलिंबाच्या डहाळ्या ठेवतात. पर्यावरण प्रदूषण, औषधी उपयोग, घरगुती उपचार, जंतुनाशक या सर्व बाबतीत कडूलिंब आघाडीवर असतो. कडूलिंब म्हणजे पावित्र्याचे प्रतीक. देवीच्या पूजेमध्ये कडूलिंब असतो. पूर्वी देवी रोगाचा प्रकोप व्हायचा, तेव्हा रोग्याला कडूलिंबाच्या पानांच्या शय्येवर झोपवले जायचे.
    गुढीपाडव्याला नववर्षाच्या स्वागताला हिंदूधर्मीय कडूलिंबाची डहाळीगुढीला बांधतात व प्रसाद म्हणून गुळाबरोबर कडूलिंबाची पाने व फुले खातात. शरीराला खाज, उष्णता झाल्यास अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पाने टाकून स्नान करण्याची प्रथाआहे. कडूलिंब आरोग्य प्रदान करतो.
    आयुर्वेद मतानुसार कडूलिंबाचा रस तिक्‍त, विपाकात कडू, शीतवीर्य, लघु, पित्त, कफ, खाज, रक्‍तविकार आणि व्रणनाशक आहे. कडूलिंबाचे तेलही मिळते. तेही औषधी आहे. पांढरे काडे, कुष्ठरोग, त्वचाविकार यावर कडूलिंब बहुगुणी मानला जातो. घराच्या प्रांगणात वायव्य दिशेला कडूलिंबाचे रोप लावावे असे शास्त्र सांगते.

 

  • दूर्वा
    भारतात अनेक प्रकारचे गवत उगवते. ते जनावराच्या चार्‍यासाठी उपयुक्‍त असते. परंतु या चार्‍यातच दुर्वा/कुशा हा गवत प्रकारही असतो. तो धार्मिक कार्यासाठी उपयुक्‍त असतो. गणेश पूजनात दुर्वा त्रिशूळाचे प्रतीक म्हणून पूजेला असतात. दुर्वा औषधी गवत आहे. ज्या गवतात दुर्वा असतात, त्या गवतावरून दररोज सकाळ-संध्याकाळ अनवाणी चालल्यास दृष्टी सुधारते. कुशा हा हिंदी शब्द आहे. मराठीत याला कुसळ म्हणतात. गुरु-ढोरे हे खात नाहीत कारण कुसळाची पाने टोकदार व दातेरी असतात. जनावरांच्या तोंडाला यामुळे जखमा होऊ शकतात. गुरे-ढोरे यामुळे सावधपणे चरत असतात. शेतमजूरही गवत कापताना सावधगिरीने कापणी करतात. कुसळे पायाच्या तळव्यातही घुसतात. कुसळ जनावरांचे खाद्य म्हणून योग्य नसले तरी अध्यात्म व धार्मिक बाबतीत कुसळ/ दुर्वा मान्यता मिळवून आहेत.
    कुशा उर्फ कुसळ हे देवता, पितर आणि प्रेत यांच्या शांतिपूजेत वापरतात. कुसळाचे पवित्रक (अंगठी) तयार करून ते तर्पण देताना अनामिकेत घालतात असे पूजाविधी शुद्ध मानले जातात.
    गुरुपुष्य योगावर कुशमूळ आणून ते गंगाजलाने धुवावे. देवघरात थोडावेळ ठेवून नंतर ते लाल कापडात गुंडाळून तिजोरीत ठेवल्यास मनोरथ पूर्ण होतात, समृद्धी येते. या लाल कापडास रेाज धूप-अगरबत्तीचा धूर द्यावा असे तंत्रशास्त्रात म्हटले आहे.

 

  • गोरोचन
    पूजापाठ, तंत्रतंत्र यामध्ये गोरोचन/ गोपिचंद याचेवरचे स्थान आहे. तंत्रशास्त्रात याचे अनेक उपयोग सांगितले आहेत. तसेच माला मेध्या, गोपित्त, वंदनिया, शिवा, भूतनिवारणी, मंगला अशी नावे आहेत.
    यंत्र लिहिणे, मंत्रपठण, साधना करणे, षट्कर्म अशा अनेकविध धार्मिक कार्यांत तसेच औषधे तयार करण्यास गोरोचन वापरले जाते. यंत्र लिहिताना अष्टगंधाप्रमाणे गोरोचन वापरतात. अष्टगंध ही एक वस्तू नसून आठ पदार्थांचे मिश्रण आहे. हे आइ पदार्थ योग्य प्रमाणात मिसळून अष्टगंध सिद्ध केले जाते. अष्टगंधासह गोरोचन वापरल्यास यंत्र अधिक प्रभावशाली होते. त्याकरिता गोरोचन (गोपिचंद) सुद्धा शुद्ध असावे लागते.

 

  • बेलफळ
    भारतातील कोणत्याही प्रांतात बेलफळ माहीत नाही अशी व्यक्‍ती आढळणार नाही. तसेच बहुतेक प्रांतांत बेलाचा वृक्ष आढळतो. बेलाच्या पानाने शिवपूजा केली जाते. बेलाची पाने तीन संख्येत आढळतात. हे त्रिशूळाचे रुपक आहे. याला बिल्वपत्र म्हटले जाते. बेलाला हिरवे फळ येते. ते टणक असते. शंकराला बेलफळ वाहण्याची प्रथा आहे. लॅटिन भाषेत बेलवृक्षाला ईगल मर्मिलस म्हणतात.
    इतर फळे पिकल्यानंतर गुणकारी होतात, परंतु बेलफळ मात्र कच्चे असतानाच उपयुक्‍त मानले जाते. बेलफळातील गराला बेलगिरी म्हणतात.
    बेलफळ मधुर, कषाय, गुरु, रूचिकर, दीपन, शोथ, पित्त, कफ, ज्वर तसेच अतिसार नष्ट करणारे आहे. बेलफळाचे मूळ लघू, वमन थांबणारे व वातविकार नष्ट करणारे आहे.
    हृदयाची धडधड, उदासीनता, निद्रानाश, उन्माद यावर बेलफळाचे मूळ उपयुक्‍त असते. कच्च्या बेलफळातील गर भाजून रोग्यास दिला असता, रक्‍तमिश्रित आव, जीर्ण अतिसार यावर उपाय होतो. विषाणूंचा प्रभाव नष्ट करण्याचे सामर्थ्य बेलफळात आहे. बेलफळाचा गर नियमित खाल्ल्यास मासिकपाळीच्या तक्रार कमी होतात.

 

  • हळद/ हरिद्रा
    हरिद्रा ला सहज बोलण्यात हळद म्हटले जाते. हळद हे एक वनस्पतीचे पिवळ्या रंगाचे मूळ आहे. ते वाळवून, कुटून मसालयचे एक घटक बनते, तर कुंकवाबरोबर सौभाग्याचे प्रतीक बनते.
    भोजन, भाजीपाला, चटणी, लोणचे यापासून ते सौंदर्य प्रसाधानापर्यंत हळदीचा वापर होतो. खरचटले, कापले तर प्रथमोपचार म्हणून हळदपूड लावली जाते. हळद कांतिवर्धक, रोगनाशक आहे. याच्या रोपट्याला सुगंध येतो. हळदीचे रोपटे दोन ते अडीच फुटांपर्यंत वाढते. हळदीचे पान तळहातावर चुरून त्याचा वास घेतल्यास छान घमघमाट येतो.
    विवाहप्रसंगी वधू-वरांना हळद लावतात. त्यामुळे त्यांचे वर्ण उजळतो. हरिद्रा गणपती साधना या पूजापाठात हळदीला विशेष महत्त्व असते. तसेच खंडोबाचा गजर करताना भंडारा म्हणून हळद उधळली जाते.
    हळद व तांदूळ एकत्र दळून ते पाण्यात कालवून त्या मिश्रणाने घराच्या प्रवेशद्वारावर ॐ अक्षर लिहिल्यास ते घर सर्व बाधा व दृष्टीपासून सुरक्षित राहील. नुसत्या हळदीने लिहिले तरी चालेल, असे तंत्रशास्त्र सांगते.
    हळदीचे मूळ (गाठ) घरात कायम ठेवावे. त्यामुळे घरात लक्ष्मी राहते. दारू हळद, काळी हळद असे 2-3 हळदीचे प्रकार असतात. काळ्या हळदीला कापरासारखा वास येतो.
    काळी हळद खाण्यायोग्य नसते, पण पूजेयोग्य असते. अनेक प्रकारचे दुष्पप्रभाव ती नष्ट करते. तंत्रशास्त्रानुसार एखादा शुभ दिवस पाहून काळी हळद घरी आणावी व शुद्ध, स्वच्छ पाण्याने धुवावी व पुसून ती वाटीत उघडी ठेवावी. त्याला ऊद वा धूप दाखवावा आणि चांगल्या कापडात बांधून ठेवावी. या काळ्या हळदीचा तुकडा फिट येणार्‍या किंवा निद्रानाश झालेल्या रोग्याच्या दंडात किंवा गळ्यात बांधल्यास रोगावर उपाय होतो.
    गुरुपुष्यामृत योगावर काळ्या हळदीवर कुंकू टाकून, त्याला धूपदीप दाखवून लाल कापडात एक-दोन नाण्यांसह बांधून ठेवल्यास धनवृद्धी होऊ लागते, असे तंत्रशास्त्र सांगतो.

 

  • अशोक
    अशोक वृक्ष बहुतेक सर्वांना माहीत आहे. हा सुंदर, गार सावली देणारा वृक्ष हेमपुष्प नवाने ओळखला जातो. याची पाने लांबट व रमुंद असतात. प्रारंभी कोवळ्या पानांचा रंग तांबूस असतो. याला फुलांचे गुच्छ (घोस) लागतात. ही फुले नारंगी असतात व नंतर लाल रंगाची होतात, म्हणून या वृक्षाला ताम्रपल्‍लव असेही नाव आहे.
    वसंत ऋतू आला की अशोकाच्या फुलांचा बहर नजरेत भरतो. नंतर अशोकाला जांभळासारखी गोल फळे येऊ लागतात. फळे पिकल्यावर लाल दिसू लागतात. फळात अशोकाचे बी असते. फळाची चव तुरट असते.
    अशोक वृक्ष औषधी आहे. स्त्रियांना होणारे आजार बरे करण्याचे सामर्थ्य अशोकात आहे. अशोकाच्या खोडाच्या सालीत टॅनिक व कॅटेचिन नावाचे रसायन असते. हे रसायन औषधी आहे. त्यामुळे अशोकाच्या सालीला फार महत्त्व आहे.
    अशोकाच्या बियांचे चूर्ण पाण्याबरोबर काही दिवस घेतल्यास मूतखड्यावर इलाज होतो. गर्भाशय कमजोर असणे, त्यामुळे गर्भपात होणे, मासिकपाळीत अधिक रक्‍तस्राव होणे या विकारात अशोकाच्या सालीचे चूर्ण गाईच्या दुधाबरोबर सेवन केल्यास लाभ मिळतो. मासिक पाळी अनियमित होणे, रक्‍तस्रा

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.