20 गुंठे जागेत टोमॅटोचे लागवड करून घेतले 6 लाखावर उत्पन्न

0

20 गुंठे जागेत टोमॅटोचे लागवड करून तब्बल 6 लाखावर उत्पन्न मनमाड जवळील निमोण येथील प्रगतशील शेतकरी गोरख सोनवणे यांनी घेतले आहे. गोरख सोनवणे यांनी त्यांच्या शेतात मका, कांदे, बाजरी, मिरची यासह अवघ्या 20 गुंठे जागेत टोमॅटोचे पीक घेतले आहे. याला त्यांना अवघा 30 ते 35 हजार खर्च आला असून यात त्यांना 900 ते 1000 कॅरेट टोमॅटो उत्पादन झाले आहे. कमीतकमी 650 ते जास्तीतजास्त 800 रुपये प्रति कॅरेट भाव असल्याने त्यांना यातून 6 लाखाच्यावर उत्पन्न मिळणार असल्याचे गोरख सोनवणे यांनी सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता आपल्याकडे असलेल्या शेत जमिनींचा योग्य उपयोग केला, तर नक्कीच त्याचा फायदा होतो. हे गोरख सोनवणे या शेतकऱ्याने दाखवून दिले.

गेल्या काही वर्षांपासून आम्ही टोमॅटोचे पीक घेत आहे. मागील तीन वर्षांपासून टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याने आम्ही टोमॅटो अक्षरशः रस्त्यावर फेकले होते. त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोकडे पाठ फिरवल्याने टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्याने चांगला भाव मिळत असल्याचेही गोरख सोनवणे यांनी सांगितल. शेतकऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या शेतजमिनीत एकच पीक न घेता अनेक पीक घेत मिश्र पद्धतीने शेती करावी. एक पिकाला भाव नसला तरी दुसऱ्या पिकात त्याची भर नक्कीच निघते त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो, असे गोरख यांचे बंधू खंडू सोनवणे सांगतात. शेतकऱ्यांनी गट पध्दतीने शेती केली. तर त्याचा फायदाच होतो, हेही त्यांनी सांगितले.

शेतीविषयक अपडेट्स व्हॅट्सऍपवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.