- ऊस पिकासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त क्षेत्रावर ठिंबक सिंचन पाणी व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे हि काळाची गरज आहे.
- को ८६०३२ व कोएम ०२६५ हे वाण इतर जातीपेक्षा पाण्याचा ताण सहन करतात. त्यामुळे नवीन लागवडीसाठी अशा जातीचा प्राधान्याने वापर करावा.
- ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे. अशा ठिकाणी यापुढे पाणी देताना एक आड एक सरीतून पाणी द्यावे.
- पाण्याचा ताण पडत असल्यास उभ्या ऊस पिकातील खालची पक्व झालेली तसेच वाळलेली पाने काढून आच्छादर म्हणून सरीत पसरावी. जेणेकरून पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.
- पिकास पाण्याचा ताण पडत असल्यास लागणीनंतर ६०, १२० आणि १८० दिवसांनी २ % म्युरेट ऑफ पोटॅश व २ % युरिया याचे मिश्रण करून पिकावर फवारणी करावी.
- पाण्याची कमतरता असल्यास बाष्पीभवन कमी करण्यासाठी ६ ते ८ % केवोलीन या बाष्परोधकाची फवारणी करावी.
- लागवडीच्या ऊस पिकात तसेच खोडव्याच्या पिकास हेक्टरी ५ ते ६ टन पाचटाचे आच्छादन करून प्रती टन पाचटासाठी ८ किलो युरिया, १० किलो सुपर फाँस्फेट व १ किलो पाचट कुजविणाऱ्या जीवाणूंचा वापर करावा.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
http://whatsapp.heeraagro.com/
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!