बियाणे साठवणुकीतील किडींचे व्यवस्थापन

0

साठवलेले धान्य व तत्सम पदार्थ यांचे कीटकांमुळे अतोनात नुकसान होते. म्हणून बियाणे उत्पादनाइतकेच ते टिकवणेदेखील महत्त्वाचे आहे. साठवणुकीत आढळून येणार्‍या विविध प्रकारच्या किडीपैकी काही महत्त्वाच्या किडींची ओळख, नुकसानीचा प्रकार, जीवनक्रम व त्यांचे व्यवस्थापन कसे करता येईल, हे माहीत असणे आवश्यक आहे.
भारतात बियाणे साठवणुकीत सर्वसाधारणपणे विविध प्रकारच्या 40 किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. त्यापैकी 12 प्रमुख व उर्वरित दुय्यम प्रकारच्या किडींचा समावेश होतो. प्राथमिक/मुख्य कीड ही पूर्ण बियाण्यास नुकसान करते व दुय्यम कीड ही प्रमुख किडीमुळे झालेल्या बियाण्याचे नुकसान करते.
* किडी साठवणुकीतील पुष्कळसे बियाणे खाण्यासाठी पोखरून त्याचे अतोनात नुकसान करतात. यामुळे एकूण बियाण्याची गुणवत्ता कमी होते. त्याचप्रमाणे असे बियाणे पेरणीस अयोग्य ठरते.
* सर्वसाधारपणे अयोग्य साठवणुकीमुळे बियाण्याचे 10 टक्केपर्यंत नुकसान होऊ शकते. यामध्ये प्रामुख्याने किडी, उंदीर, आर्द्रता आणि सुरक्षित साठवणुकीची सोय नसल्यामुळे बियाण्याची नासाडी होते.
* किडींच्या प्रादुर्भावामुळे बियाण्याची उगवण शक्ती अनेक मार्गांनी कमी होते.
* भांडारात किडींची संख्या जास्त झाली तर भांडार व त्यातील वातावरण हे तापमान, आर्द्रता व कार्बन डाय ऑक्साईड वायूचे प्रमाण वाढल्याने निरूपयोगी होते.
* बियाण्यातील अंकुर मुख्यत: अळ्या अथवा भुंगेरे खातात. किडीमुळे बियाण्यास बुरशीचासुध्दा प्रादुर्भाव होतो.
* कित्येक वेळा किडी बियाण्यात कोष अथवा जाळ्या तयार करतात व परिणामी बियाणे स्वच्छ करताना अडथळा येतो व बरेसचे बियाणे वायाही जाते.
* किडींच्या नायनाटासाठी वापरलेल्या औषधांचा उगवण शक्तीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो.
बियाण्यात कीड पसरण्याची कारणे
1) साठवणुकीसाठी जुनी कीड लागलेली पोती वापरल्यास नवीन बियाण्यास कीड लागण्याची शक्यता असते.
2) कीड लागलेल्या बियाण्याजवळ नवीन बियाण्याची साठवणूक केल्यास किडीचा प्रादुर्भाव नवीन बियाण्यास होतो.
3) बियाणे साठवणुकीच्या जागेतील, भिंतीतील छिद्रामध्ये जुनी कीड वास्तव्य करीत असते. साठवणुकीच्या ठिकाणाची साफसफाई न करता तेथे बियाणे साठविल्यास नवीन बियाण्यास कीड लागू शकते.
4) दळणवळणाच्या साधनाद्वारे किडींचा प्रसार होतो.
5) काही किडी उदाहरणार्थ : सोंडेकीड, कडधान्यातील भुंगेरा, धान्यातील भुंगेरा, धान्यातील पतंग पीक शेतात पक्व होत असताना दाण्यावर अंडी घालतात आणि असेच बियाणे मळणीनंतर साठवणुकीत आल्यास प्रादुर्भावास सुरूवात होते.

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा  8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.